Tuesday 31 January 2012

प्रेम, व्हँलेन्टाईन, आणि जनरेशन नेस्ट...


गेल्या दोन तिन दिवसांन पासुन माझ्या मोबाईल वर व्हँलेटाईन डे स्पेशल चे अनेक मँसेजेस् माझ्या मित्रांन कडून येत आहेत. आर्थात मँसेजेस् करणारी ही सगळी मंडळी काँलेज मध्येच शिकनारी आहेत. पण मला एक प्रश्न पडलाय की. व्हँलेन्टाईन डे अजुन 15 दिवस बाकी असतांना हि मंडळी येवढी उतावीळ काय झालीये ? पाश्चिमात्य देशात 14फ्रेबु. हा दिवस व्हँलेन्टाईन डे म्हणुन साजरा केला जातो. का तर ? त्याची दंतकथा आशी आहे की सुमारे 1750 वर्षापुर्वी रोम मध्ये एक राजा होता.त्याने आपले सैन्यदल मजबुत करन्या साठी समस्त तरुणवर्गाला सैन्यात भरती होन्याचे आवाहन केले. विवाह केल्यास तरुण संसारात अडकतील आणि देशप्रेमात अडथळा येईल म्हणुन विवाह न करन्याची सक्ती केली त्याला ख्रिश्चन पाद्री व्हँलेन्टाईन याने विरोध केला म्हणुन या पाद्रीला अटक करुन तुरंगात डांबले आणि तिथेच या पाद्रीचे तरुंग अधिकार्याच्या मुलीशी प्रेम जुळले.याच्या स्मरणार्थ जग भरात हा दिवस व्हँलेटाईन डे म्हणुन साजरा केला जातो. आणि परदेशा पेक्षा भारतात हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. किती हस्यास्पद आणि लज्जास्पद आहे हे सगळं.

प्रेम तशी निरागस भावना कधी आणि कुठे कुणावर जडेल याची शाश्वती नाही. कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक जन अयुष्यात कुणावर तरी प्रेम करतच आसतो. कुणी याला अपवाद नाही. आता आपल्या पुरानातच याचे किती पुरावे आहेत. राम सिता, राधा कृष्ण, नल दमयंती, दुष्यात शंकुतला, आश्या शेकडो जोड्या आपल्या संस्कृतीत पवित्र प्रेमाचे प्रतिनिधित्व करतात , प्रेम हे पवित्र आहे. ते तुम्ही कोणावरही आणि कधीही करु शकता. मग ते व्यक्त करायला खरचं व्हँलेन्टाईन डे सारख्या दिवसाची खरोखर गरज आहे का ? आज व्हँलेन्टाईन डे च्या निमित्ताने बाहेर जे प्रकार चाललेत त्या वरुन एक गोष्ट स्पष्ट होते की आजच्या पिढी मध्ये विकृती बोकाळते आहे. काँलेज, पब्स, डिस्को टाँकीज , भरभरुन भरलेले आसतात, समुद्र किनारे बाग बगीचे येथे तर अश्लिलतेला उधान अलेल आसतं इतकच कमी काय तर ऐतिहासिक किल्ले . धार्मिक स्थळे यांचा ही वापर करायला ही प्रेम युगुल मागे पुढे पाहत नाहीत. येवढी विकृती आज तरुणांमध्ये वाढु लागली तर नक्कीच हा दिवस आपल्या संस्कृतीला आपल्या संस्काराना मारक ठरनारा आहे. आपला देश स्वतंत्र्य आहे प्रत्येकाला काही स्वंतत्र्य राजघटनेने दिली आहेत, पण हिच स्वंतत्र्य व्याभिचाराला प्रत्साहन देत नाहीत . जगात आपली संस्कृती महान आहे मग तिचा आदर प्रत्येकाने केलाच पाहिजेत.जर तिचा आवमान कुठे होत असेल तर अवमान करनार्याचा थोबाड फुटलेच पाहीजेत ह्या मताचा मी आहे.

दिवसेंदिवस आपला देश प्रगत होत चालला होतोय पण दुर्देवाने आजाचा तरुण वर्ग कुठे तरी भरकटत चालला आहे. आपल्या संस्कृतीला तिंलाजली देवुन पाश्चिमात्य संस्कृतीतली विकृती जोपासु लागला आहे. कुठे तरी थांबले पाहीजेत हे, व्हँलेन्टाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, या सारख्या दिवसामध्ये बाजारात होनारी कोट्यावधींची उलाढाल पाहता एक गोष्ट निदर्शनात येते ती म्हणजे व्यापार... मग तो आर्थिक आसो किंवा सामाजिक, पाश्चिमात्य संस्कृती आपल्यावर लादली जाते याचे भान ही आपल्याला उरले नाही. आसो सांगन्याचा मुद्दा येवढाच की कुणावरही प्रेम करा बिंधास्त करा, ते कधीही व्यक्त करा पण व्हँलेन्टाईल डे सारख्या दिवशी ते ज्या पध्दतीने बाग बगीचे समुद्र किनारी ज्या अश्लिलतेने व्यक्त केले जाते तसे नका करु आपल्या प्रेमात जेव्हा अश्लिलता येते तेव्हा वासना उरते. पुढे तुमच तुम्हीच ठरवा ? आपली संस्कृती छत्रपती शिवप्रभुचा धगधगत्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा इतिहास शिकवते, आवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहनार्या ज्ञानेश्वराचा इतिहास शिकवते, नेताजी सुभाष चंद्र बोस सावरकर भगतसिंग यांचा इतिहास शिकवते. मग गरज काय आहे ? कोण कुठला तो व्हाँलेन्टाईन, एका स्री च्या मागे लागुन देशप्रेमा पेक्षा स्री प्रेमाचे गोडवे गानार्या पाश्चिमात्य पाद्री च्या सन्मानार्थ साजरा केला जानारा दिवस आपल्या देशात का म्हणुन साजरा करायचा आम्ही... उद्या यदाकदाचीत आपल्या देशावर कुठले संकट आले तर एका स्री च्या मिठीत लपुन मरन्या पेक्षा सिमेवर जावुन देशासाठी लढतांना मातृभुमिच्या कुशीत आलेले मरण नक्कीच चांगले आसेल ना ?. आजच्या युवा पिठीने याचा अंर्तमुख होउन विचार करन्या साठीच हा 15दिवस आधी लेखन प्रपंच !!

धन्यवाद !

post by lakshvedh

3 comments:

www.sumbran.blogspot.com said...

lihilsa te atyant yogy asach aahe parantu raj sahebanna ha lekh dakhvu nakos.

प्रशांत गडगे said...

राज साहेबांचे आम्ही जरी समर्थक असलो तरी आम्ही आमच विचार स्वंतंत्र्या कुणाकडे गहान ठेवले नाही. माझा या अधीचा बाळासाहेब वरचा लेख वाचाल तर ते कळेल तुम्हाला :-)

Unknown said...

मस्त आहे प्रशांत लेख
पण आत्ताच्या तरुण पिडीला कुठ कळतय. काहितरी बहाणा पाहीजे बस्स.

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...