Friday 13 January 2012

काँग्रेस आणि संक्रात.....

या नवीन वर्षातला आपला पहिला सन मकर संक्रात.. अंनदाचा आणि गोड गोड शुभेच्छा देण्याचा सन.. पौरानिक कथा काही सांगो पण सरत्या वर्षात जे काही आपापसात जे काही जे काही मत भेद झाले आसतील, ते या वर्षात विसरुन पुन्हा एकदा नव्या उमेदीने एकमेंकाच्या सहकार्याने नवीन काही सुरु करन्याचा हा सन...
तस देशात जे काही घडतय ते आपल्या सर्वाना काही अलबेल नाही. गेल्या वर्षात झालेले मोठ मोठे घोटाळे, आण्णा चे भ्रष्ट्राचार विरोधी अंदोलन, आणि काँग्रेसवाल्याचे केवीलवाने चेहरे, या घटना उभ्या आयुष्यात विसरनार नाहीत. या वर्षाच्या सुरुवातीलाच काँग्रेसच्या दुर्देवाने म्हणा की आपल्या सुदैवाने महाराष्ट्रात आठ मोठ्या महापलीकाच्या निवडनुकीची घोषना झाली आहे.सगळ्याच प्रमुख पक्षांनी या निवडूकांन साठी कंबर कसली असुन मतदाराच्या दवाजांचे खेटे ही घालायला सुरुवात केली आहे. दर निवडनुकीत निवडून येनारे उमेदवार आपल्या मतदार संघात फक्त पाच वर्षातुन एकदाच उगवतो आश्या मोठ मोठ्या बोंबा नागरीक आणी टिव्ही पत्रकार मोठ्या प्रमानावर मारतांना दिसतात, पण पाच वर्ष तो उमेदवार काय थोडाच परदेश वारीला गेला आसेल, मुळात आपणनच त्याकडे दुलर्क्ष्य करतो निवडनुकीना जसा हा प्रश्न विचारतो तसाच दर वर्षातुन एकदा जरी विचारला तरी पाच वर्षातुन कीमान तीन वेळा तरी तो मतदार संघात उगवेल आशी खात्री बाळगायला काय हरकत आहे. आता तो काय त्याच्या बापाच्या पैशावर नगरसेवका आमदार किंवा खासदार मंत्री झालेला नसतो, आपण त्यांना मते देतो म्हणुन ते तिथे जावुन आपले प्रतिनिधित्व करतात. आपली पण काही जबाबदारी आहे, नुसते कर भरले की आपली जबादारी संपली आशी चुकीची समज आपली झाली आहे. पाच वर्षात एकदाही आपण त्याला जाब विचारत नाही आणि निवडूकीच्या दरम्यान त्यांच्या नावाने बोंबा मारायच्या हे कितपत योग्य आहे ? हे तुमच तुम्हीच ठरवा. आता आपणच जर त्याला जाब विचारनार नाही तर तो काय सत्यवादी हरिचंद्र थोडाच आहे दिलेली सगळी वचने पाळायला.
जग झपाट्याने बदलतय पण लोकशाही तीच राहीली तेच कायदे आणी त्याच घरानेशाहीतले नेते, बदल फक्त येवढाच झाला की इंग्लड मध्ये जनारा काळा पैसा स्विस बँकेत गेला. देश तिथेच आणी आपण ही तिथेच.. देशातला गरीब गरीबच राहीला, पण इटली वरुन आलेला माँडेल भलताच फाँर्म आला, मंत्र्यानी उद्योग पतीनी आपल्या तिजोर्या भरुन घेतल्या, आणि देशावरच कर्ज मात्र सर्व सामान्याच्या माथी मारलं. आम्ही दोन वेळ पोटा साठी वन वन भटकतो, या भटकंतीत क्वचितच कधी देशाचा दोन क्षण काही विचार करतो . आता 12 तास राबतोय महागाई आशीच वाढत राहीली तर 15 तास राबु फरक काय पडतो हो ? चालुद्या जे चालतय ते ! आपल्या काय देन- घेन आहे. निवडनुका आल्या राजकारन्याना चार शिव्या द्या आणी मतदानाच्या दिवशी मस्त मजा करत सुट्टी ऐजाँय करा. हेच चालय या देशात म्हणुन कदाचित आज ही परिस्थिती ओढावली आहे . देश गहान ठेवायची वेळ आली तरी कोणीच या सरकारला जाब विचारत नाही का ? देशातला येवढा पैसा स्विस बँकेत गेलाच कसा? महागाई वाढलीच कशी ? कधी स्वःताच्या मनाला हा प्रश्न विचारला नसेल, तर सरकारची गोष्ट लांबच राहीली हो ! आसो आपला प्रश्न थोडा वेगळा आहे .
देशाला स्वंतंत्र्य मिळून आज 65 वर्ष उलटली तर ही अवस्था आहे. समजा स्वतंत्र्या नंतर 100 वर्षाने काय अवस्था आसेल आपली. इंग्रजानी 150 वर्ष राज्या करुन ही आपला देश दरीद्री नव्हता पण काँग्रस च्या 60 वर्षाच्या कारकिर्दितलं जागतिक बँकेचे कर्ज पहील्यावर काय वाटतयं तुम्हाला ? आपल्या देशाचा खर विकास झालाय का ? आणि झाला असेल तर फक्त कागदोपत्रीच खर्या भारताचा आजुन विकास झालाच नाही. फुटपाथ वर मोकळी जागा मिळेल तिथे लोक झोपतात मिळेल ते खातात आणी 50/100रु साठी मत विकतात हे काय विकासाच प्रतिक आहे का? च्यायचा घो या सरकारच्या !! किती वर्ष आम्हाला आसाच उल्लु बनवनार आहे आणि आम्ही ही बननार आहोत खुप झाल आता पाणी गळ्यापर्यत आल आहे. उद्या नाकातोंडात घुसल्यावर हात पाय हालवुन काही उपयोग नाही वेळीच सावध झालो तर ठीक आहे. नाहीतर मेलोच म्हणुन समजा हे सगळ सांगायच कारण एकच की आता निवडनुकाचा फड चांगलाच रंगनार आहेत काँग्रेस चे सोंगाडे पुन्हा दरवाजावर येतील, हीच वेळ आहे त्यांना जागा दाखवायची, ढुंगनावर लाथ मारुन आत्ताच हकलुन द्या नाहीतर उद्या हे आपल्या ढुंगनावर लाथा घालायला मागे पुढे पाहनार नाहीत.
या नविन वर्षाची सुरुवातच निवडनुकांनी होते हे एक निमित्त आहे या वर्षाचा काँग्रेस मुक्त भारत हा संकल्प करन्याचा कारण काँग्रेसने ह्या देशाला काय दिलच नाही फक्त ओरबडुन घेतलं, आण्णा सारखा माणुस हे ओरडून सांगतोय म्हणजे नक्कीच काही तरी तथ्थ आसेल त्यात. आपले मत मौल्यवान आहे. आता पर्यत झाल्या चुका त्या विसरुन जा. पुन्हा नविन प्रयत्न करायला काय हरकत आहे स्वच्छ चारीत्र्यवान सुशिक्षित आणी प्रशासनाची जान आसलेलाच(फक्त काँग्रेस चा नसलेला) उमेदवार निवडुन द्या. जर आपण त्याला राबवुन घेतले तर फरक नक्की पडेल या महापालिका निवडनुकी पासुनच सुरुवात करु काँग्रेसच्या फांद्या नाही तर मुळे छाटायला कारण काँग्रेस या विषवल्लीचा समुळ नाश केल्या शिवाय या भारताचा पुर्ण विकास कदापी शक्य नाही.
.
या ब्लाँग च्या सर्व वाचकांना मकरसंक्रातीच्या काँग्रेसविरहीत गोड गोड शुभेच्छा ।।
.
प्रशांत गडगे.

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...