Saturday 5 November 2011

तरुणांचा राजकारनातील सहभाग !!

सभोवताली जे घडताय ते अस्वस्थ करनारे आहे. देशाच्या अंर्तगत सुरक्षे बरोबर देशात सर्वत्र वाढलेली बेकारी महागाई आणि सरकारी भ्रष्ट्राचार या चारही बाजुनी सरकार चांगलेच आडचनीत आले आहे. भ्रष्ट्राचार विरोधी जनलोकपाल आसो किंवा स्विस बँकेतील काळा पैसा आसो सगळ्याच बाबतीत सरकार चांगलेच आडचनीत आले आहे. आणि या चार सहा महिन्यांत घडलेल्या घटनांवरुन एक गोष्ट लक्षात येते,आज काल चे युवक मोठ्या प्रमाणात अंदोलना मध्ये सहभाग नोंदवत आहेत आणि हिच या नव्या पिढीच्या राजकारण प्रवेशाची नांदी ठरली !!

आज आपला देश स्वंतत्र्य होउन सत्तर वर्ष झाली तरी ही देशासमोरची आव्हाने तिच आहेत .आजही इथली सामान्य जनता अन्न वस्र आणि निवारा याच्याच शोधात फिरत आहे. आश्या वेळी संतप्त होउन सरकारला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की गेली सत्तर वर्ष हे सरकार काय फक्त झोपा काढतय का ??जनतेचे सोडा पण या सत्तर वर्षात सरकारी आधिकारी आणि मंत्री यांची बरीच प्रगती झाली आहे . उदा. ए राजा कनीमोळी कलमाडी, आशी मोठी यादीच आहे . या सारखे भ्रष्ट्र नेते करोडो रुपयांचे गफले करुन तुरुंगाची हवा खात आहेत.आणि आमची सर्व सामान्य गरीब जनता हे सगळं हाताश पणे पाहत आहे , सरकार कारवाई च्या नावावर "मी मारल्या सारख करतो तु रडल्या सारख कर " आसा खोटा नाटक करुन जनतेची दिशाभुल करीत आहे . हे आम्हाला कळतं नाही का ?

आपल्या देशाची लोकसंख्या आज आब्जावर पोहचली आहे आणि हे सरकार म्हणजे मंत्री आणि सरकारी आधिकारी हे मुठभर लोक गेली सत्तर वर्ष फक्त आम्हाला राबवतात हे आमच्या लक्षात तरी कसं येत नाही. गेल्या काही वर्ष फक्त विकासाच्या बाता मारायच्या पण विकास कुठे झालाय हे सांगु शकतात का ? देशाच्या एकुन उपन्ना पैकी 75% पैसा हा मंत्री आधीकारी यांच्यावर खर्च केला जातो मग कसा होनार विकास ?? देशाची जनता महागाई आणि भ्रष्ट्राचाराला अक्षरशः वैतागली आहे . इथे रेशन पासुन ते मंत्रालया पर्यत चिरीमिरी दिल्या शिवाय कामे पुर्ण होत नाही आणि माहागाईच कार काय सांगु नका. या सरकारच्या स्थापने पासुन ती वर्षात दुप्पट झाली आहे आणि पाच वर्षात नक्कीच चौपट होईल याची भिती वाटते. पेट्रोल डिझेल आन्न धान्य या सारख्या गोष्टी सर्व सामान्याच्या आवाक्या बाहेर चालल्या आहेत सर्वत्र आराजकता माजली आहे आणि झोपेचे सोंग घेवुन सुस्त पडल आहे . या वरुन कळते या सरकारचा माज कीती वाढलाय ते. आणि येवढ्या मुजोर सरकारला आपन आब्जावधी भारतीय मिळुन ही काही करु शकत नाही याची खंत वाटते, येवढे षंढ आहोत का आपण ?

जे घडतंय ते विपरीत आणि विचलीत करणारे आहे पण हि परिस्थिती बदलायला हवी. इथला तरुन जागा झाला तर ते नक्कीच शक्य आहे आन्यथा येत्या काळात अपल्या देशाच काही खर नाही आस म्हणन्याची वेळ दुर्देवाने आमच्या वर येईल, संसंदे पासुन तर ग्रा.पं पर्यत सर्वत्र परिस्थिती सारखी निवडनुका आल्या का मोठ मोठी आश्वासने द्याचची आणि सत्तेवर यायचे ,मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग करुन प्रचंड पैसा कमवायचा आणि पुन्हा निवडुकीत हाच पैसा वापरायचा हे गणितच ठरलंय . आता किती दिवस हे डोळ्या समोर घडत आसतांना पाहत बसायच आम्ही, आणि आता प्रत्येक युवकाने राजकारन यायलाच हवे किंबहुना तशी वेळ सरकारने आता काढली आहे .

इंटरनेट आणि प्रसिध्दी माध्यमाच्या जगात मोठ मोठी आंदोलने झाली या इजिप्त सारख्या देशात तरुनांनी एकत्र येवुन जुलमी राजवटीचा नाश केला तर हे कोण ? आणी भारतात हे आशक्य आहे का ? क्रांतीकारकांचा देश म्हणुन भारताची ओळख आहे आणि जगातील सगळ्यात जास्त तरुन आसलेला देश म्हणुन भारत जग विख्यात आहे. आशा देशात एक नवी क्रांती होने मुळीच अशक्य नाही. या देशातील सगळ्यांच तरुनांनी एकत्र येवुन नुसती फुक जरी मारली तरी सरकारची पळता भुयी थोडी होईल येवढी प्रचंड ताकद आजच्या युवापिढी मध्ये आहे . भष्ट्राचार आणि महागाई विरोधात सगळ्यांनी एकत्र येवुन लढने आज गरजेचे आहे. सभोवताली घडनार्या घटना पाहता या देशाला फक्त युवाच तारु शकतात आसा विश्वास वाटतो देशातील तरूनांनी राजकारना बाबत उदासीन न राहता राजकारनात सक्रीय होने गरजेचे आहे. कारण राजकारणी हे कधीच सर्वभौम नसतात ते जनमतावर आवलंबुन आसतात आणि याच जनमताच्या प्रंचड ताकदीवर आपण त्यांना मुठीत घेवुन राबवु शकतो पण या साठी मोठे संघटन घडने अवश्यक आहे आणि हे संघटन या देशातील युवकच उभे करतील आसा विश्वास वाटतो.

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...