Saturday 7 January 2012

"फेस आणि फेसबुक"

फेसबुक वरच्या कुठल्या तरी पेज ने पोस्ट टाकली की फेसबुक बंद होनार आहे. बर्याच नेटकर्याना हि पोस्ट वाचुन जिव भाड्यांत पडल्याचा अनुभव आला आसेल, अर्थात पोस्ट वर पडनार्या कमेंट वरुन तर ते समजत होते. मी ही काही क्षण बैचैन झालो अर्थात सगळ्याच जगाची चिंता थोड्या काही प्रमानात कमी करनारा फेसबुक थोड्याच दिवसात प्रत्येकाच्या मनात घर करुन बसला हे ही तेवढच खरं ! मुळात मी फेसबुक वर आलो तेच एका कुतुहला पोटी या आधी इंटरनेटशी कधी ही संबध न आलेला मी फेसबुक च्या जगात कसा रुळलो हे माझ मलाच नाही कळलं, तस पाहायला गेले तर आमच्या ग्रामीन भागात या सोशल आणि ग्लोबल साईट विषयी आनेक गैरसमज आहेत किंवा फेसबुक सारख्या टाईमपास साईट वर पालकवर्गाचा खुप रोष आहे अर्थात ते न जुमानता आजची तरूणपिढी बिंधास्त इथे वावरते पण सांगायचा मुद्दा हाच की या इंटरनेट च्या जगाने आभासी का होईना पण शहरी- ग्रामीन, गरीब- श्रीमंत स्री- पुरुष आशा सगळ्याच क्षेत्रात समानता आणली, आता आपल्या देशात ती कधी येईल हे सांगता येत नाही तो भाग वेगळा पण आसो, फेसबुक ने तरी हा भेदभाव केला नाही हे खर की खोट ठरवण्यापत तरी आपण सुज्ञ आहोत.

आम्ही ग्रामीण भागात राहतो त्यामुळे शहरांशी आमचा संबध तसा कमीच त्यामुळे शहरातील चाल चलन, भाषा, राहनीमान, या विषयी नेहमीच मनात जिज्ञासा आसायची आणि ती काही अर्थाने जवळून पाहायचा योग फेसबुक मुळे जुळून आला. लोकांनी कितीही शिव्या घातल्या तरी फेसबुची खिडकी एकदा तरी खोलल्या शिवाय आनेक नेटकर्याना चैनच पडत नाही हे वास्तव आहे. या खिडकीतुन दिसनार्या आनेक चेहर्यानचे पोस्ट स्टेट्स आणि फोटो पाहील्या नंतर वास्तवातल जग सोडून नेटकर्याचे जग नेहमीच अंनंदात आसल्याचा अभास आपल्याला नेहमीच होतो. इथे आपल्याला कधीही न भेटलेल्या अनोळखी चेहर्याकडुन बरेच सल्ले कानपिचक्या आगदी मोफत मिळतात, काही चेहर्याची प्रत्यक्ष ओळख होते, आणी कधी ते जिवलग होतात हे कळत सुध्दा नाही.

फेसबुक म्हणजे आभासी चेहर्याचे जग.. यातले काही चेहरे खरे आसतात तर काही खोटे पण चेहेरे नक्की आसतात. प्रत्येक चेहेर्याची ओळख वेगळी आसते, काही जाती चा चेहरा लावतात, तर काही धर्माचा, काहींचा प्रेमभंग आसतो, तर काही फक्त बाजार गप्पा, टवाळांची पण संख्या इथे काही कमी नाही. आश्या अनेक चेहर्यान या जगात मुशाफीरी करतांना खरोखच अनेक रंजक अनुभव नक्कीच तुम्हाला आलेच आसतील.फेसबुक आता प्रत्येक नेटकर्याच्या अगंळवनी पडला आसुन कितीही टाळले तरी हे वास्तव आपल्याला स्विकारावेच लागेल. फेसबुक एक अरसा आहे, आपण ज्या मानसिकतेने त्यात बघू तस हुब चित्र आपल्याला ते दाखवत. जस काँलेज विद्यार्थान साठी टवाळी. महिलांसाठी गाँसीप कट्टा आणि पुरुषांसाठी राजकारनार्याना शिव्या घालन्याचा हक्काचा कट्ट, रिकामटेकड्याना फुकटचा टाईम पास..काही असो फेसबुक कोणाला नाराज करीत नाही हे ही तेवढच खरचं. इथे आलेला प्रत्येक जन या खिकडी पुढे काही आशा घेवून बसलेला आसतो कमी जास्त प्रमानात त्या पुर्ण ही होतात, त्याची कींमत म्हणुन बराचसा वेळ आपल्याल फेसबुक वर खर्च करावाला लागतो. तुमच्या कडे फुकटचा वेळ आसेल तर नक्की तुम्ही फेसबुक सिलेब्रेटी होवु शकता बिना मानधन कमवता तुम्ही आनेकांना फुकटचे सल्ले लाईक्स कमेंन्ट देवु शकता आणी घेवु शकता. यासाठी कोणते हि छुप्या अटी नाहीत, आणि मुख्य म्हणजे तुम्ही ते पाळताय का यावर कोणाचही बंधन नाही. आशा फेसबुकच्या मयाजालात आजची तरुणाई मनसोक्त डुंबली आहे . कोलावरी डी सारखे आचकड विचकट व्हीडीओ/ गाणी इथे एका रात्रीत सुपर डुपर हिट होतात . ब्रिटमधल्या कोणा अभिनेत्री नग्न फोटो ची लिंक शोधा शोध न करता एका क्लिक वर पाहता येतो. अजुन बरच काही इथे एका क्लिक वर एन्जाँय करता येत.आपल्या गल्लीत नाही पण इथल्या ग्रुप मध्ये छातीकाढून भांडता येत. नाहीच ऐकल कोणी तर दिनादिक्त ग्रुप सोडता येतो .आशा आनेक अनेक गमती जमती फक्त फेसबुक वर मी आनुभवल्यात यार !! त्यामुळे फेसबुक बंद होतय ऐकुन थोड टेन्शन प्रत्येकाला येईलच. सुर्याला उदय आस्त आहे, तर फेसबुक कौन सी बडी चिज है यार ! या जगात शाश्वत काही नाही जन्मा नंतर मृत्यु जसा अटळ आहे ना? मग फेसबुक याला अपवाद कसा आसेल? आजपर्यत जे दिवस दिवसातले तास तासातील मिनटे फेसबुक वर घालवली त्यात विरंगुळ्या बरोबर अनेक मित्र -मैत्रिनी बरोबरच बरीचशी माहिती मिळवली निदान ती तरी माझ्या सोबतीला चिरकाल राहील.आणि तिचा उपयोग भविष्य घडवन्या साठी नक्कीच होईल आशी आशा आहे . फेसबुक बंद होवो आथवा न होवो चेहर्याच्या जगात फिरायच वास्तव तुम्ही आम्ही कोणीही चुकवु शकत नाही. मग ते चेहरे वास्तवातले आसो किंबहूना आवास्तवातले........फेस हा आपल्या जिवनाचा आविभाज्या भाग झाला आहे मग ते चेहरे आसो किंवा कोणतीही परिस्थिती !! फेस करावीच लागते.

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...