Wednesday 13 October 2021

शहापुरच्या दशेला जबाबदार कोण ??


शहापुर ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका गेली कित्तेक वर्ष या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , आणि काँग्रेसची सत्ता पण विकास मात्र शुन्य 70 किमी च्या परिघात आसलेल्या या तालुक्यात डोळखांब,कसारा, घाटघर, किन्हवली, वैतरणा, खर्डी, आसे प्रमुख विभाग पडतात या मध्ये आदिवासी, कुणबी आशा दोन समाजाचे प्राबल्य आसल्याचे दिसुन येते. पण विकासाच्या बाबतीत आजुनही शहापुरचा विकास कागदावरच राहिला आहे . याचे मुख्य कारण म्हणजे अपरिपक्व नेऋत्व आणि उदासिन जनता यामुळे शहापुर तालुका विकासा पासुन वंचितच राहिला आहे .दरवेळी निवडनुकीच्या वेळीला लोकांना मोठ मोठी अश्वासने द्यायची आणि बक्कल पैसा कमवुन स्वःताच्या खिशात घालायचा हाच एक उद्योग इथल्या लोकप्रतिनिधीना चांगला जमतो आणि बिच्चारी जनता रस्ते पाणि आणि विज यासाठी टाहो फोडीत आहे. स्वंतंत्र्या नंतर 70 वर्ष उलटली तरी आजुन हि इथली काही खेड्यातुन तालुक्याच्या मुख्य रस्त्याला जोडनारे रस्ते नाहीत. वाहतुकीच्या सोई उपलब्ध नाहीत. शहापुर बस डेपो च्या मोडकळीस आलेल्या थर्डक्लास बस मधे प्रवास करुन नागरिक हैरान झाले आहेत. एक सरकारी प्रवास जिव मुठीत घेवुन करा अन्यथा खाजगी वाहतुक ही त्याच दर्जाची पण कधी बंड न करनारी ही जनता आजही तसाच प्रवास करत शहापुर पर्यत पोहतचते. रस्त्याची आवस्था तर विचारु नका ! पावसाळ्याच्या सुरुवातीला बनवलेले रस्ते पावसाळा संपेपर्यत वाहुन ही जातात आता शहापुर आसनगांव या मुख्य उदा. घ्या ना ? पावसाळा संपल्या नंतर बनवलेला हा रस्ता आजुन एप्रिल संपत आला तरी आजुन पुर्ण झाला नाही . जर शहापुर तालुक्याच्या दोन मुख्य शहरांना जोडनार्या रस्त्यांची ही अवस्था तर खेड्यांची काय ? आता पाण्याची च्या सोईच बघु शहापुर आजुन हि 140 गाव पाड्यांना टँकरने पाणि पुरवठा केला जातो . मुख्य म्हणजे मुंबई आणि उपनगरांना पाणि पुरवठा करनारा मुख्य तिन धरने याच तालुक्यात आहे तरी 140 गाव पाडे ताहानलेले राहिलेच कसे ? या तालुक्यात पाणि पुरवठा विभागा तर्फे शेकडो पाणि योजना मंजुर केल्या जातात. त्या कशा पुर्ण केल्या जातात हे या लोकप्रधिनिंना सांगायची गरज नाही ! आर्धि कामे तर त्यांचे कार्यकर्ते करतात. त्यामुळे आर्ध्य पाणि योजना तर बंद आहेत . वैद्यकिय सेवा तर पार कोलमडली आहे . उपजिल्हा रुग्नालय तर फक्त नावाला आहे . एकही चांगला डाँक्टर इथे उपचाराला उपलब्ध नाही . पोस्टमार्टेम आणि डेँसिंग पलिकडे इथे काही होत नाही . याच रुग्नालयात काम करनार्या डाँक्टरांनी खाजगी रुग्नालये थाटुन करोडो रु, कमवले पण एकही लोक प्रतिनिधिने त्यांना हिसाब विचारला नाही ? ह्या रुग्नालयात जनतेची प्रचंड लुट होत आसतांना प्रशासन ऐवडे गप्प का ? आश्या आनेक समस्या आम्हा शहापुर करांना भेडसवत आहेत पण एक ही नेऋत्व यावर आवाज का उठवत नाही . कारण एकच शहापुरचे सगळे राजकारन "स्व केंद्रीत" झाले आहे . इथल्या सगळ्याच राजकारण्याना स्वर्था पलिकडे काही दिसत नाही. फक्त आपापल्या  कंपुचा विकास कसा होईल या चिंतेने ग्रासलेल्या या भाडखावुंना समाज हिताची कसली आली जान !! स्वतंत्र्या नंतर 70 वर्षानी देखील आजुन आम्ही रस्ते पाणि विज यावरच आडकुन पडलोय या वरुन या दळभद्री राजकारण्यांनी आत्तापर्यत काय सांगायला नको . आता पर्याय एकच आहे पुढच्या निवडनुकित यांना धडा शिकुन सुशिक्षित समाजहिताची जान आसलेला लोकप्रतिनिधी निवडुन दिले तरच काही बदल घडु शकतो अन्यथा पुढचे पाच वर्ष पुन्हा तेच !!           �

post by lakshvedh

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...