Tuesday 31 January 2012

प्रेम, व्हँलेन्टाईन, आणि जनरेशन नेस्ट...


गेल्या दोन तिन दिवसांन पासुन माझ्या मोबाईल वर व्हँलेटाईन डे स्पेशल चे अनेक मँसेजेस् माझ्या मित्रांन कडून येत आहेत. आर्थात मँसेजेस् करणारी ही सगळी मंडळी काँलेज मध्येच शिकनारी आहेत. पण मला एक प्रश्न पडलाय की. व्हँलेन्टाईन डे अजुन 15 दिवस बाकी असतांना हि मंडळी येवढी उतावीळ काय झालीये ? पाश्चिमात्य देशात 14फ्रेबु. हा दिवस व्हँलेन्टाईन डे म्हणुन साजरा केला जातो. का तर ? त्याची दंतकथा आशी आहे की सुमारे 1750 वर्षापुर्वी रोम मध्ये एक राजा होता.त्याने आपले सैन्यदल मजबुत करन्या साठी समस्त तरुणवर्गाला सैन्यात भरती होन्याचे आवाहन केले. विवाह केल्यास तरुण संसारात अडकतील आणि देशप्रेमात अडथळा येईल म्हणुन विवाह न करन्याची सक्ती केली त्याला ख्रिश्चन पाद्री व्हँलेन्टाईन याने विरोध केला म्हणुन या पाद्रीला अटक करुन तुरंगात डांबले आणि तिथेच या पाद्रीचे तरुंग अधिकार्याच्या मुलीशी प्रेम जुळले.याच्या स्मरणार्थ जग भरात हा दिवस व्हँलेटाईन डे म्हणुन साजरा केला जातो. आणि परदेशा पेक्षा भारतात हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. किती हस्यास्पद आणि लज्जास्पद आहे हे सगळं.

प्रेम तशी निरागस भावना कधी आणि कुठे कुणावर जडेल याची शाश्वती नाही. कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक जन अयुष्यात कुणावर तरी प्रेम करतच आसतो. कुणी याला अपवाद नाही. आता आपल्या पुरानातच याचे किती पुरावे आहेत. राम सिता, राधा कृष्ण, नल दमयंती, दुष्यात शंकुतला, आश्या शेकडो जोड्या आपल्या संस्कृतीत पवित्र प्रेमाचे प्रतिनिधित्व करतात , प्रेम हे पवित्र आहे. ते तुम्ही कोणावरही आणि कधीही करु शकता. मग ते व्यक्त करायला खरचं व्हँलेन्टाईन डे सारख्या दिवसाची खरोखर गरज आहे का ? आज व्हँलेन्टाईन डे च्या निमित्ताने बाहेर जे प्रकार चाललेत त्या वरुन एक गोष्ट स्पष्ट होते की आजच्या पिढी मध्ये विकृती बोकाळते आहे. काँलेज, पब्स, डिस्को टाँकीज , भरभरुन भरलेले आसतात, समुद्र किनारे बाग बगीचे येथे तर अश्लिलतेला उधान अलेल आसतं इतकच कमी काय तर ऐतिहासिक किल्ले . धार्मिक स्थळे यांचा ही वापर करायला ही प्रेम युगुल मागे पुढे पाहत नाहीत. येवढी विकृती आज तरुणांमध्ये वाढु लागली तर नक्कीच हा दिवस आपल्या संस्कृतीला आपल्या संस्काराना मारक ठरनारा आहे. आपला देश स्वतंत्र्य आहे प्रत्येकाला काही स्वंतत्र्य राजघटनेने दिली आहेत, पण हिच स्वंतत्र्य व्याभिचाराला प्रत्साहन देत नाहीत . जगात आपली संस्कृती महान आहे मग तिचा आदर प्रत्येकाने केलाच पाहिजेत.जर तिचा आवमान कुठे होत असेल तर अवमान करनार्याचा थोबाड फुटलेच पाहीजेत ह्या मताचा मी आहे.

दिवसेंदिवस आपला देश प्रगत होत चालला होतोय पण दुर्देवाने आजाचा तरुण वर्ग कुठे तरी भरकटत चालला आहे. आपल्या संस्कृतीला तिंलाजली देवुन पाश्चिमात्य संस्कृतीतली विकृती जोपासु लागला आहे. कुठे तरी थांबले पाहीजेत हे, व्हँलेन्टाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, या सारख्या दिवसामध्ये बाजारात होनारी कोट्यावधींची उलाढाल पाहता एक गोष्ट निदर्शनात येते ती म्हणजे व्यापार... मग तो आर्थिक आसो किंवा सामाजिक, पाश्चिमात्य संस्कृती आपल्यावर लादली जाते याचे भान ही आपल्याला उरले नाही. आसो सांगन्याचा मुद्दा येवढाच की कुणावरही प्रेम करा बिंधास्त करा, ते कधीही व्यक्त करा पण व्हँलेन्टाईल डे सारख्या दिवशी ते ज्या पध्दतीने बाग बगीचे समुद्र किनारी ज्या अश्लिलतेने व्यक्त केले जाते तसे नका करु आपल्या प्रेमात जेव्हा अश्लिलता येते तेव्हा वासना उरते. पुढे तुमच तुम्हीच ठरवा ? आपली संस्कृती छत्रपती शिवप्रभुचा धगधगत्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा इतिहास शिकवते, आवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहनार्या ज्ञानेश्वराचा इतिहास शिकवते, नेताजी सुभाष चंद्र बोस सावरकर भगतसिंग यांचा इतिहास शिकवते. मग गरज काय आहे ? कोण कुठला तो व्हाँलेन्टाईन, एका स्री च्या मागे लागुन देशप्रेमा पेक्षा स्री प्रेमाचे गोडवे गानार्या पाश्चिमात्य पाद्री च्या सन्मानार्थ साजरा केला जानारा दिवस आपल्या देशात का म्हणुन साजरा करायचा आम्ही... उद्या यदाकदाचीत आपल्या देशावर कुठले संकट आले तर एका स्री च्या मिठीत लपुन मरन्या पेक्षा सिमेवर जावुन देशासाठी लढतांना मातृभुमिच्या कुशीत आलेले मरण नक्कीच चांगले आसेल ना ?. आजच्या युवा पिठीने याचा अंर्तमुख होउन विचार करन्या साठीच हा 15दिवस आधी लेखन प्रपंच !!

धन्यवाद !

post by lakshvedh

Thursday 26 January 2012

कुठे आहे प्रजासत्ताक ??

निवडनुकीच्या तोंडावर आलेला प्रजासत्ताक दिन या देशातील राजकारन्यासाठी प्रचाराची आणि आपले बेगडी देश प्रेम व्यक्त करन्याची सुवर्ण संधी आहे अस म्हटलं तर वावगे ठरनार नाही. कारण या देशाची जरी प्रजेची सत्ता आसली तरी तिच्यावर या राजकारन्याचा अंकुश आहे हे त्रिकालबाधीत सत्य !! असो एकंदरीत आपल्या देशाची अवस्था लहरी राजा आणि प्रजा अंधळी आशी काहीशी झाली आहे. डोळ्यासमोर समोर सगळ काही घडतय पण त्याचा प्रतिकार आम्ही करु शकत नाही कारण हा देश प्रजासत्ताक आहे !! प्रजा सवैभौम ! आब्जावधी लोक रस्त्यवर जन्माला आली आणि फुटपाथ वर मेली फरक काय पडतो. प्रजासत्ताक अन् स्वंतंत्र्यदिनाला झेंडा फडकवला की संपली आमची जबादारी, आम्ही देशाप्रती कधी गंभीरपणे विचारच केला नाही..आणि त्याचीच अंबट फळे अम्हाला 2G राष्ट्रकुल स्विसबँक महागाई चाखायला मिळतात.
आज देशातील सर्व सामान्य जनता ज्या भिषण परीस्थितीतून जात आहे त्याच काय? प्रजासत्ताक शब्दाचा नेमका आर्थ म्हणजे प्रजेची पूर्ण सत्ता आसलेल राज्य. पण एकंदरीक आजची परीस्थिती पाहता आता खरोखर हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे हि शंका येते.
आज वाढते घोटाळे बेरोजगारी भष्ट्राचार दहशदवाद आशा आनेक समस्याचा सामना करताना करतांना सामान्य जनतेची आक्षरश: दमछाक झाली आहे .आज कमी होईल उद्या कमी ह्या उसन्या आवसांनावर सर्वसामान्य जनता जगत होती पण माहागाईचा रोज वाढनारा उच्चाक पाहून ,आणि रोज वाढणारे घोटाळेपाहून खरच प्रजासत्ताक दिन आनंदात कसा साजरा करायचा हा प्रश्न पडतो . पुरे आज देशात प्रजासक्तात राजवट आहे.म्हजेच लोकशाही मूल्यावर आधारीत शासन पध्दतीचा आपन स्विकार केला आहे. यामधे लोकांनी निवडुन दिलेले लोकप्रतिनिधी या देशाचा कारभार करतातम्हणजेच अप्रत्यक्ष आपनच थोड्याफार प्रमाणात आजच्या या भिषण परिस्थितीला जबाबदार आहोत. नाकर्ते मुर्ख आशा लोकप्रतिनीधिच्या हातात सत्ता गेल्यावर यापेक्षा वाईट काय होणार, पण आज विचारकरायची वेळ आली आहे.एकविसाव्या शतकातला पहीला दशक संपला तरी आज आमच्या समोर रोटी, कपडा मकान, या प्राथमिक समस्या आहेत . समाजातील एक वर्ग जगण्यासाठी संघर्ष करतो तर दूसरी कडे एक वर्ग चंगळवाद पोसन्यात पुरुषार्थ मानतो. आशी भिषण परिस्थिति येवुन ठेपली आसतांना .यातच भर म्हणून बेरोजगारी ,आत्महत्या आशी नवीन आव्हाने देशासमोर उभी ठाकली आहेत .
आशा वातावरनात आपन प्रजासत्ताक दिन साजरा करनार आहोत . पण महागाई बेरोजगारी भ्रष्ट्राचार आणि आणि दहशदवाद आशा समस्यांन वर कायमस्वरुपी उपाय केल्यावरच हे राष्ट्र ख-या आर्थने प्रजासत्ताक होईल.......!

प्रजासत्ताकदिनाच्या नूसत्या मुळमुळीत शुभेच्छा देवुन देशभक्ती देखावा करन्या पेक्षा काँग्रेस विरोधी एक मत टाकून या देशातले प्रजासत्ताक खर्या अर्थाने चिरायु करा !!

धन्यवाद !!

Monday 23 January 2012

एकमुखी रुद्राक्ष...... बाळासाहेब ठाकरे !!

.
बाळासाहेबाची रुद्राक्ष तुला पहिली आणी अंनंद झाला. मनात एकच विचार आला की रुद्राक्ष तर आनेक आसतात पण एकमुखी रुद्राक्ष काही निराळाच त्याची तुला शक्यच नाही. संपुर्ण महाराष्ट्रातील किंबहुना हिंदुस्थानातील तमान हिंदुच्या ह्रदयावर गेली सात दशक निर्विवाद वर्चस्व गाजवन्याचा भाग्य बाळासाहेबाना मिळाले त्याचा आज 86 वा वाढदिवस आहे . भारताच्या राजकारनात आता पर्यत साठी उलटल्या नंतर ही आपला दबदबा कायम राखुन ठेवनारे खुप कमी नेते आहेत त्यांमध्ये बाळासाहेब हे अग्रस्थानी आहेत. ज्यांचा एक शब्द आजही प्रमान मनुन आनेक शिवसैनिक दिवस रात्र झटत आहेत. हिंदुस्थानच्या तमाम हिंदु बांधवान मध्ये धर्म जागृती करुन आवघ्या हिंदुस्थानला "गर्व से हम हिंदु है" म्हणत ताठ मानेनं जगायला शिकवले ते बाळासाहेबांनी !!

बाळासाहेब एक तोफ आहे जिच्या तोंडातुन एखादा गोळा सुटला की त्याच क्षणात वनव्यात रुंपारत होतं आणि जिकडे तिकडे फक्त आगच आग, या अगीत हिंदुचा द्वेष करन्याची यात राख झाली हे काही आपल्याला सांगायला नको, पण ही तोफ कधी स्वर्था साठी उडाली नाही हे ही तेवढच खरं ! तर आसो बाळासाहेबाना आमोघ वकृत्वाने आणि सडेतोड विचारांनी हिंदुस्थानातील हिंदुची मने जिंकायला वेळ लागला नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शिवसेनेची स्थापना करुन हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व चा नारा देत त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र काबीच केला. आपल्या आनेक भाषनानंमधुन मोठ मोठ नेंत्याच्या खिल्ल्या उडवत ,टोमने मारत या नेंत्याचा चांगलाच समाचार घेतला. पण यात कधी मुळ प्रश्नांकडे कधीच दुलर्क्ष्य केल नाही. आणि याच मुळे आनेक शिवसैनिकाची त्यांच्याशी नाळ जुळली ती कायमचीच !!

मी ही बाळासाहेबांचा एक निस्सीम चाहता आहे. आज काल लहान मुंलाना राजकारन्याच्या सावलीला देखील उभ नाही करत पण माझ बालपन थोड वेगळ गेलंय, बाळासांहेबाचा विचाराचा झंजावात माझ्या जन्मा अगोदराच आमच्या घरात पोहचला होता 1986 साली आमच्या वडीलांनी गावात शिव सेनेच्या शाखेची स्थापना केली आणि शिवसेनेचे सावली आमच्या घरावर पडली, या सावलीतच आम्ही वाढलो मोठे झालो किंबहुना सकाळ ते संध्याकाळ आनेक शिवसैनिकांचा राबता आमच्या घरातच असायचा त्यामुळे शिवसेनेचे संस्कार या मनावर झालेत आसे म्हटल्यास वागवे ठरनार नाही. शिवसेनेचे तालुक्यातील आनेक निवडनुका, राजकारण आणि बाळासांहेबाच्या विचारांचा समजुन घेन्याचा योग माझ्या अयुष्यात फार कमी वयात आला. बाळा साहेबांची सभा भाषने आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर खुप मोठा आहे. एखाद्याच्या मनात जर घुसले तर कायमचे.. आसा आशी दैवी शक्ती लाभलेले बाळासाहेब म्हणजे अपवादच..!
अतापर्यत त्याच्या आणि शिवसेनेच्या अयुष्यात खुप वादळे आली पण ती सर्व वादळे परतुन लावुन हा विशाल वटवृक्ष अजुन निश्चल उभा आहे लाखो शिवसैनिंकाना प्रेरणा देन्या साठी. बाबरी मशिदी प्रकरनी केलेली वक्तव्य आसो किंवा कोणाला दिलेल्या शिव्या आसो एकदा गेलाला शब्द कधीही मघार न घेनारा... पोटात एक आणी तेच ओठात आसलेला हिंदुस्थानातील एकच नेता बाळसाहेब ठाकरे....
रुद्राक्ष म्हणजे हिंदु मध्ये पुजनीय आणी शुभ शकुन ! यातही एकमुखी रुद्राच दुर्मिळ पण हिंदुस्थानाला बाळासाहेबान सारखा एकमुखी रुद्राक्ष केवळ नशीबानेच मिळालाय हे ही काही कमी नाही....!!

आशा आमच्या लाडक्या हिंदुह्रदय सम्राट बाळसाहेबांना दिर्घायुष्य लाभो हिच आई जगदबें चरनी प्रार्थना !! आणि वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ।।

Friday 13 January 2012

काँग्रेस आणि संक्रात.....

या नवीन वर्षातला आपला पहिला सन मकर संक्रात.. अंनदाचा आणि गोड गोड शुभेच्छा देण्याचा सन.. पौरानिक कथा काही सांगो पण सरत्या वर्षात जे काही आपापसात जे काही जे काही मत भेद झाले आसतील, ते या वर्षात विसरुन पुन्हा एकदा नव्या उमेदीने एकमेंकाच्या सहकार्याने नवीन काही सुरु करन्याचा हा सन...
तस देशात जे काही घडतय ते आपल्या सर्वाना काही अलबेल नाही. गेल्या वर्षात झालेले मोठ मोठे घोटाळे, आण्णा चे भ्रष्ट्राचार विरोधी अंदोलन, आणि काँग्रेसवाल्याचे केवीलवाने चेहरे, या घटना उभ्या आयुष्यात विसरनार नाहीत. या वर्षाच्या सुरुवातीलाच काँग्रेसच्या दुर्देवाने म्हणा की आपल्या सुदैवाने महाराष्ट्रात आठ मोठ्या महापलीकाच्या निवडनुकीची घोषना झाली आहे.सगळ्याच प्रमुख पक्षांनी या निवडूकांन साठी कंबर कसली असुन मतदाराच्या दवाजांचे खेटे ही घालायला सुरुवात केली आहे. दर निवडनुकीत निवडून येनारे उमेदवार आपल्या मतदार संघात फक्त पाच वर्षातुन एकदाच उगवतो आश्या मोठ मोठ्या बोंबा नागरीक आणी टिव्ही पत्रकार मोठ्या प्रमानावर मारतांना दिसतात, पण पाच वर्ष तो उमेदवार काय थोडाच परदेश वारीला गेला आसेल, मुळात आपणनच त्याकडे दुलर्क्ष्य करतो निवडनुकीना जसा हा प्रश्न विचारतो तसाच दर वर्षातुन एकदा जरी विचारला तरी पाच वर्षातुन कीमान तीन वेळा तरी तो मतदार संघात उगवेल आशी खात्री बाळगायला काय हरकत आहे. आता तो काय त्याच्या बापाच्या पैशावर नगरसेवका आमदार किंवा खासदार मंत्री झालेला नसतो, आपण त्यांना मते देतो म्हणुन ते तिथे जावुन आपले प्रतिनिधित्व करतात. आपली पण काही जबाबदारी आहे, नुसते कर भरले की आपली जबादारी संपली आशी चुकीची समज आपली झाली आहे. पाच वर्षात एकदाही आपण त्याला जाब विचारत नाही आणि निवडूकीच्या दरम्यान त्यांच्या नावाने बोंबा मारायच्या हे कितपत योग्य आहे ? हे तुमच तुम्हीच ठरवा. आता आपणच जर त्याला जाब विचारनार नाही तर तो काय सत्यवादी हरिचंद्र थोडाच आहे दिलेली सगळी वचने पाळायला.
जग झपाट्याने बदलतय पण लोकशाही तीच राहीली तेच कायदे आणी त्याच घरानेशाहीतले नेते, बदल फक्त येवढाच झाला की इंग्लड मध्ये जनारा काळा पैसा स्विस बँकेत गेला. देश तिथेच आणी आपण ही तिथेच.. देशातला गरीब गरीबच राहीला, पण इटली वरुन आलेला माँडेल भलताच फाँर्म आला, मंत्र्यानी उद्योग पतीनी आपल्या तिजोर्या भरुन घेतल्या, आणि देशावरच कर्ज मात्र सर्व सामान्याच्या माथी मारलं. आम्ही दोन वेळ पोटा साठी वन वन भटकतो, या भटकंतीत क्वचितच कधी देशाचा दोन क्षण काही विचार करतो . आता 12 तास राबतोय महागाई आशीच वाढत राहीली तर 15 तास राबु फरक काय पडतो हो ? चालुद्या जे चालतय ते ! आपल्या काय देन- घेन आहे. निवडनुका आल्या राजकारन्याना चार शिव्या द्या आणी मतदानाच्या दिवशी मस्त मजा करत सुट्टी ऐजाँय करा. हेच चालय या देशात म्हणुन कदाचित आज ही परिस्थिती ओढावली आहे . देश गहान ठेवायची वेळ आली तरी कोणीच या सरकारला जाब विचारत नाही का ? देशातला येवढा पैसा स्विस बँकेत गेलाच कसा? महागाई वाढलीच कशी ? कधी स्वःताच्या मनाला हा प्रश्न विचारला नसेल, तर सरकारची गोष्ट लांबच राहीली हो ! आसो आपला प्रश्न थोडा वेगळा आहे .
देशाला स्वंतंत्र्य मिळून आज 65 वर्ष उलटली तर ही अवस्था आहे. समजा स्वतंत्र्या नंतर 100 वर्षाने काय अवस्था आसेल आपली. इंग्रजानी 150 वर्ष राज्या करुन ही आपला देश दरीद्री नव्हता पण काँग्रस च्या 60 वर्षाच्या कारकिर्दितलं जागतिक बँकेचे कर्ज पहील्यावर काय वाटतयं तुम्हाला ? आपल्या देशाचा खर विकास झालाय का ? आणि झाला असेल तर फक्त कागदोपत्रीच खर्या भारताचा आजुन विकास झालाच नाही. फुटपाथ वर मोकळी जागा मिळेल तिथे लोक झोपतात मिळेल ते खातात आणी 50/100रु साठी मत विकतात हे काय विकासाच प्रतिक आहे का? च्यायचा घो या सरकारच्या !! किती वर्ष आम्हाला आसाच उल्लु बनवनार आहे आणि आम्ही ही बननार आहोत खुप झाल आता पाणी गळ्यापर्यत आल आहे. उद्या नाकातोंडात घुसल्यावर हात पाय हालवुन काही उपयोग नाही वेळीच सावध झालो तर ठीक आहे. नाहीतर मेलोच म्हणुन समजा हे सगळ सांगायच कारण एकच की आता निवडनुकाचा फड चांगलाच रंगनार आहेत काँग्रेस चे सोंगाडे पुन्हा दरवाजावर येतील, हीच वेळ आहे त्यांना जागा दाखवायची, ढुंगनावर लाथ मारुन आत्ताच हकलुन द्या नाहीतर उद्या हे आपल्या ढुंगनावर लाथा घालायला मागे पुढे पाहनार नाहीत.
या नविन वर्षाची सुरुवातच निवडनुकांनी होते हे एक निमित्त आहे या वर्षाचा काँग्रेस मुक्त भारत हा संकल्प करन्याचा कारण काँग्रेसने ह्या देशाला काय दिलच नाही फक्त ओरबडुन घेतलं, आण्णा सारखा माणुस हे ओरडून सांगतोय म्हणजे नक्कीच काही तरी तथ्थ आसेल त्यात. आपले मत मौल्यवान आहे. आता पर्यत झाल्या चुका त्या विसरुन जा. पुन्हा नविन प्रयत्न करायला काय हरकत आहे स्वच्छ चारीत्र्यवान सुशिक्षित आणी प्रशासनाची जान आसलेलाच(फक्त काँग्रेस चा नसलेला) उमेदवार निवडुन द्या. जर आपण त्याला राबवुन घेतले तर फरक नक्की पडेल या महापालिका निवडनुकी पासुनच सुरुवात करु काँग्रेसच्या फांद्या नाही तर मुळे छाटायला कारण काँग्रेस या विषवल्लीचा समुळ नाश केल्या शिवाय या भारताचा पुर्ण विकास कदापी शक्य नाही.
.
या ब्लाँग च्या सर्व वाचकांना मकरसंक्रातीच्या काँग्रेसविरहीत गोड गोड शुभेच्छा ।।
.
प्रशांत गडगे.

Saturday 7 January 2012

"फेस आणि फेसबुक"

फेसबुक वरच्या कुठल्या तरी पेज ने पोस्ट टाकली की फेसबुक बंद होनार आहे. बर्याच नेटकर्याना हि पोस्ट वाचुन जिव भाड्यांत पडल्याचा अनुभव आला आसेल, अर्थात पोस्ट वर पडनार्या कमेंट वरुन तर ते समजत होते. मी ही काही क्षण बैचैन झालो अर्थात सगळ्याच जगाची चिंता थोड्या काही प्रमानात कमी करनारा फेसबुक थोड्याच दिवसात प्रत्येकाच्या मनात घर करुन बसला हे ही तेवढच खरं ! मुळात मी फेसबुक वर आलो तेच एका कुतुहला पोटी या आधी इंटरनेटशी कधी ही संबध न आलेला मी फेसबुक च्या जगात कसा रुळलो हे माझ मलाच नाही कळलं, तस पाहायला गेले तर आमच्या ग्रामीन भागात या सोशल आणि ग्लोबल साईट विषयी आनेक गैरसमज आहेत किंवा फेसबुक सारख्या टाईमपास साईट वर पालकवर्गाचा खुप रोष आहे अर्थात ते न जुमानता आजची तरूणपिढी बिंधास्त इथे वावरते पण सांगायचा मुद्दा हाच की या इंटरनेट च्या जगाने आभासी का होईना पण शहरी- ग्रामीन, गरीब- श्रीमंत स्री- पुरुष आशा सगळ्याच क्षेत्रात समानता आणली, आता आपल्या देशात ती कधी येईल हे सांगता येत नाही तो भाग वेगळा पण आसो, फेसबुक ने तरी हा भेदभाव केला नाही हे खर की खोट ठरवण्यापत तरी आपण सुज्ञ आहोत.

आम्ही ग्रामीण भागात राहतो त्यामुळे शहरांशी आमचा संबध तसा कमीच त्यामुळे शहरातील चाल चलन, भाषा, राहनीमान, या विषयी नेहमीच मनात जिज्ञासा आसायची आणि ती काही अर्थाने जवळून पाहायचा योग फेसबुक मुळे जुळून आला. लोकांनी कितीही शिव्या घातल्या तरी फेसबुची खिडकी एकदा तरी खोलल्या शिवाय आनेक नेटकर्याना चैनच पडत नाही हे वास्तव आहे. या खिडकीतुन दिसनार्या आनेक चेहर्यानचे पोस्ट स्टेट्स आणि फोटो पाहील्या नंतर वास्तवातल जग सोडून नेटकर्याचे जग नेहमीच अंनंदात आसल्याचा अभास आपल्याला नेहमीच होतो. इथे आपल्याला कधीही न भेटलेल्या अनोळखी चेहर्याकडुन बरेच सल्ले कानपिचक्या आगदी मोफत मिळतात, काही चेहर्याची प्रत्यक्ष ओळख होते, आणी कधी ते जिवलग होतात हे कळत सुध्दा नाही.

फेसबुक म्हणजे आभासी चेहर्याचे जग.. यातले काही चेहरे खरे आसतात तर काही खोटे पण चेहेरे नक्की आसतात. प्रत्येक चेहेर्याची ओळख वेगळी आसते, काही जाती चा चेहरा लावतात, तर काही धर्माचा, काहींचा प्रेमभंग आसतो, तर काही फक्त बाजार गप्पा, टवाळांची पण संख्या इथे काही कमी नाही. आश्या अनेक चेहर्यान या जगात मुशाफीरी करतांना खरोखच अनेक रंजक अनुभव नक्कीच तुम्हाला आलेच आसतील.फेसबुक आता प्रत्येक नेटकर्याच्या अगंळवनी पडला आसुन कितीही टाळले तरी हे वास्तव आपल्याला स्विकारावेच लागेल. फेसबुक एक अरसा आहे, आपण ज्या मानसिकतेने त्यात बघू तस हुब चित्र आपल्याला ते दाखवत. जस काँलेज विद्यार्थान साठी टवाळी. महिलांसाठी गाँसीप कट्टा आणि पुरुषांसाठी राजकारनार्याना शिव्या घालन्याचा हक्काचा कट्ट, रिकामटेकड्याना फुकटचा टाईम पास..काही असो फेसबुक कोणाला नाराज करीत नाही हे ही तेवढच खरचं. इथे आलेला प्रत्येक जन या खिकडी पुढे काही आशा घेवून बसलेला आसतो कमी जास्त प्रमानात त्या पुर्ण ही होतात, त्याची कींमत म्हणुन बराचसा वेळ आपल्याल फेसबुक वर खर्च करावाला लागतो. तुमच्या कडे फुकटचा वेळ आसेल तर नक्की तुम्ही फेसबुक सिलेब्रेटी होवु शकता बिना मानधन कमवता तुम्ही आनेकांना फुकटचे सल्ले लाईक्स कमेंन्ट देवु शकता आणी घेवु शकता. यासाठी कोणते हि छुप्या अटी नाहीत, आणि मुख्य म्हणजे तुम्ही ते पाळताय का यावर कोणाचही बंधन नाही. आशा फेसबुकच्या मयाजालात आजची तरुणाई मनसोक्त डुंबली आहे . कोलावरी डी सारखे आचकड विचकट व्हीडीओ/ गाणी इथे एका रात्रीत सुपर डुपर हिट होतात . ब्रिटमधल्या कोणा अभिनेत्री नग्न फोटो ची लिंक शोधा शोध न करता एका क्लिक वर पाहता येतो. अजुन बरच काही इथे एका क्लिक वर एन्जाँय करता येत.आपल्या गल्लीत नाही पण इथल्या ग्रुप मध्ये छातीकाढून भांडता येत. नाहीच ऐकल कोणी तर दिनादिक्त ग्रुप सोडता येतो .आशा आनेक अनेक गमती जमती फक्त फेसबुक वर मी आनुभवल्यात यार !! त्यामुळे फेसबुक बंद होतय ऐकुन थोड टेन्शन प्रत्येकाला येईलच. सुर्याला उदय आस्त आहे, तर फेसबुक कौन सी बडी चिज है यार ! या जगात शाश्वत काही नाही जन्मा नंतर मृत्यु जसा अटळ आहे ना? मग फेसबुक याला अपवाद कसा आसेल? आजपर्यत जे दिवस दिवसातले तास तासातील मिनटे फेसबुक वर घालवली त्यात विरंगुळ्या बरोबर अनेक मित्र -मैत्रिनी बरोबरच बरीचशी माहिती मिळवली निदान ती तरी माझ्या सोबतीला चिरकाल राहील.आणि तिचा उपयोग भविष्य घडवन्या साठी नक्कीच होईल आशी आशा आहे . फेसबुक बंद होवो आथवा न होवो चेहर्याच्या जगात फिरायच वास्तव तुम्ही आम्ही कोणीही चुकवु शकत नाही. मग ते चेहरे वास्तवातले आसो किंबहूना आवास्तवातले........फेस हा आपल्या जिवनाचा आविभाज्या भाग झाला आहे मग ते चेहरे आसो किंवा कोणतीही परिस्थिती !! फेस करावीच लागते.

Monday 2 January 2012

कुणबी समाजाचे राजकारणातील स्थान ???

कालच मी कुणबी या सामजिक संस्थेच्या पहिल्या वर्धापण दिनाला हजेरी लावली, कार्यक्रम तसा भव्य पण समाजातील प्रंचड दुही मुळे गर्दी थोडी कमीच होती. वर्धापण दिनाच्या या कार्यक्रमाला तालुक्यातील स्वःताला कुणबी नेते म्हणुन घेनारे नेते कमीच हजर होते. कार्यक्रमला सुरुवात झाली ती काशिनाथ तिवरे च्या भाषनाने, नेहमीच्याच रटाळ भाषनांना समाजबांधव कंटाळु नये म्हणुन आधीच आयोजकांनी वक्त्याना काही विषय दिले होते त्यातला पहिलाच विषय संपुर्ण राज्यातल्या कुणबी बांधवाना अंर्तमुख करनारा होता तो म्हणजे राजकारनातील कुणबी समाजाच स्थान ?? खरोखर प्रश्न ऐकला खड्रबडुन जागाच झालो. स्वंतंत्र्य मिळून आज सहा दशक आजाडली तरी अजुन आमचं स्थान प्रश्नचिंन्हाकितच राहीलयं. किती मोठी हि कुणबी समाजाची शोकांतीका काशीनाथ तिवरे सारखा चार पावसाळे जास्त काढलेला नेताल्या जर या प्रश्नाच उत्तर सापडले नाही. मग आम्ही तर खुप लहान आहोत. तरी आम्ही या प्रश्नाला थोड अंर्तमुख होऊन थोड बारकायीने विचार केला आणि काही धक्कादायक निकषांनवर येवुन थांबलो.
संपुर्ण राज्यात बहुसंखेने आसनारा कुणबी समाज शेतकरीच समजला जातो.वाडवडीलांन पासुन आलेल्या शेतीवर दिवस भर राबराब राबुन उदरनिर्वाह करनारा आमचा कुणबी जागतिक करणाच्या रोट्या मुळे सहाजिकच प्रगती कडे अकर्षला गेला. तसेच मुळात स्थानिक आसल्याने राजकारनात तसा दबदबा होता तसा आजही आहे. शामराव पेजेच्या नेऋत्वाने पहिल्यांदा कोकणात संघटीत झाला. किंबहुना कोकणात तरी कुणबी समाजाचा राजकारणात मोलाचा सहभाग असुन मुळात कुणबी समाज राजकारणात सक्रीय आसतांनाही आमच्या समाजाच स्थान अजुन आम्हाला ठरवता आलं नाही. हि आमच्या नेत्यांची चुक म्हनावी लागेलं किवा अमच्या समाजाचे अपयश, एकीकडे तुकाराम महाराजांचा वारसा सांगनारे आम्ही आज त्यांची शिकवन विसरलो आहोत, "भले तर देवु कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हानु काठी" आम्ही फक्त एकमेकांच्या लंगोट्या फेडुन इतरांना दिल्या आणि म्हणुनच दुर्देवाने हि वेळ आज अपल्यावर आली आहे. हे हि विसरुन चालनार नाही.
आपसातल्या प्रंचड दुही मुळे हा कुणबी बांधव कधीक एक झाला नाही याची खंत वाटते. सतराशेसाठ राजकीय पक्षामध्ये विघुलेल्या आमच्या समाजाला एकीची किंमत कधी कळालीच नाही.त्यामुळे हाताच्या बोटावर मोजन्या इतकेच मुठभर नेते या राज्याच्या राजकारनात यशस्वी ठरले. आणि दुर्देवाने पक्ष्याच्या जोड्यामुळे समाजासाठी त्यांना काही करता आले नाही. आजही कुणबी समजातील तरुनाला कुणबी पाच नेत्याची नावे सांगता येत नाही ? केवढी ही समजाबद्दलची उदासिनता ?? एके काळी जमिदार म्हणुन गणला गेलेला कुणबी समाज काही दिवसात भुमिहीन व्हायच्या मार्गावर उभा आहे. किती भयान आणि भिषन परिस्थितीतुन समाज चालला आसताना समाजात प्रबोधनाच द्या सोडुन चंगळवाद आणि व्यासनाधिनताच वाढत चालली आहे . हातावर मोजन्या सारख्या काही संघटना समाजासाठी काही काम करीत आसतात पण त्यातही चमकोगीरी कडे आवास्तव आणि समाजहिताला कमी आश्या शायनर तरुणांची भर्ती दिसून येते. यामुळे संघटनेकडे बघन्याचा समाजाचा दृष्ट्रीकोन बदलतो याच भान देखील या कार्यकत्याना राहत नाही आणि समाजाविषयी तळमळ आसलेल्या खर्या कार्यकर्त्यचे यामुळे हिरमुस होतो. आसो आसाच काहीसा प्रकार मी कुणबीचा बाबतीत हि झाला तो भाग वेगळा..
आजही कुणबी समाज कधी एक झाला तर राज्याला त्याची दखल घ्यावीच लागेल. इतर पक्षान साठी रस्त्यावर उतरनारा , डोकी फोटनारा, अक्रमक कुणबी समाज आनेक पक्षाना सत्तेत आननारा पंरंतु स्वाःता सत्तेपासुन लांब राहीलेला असो किवा लांब फेकलेला आसो आमच राजकारणातील स्थान अजुन हि प्रश्नांकितच आहे. हे त्रिवार सत्य !! अंनत गिते आणि किसन कथोरे विश्वनाथ पाटील यांसारखी माणसं अजुनही हिंमतीने समाज बांधनीच काम करतात ते कौतुगास्पद आहे . त्याच बरोबर मी कुणबी सारख्या समाजिक संघटना त्यांच्या या कार्याचे बळ वाढवीत आहेत. त्या मुळे राजेश गडगे विशेष कौतुक. आश्याच कुणबी संघटना ह्या महाराष्ट्रतात स्थापन झाल्या तर दुहि ची मेख आपण मोडु शकतो आणि कुणब्यांची प्रंचड एकी चे एक विराट दर्शन या महाराष्ट्राला घडवु शकतो आणि ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी कुणब्यांच राजकारणातील स्थान प्रश्नांकित नाही तर वलयांकित होईल यात शंका नाही..

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...