Friday 28 December 2012

गोष्ट एका खादाड बाबुची ...



शहापुर तालुक्यात खुप वर्षानंतर लाच लुचपत आधिकार्यानी छापा टाकुन गटशिक्षण आधिकार्याला 20 हाजार रुपयाची लाच घेतांना रंगे हात पकडुन अटक केली. आणि संपुर्ण शहापुरच हादरुन निघाले आर्थात हा हादरा इथल्या सगळ्याच सरकारी बाबुची झोप उडवनारा होता यांत काडी मात्र शंका नाही. सध्या भ्रष्ट्राचार हा राजशिष्टाचार झालायं , भ्रष्ट्राचारचे काळ भुत तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मानगुटीवर बसलयं, दिल्ली पासुन आमच्या गल्लीतल्या पारा पर्यत त्याचा जो नंगानाच सुरु तो एक दिवस देशाला घातक ठरनार आहे . आज लाखो करोडो रुपयांचे गफले आपल्याला सगळ्याच ठिकानी सर्रास पाहायला मिळतात त्यात फक्त विस हाजाराची लाच घेनारा एक महाभाग शहापुरात रंगे हात पकडला तर त्यात काय नवलं ? आशा दुर्देवी प्रतिक्रीया ऐकल्या आणि तळपायची आग डोक्यातच गेली, वर वर साधी वाटनारी ही घटना तशी खुपच गंभिर आहे , आद्याचे सुजान नागरीक घडवन्याची  जबाबदारी ज्या शिक्षण विभागाची आसते त्याच शिक्षण विभागातल्या गटशिक्षण आधिकार्याने चक्क एक शिक्षिके 20 हजार रु. लाच मागितली या शिक्षकाच्या पतीने वेळीच लाचलुचप विभागाकडे धाव घेवुन या माहाभागाला रंगेहात पकडुन दिले त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक ! पण शिक्षण विभागात आसा दुर्देवी प्रकार होणे हे आम्हा शहापुरकरांना शरमेची गोष्ट आहे.

    

                आज शहापुर तालुका झपाट्याने विकसित होत आहे . आता हे बदल जमिनी विकुन का सरकारी पातळीवर होत आहेत हा जरी चिंतनाचा विषय आसला तरी बदल होतोय हे वास्तव आपल्याला स्विकारावेच लागेल. आता बदल आला म्हणजे सरकारी कागद नाचनारच आणि आर्थात सरकारी कागद नाचवायचे म्हणजे सरकारी बांबुचा भाव वधारतोयच आज शहापुर मधली सगळ्याच सरकारी आँफिसेस मध्ये एकदा चक्कर टाकुनच बघा म्हणजे तुम्हाला कळेल या खादाड सरकारी बाबुचा भाव किती वधारलाय ते . रेशनिंग आँफीस पासुन ते रजिस्टर आफिस , पोलीस स्टेशन ते तहसिल कार्यालय सगळ्याच ठीकानी खादाड आणि मस्तवाल सरकारी बाबुची मस्ती आपल्याला पाहायलाच मिळते . किंबहुना लाच दिल्या शिवाय किवा लाच घेतल्या शिवाय कोणतेही सरकारी काम होतच नाही आसा शिष्टचार दुर्देवाने रुढ होतेय की काय आशी शंका येते . 5 रु. पासुन पाच लाख पर्यच ची लाच दिली आणि स्विकारली जाते हि आमच्या ग्रामीन भागातली व्यथा आहे . आज पंचायत समिती ग्रामपंचायत किंवा तहसिल कार्यलये हि तर भ्रष्ट्राचाराची उगमस्थाने आहेत जन्म दाखल्या पासुन ते जातपडताळनी दाखल्या पर्यत सगळे दाखले लाच दिल्या शिवाय क्वचितच मिळतात . त्यात गटशिक्षण आधिकार्याच्या लाच प्रकरणा मुळे इथल्या भ्रष्ट आधिकार्याना जरी धाक बसला आसला तरी आश्या कारवाया नेहमीच व्हायला पाहिजेत. त्यासाठी जनतेने पुढाकार घेने आवश्यक आहे. भ्रष्टाचर हा देशाला मारक आहे , जर उद्याच्या सुसंस्कूत नागरीक घडवनार्या शिक्षण खात्यात येवढा अंधार आसेल तर भावी पिढी काय प्रकाश पाडनार आहे याची कल्पना न केलेली बरी. भ्रष्ट्राचाराने आज कमालीचे टोक गाठले , तुम्ही प्रतिकार केला तरच भ्रष्ट्राचाराचे काळे भुत आपण संपवु शकतो, फक्त सुरुवात स्वःता पासुन करायला हवी .  भ्रष्ट्राचार निर्मुलनाची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे . दूष्ट्रीकोण बदला तर विचार बदलतात , त्याने केले म्हणुन मी करील ही प्रवृत्ती कुठे तरी थांबली पाहीजेत , स्वःताशी प्रामाणिक राहा .पैसा संपत्ती गाडी बंगला या गोष्टी पेक्षा नितीमत्ता महत्वाची !

        आज एका सरकारी बाबुच्या नितीमत्तेचा पर्दाफाश झालाय उद्या कदाचीत आसे आसंख्य खादाड मग्रुर मस्तावाल सरकारी बाबुचे काळे चेहरे उजेडात येतील फक्त तुम्ही आम्ही जागरुक राहीलो तर लाच देन आणि घेने हा ए प्रकारचा देशद्रोह आहे .  लाच मागणार्याना प्रतिकार केला तरच हे मस्तावाल बाबु ताळ्यावर येतील आन्यथा भ्रष्ट्राचाराचा मोकाट सुटलेला वळु भविष्यात तुम्हाला आम्हाला आवरने कठीन जाईल यात शंका नाही.�


Friday 21 December 2012

भांडवलशाहीः गुलामीचे डोहाळे



एकविसाव्या शतकात पदार्पण करुन एक दशक लोटले तरी आज आपल्या देशा पुढील आव्हाने आजुन काही कमी होत नाहीत. आणि आम्ही जगतिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहतोय, किती हस्यास्पद आहे ? वाढती लोकसख्या , बेकारी , भ्रष्ट्राचार , आत्याचार , एकंदरीत सगळ्या कायदेसुवस्थेचे बारा वाजलेत आसो या मागची कारणे शोधली तर एक मुख्य कारण आपल्या समोर येते ते म्हणजे, काँग्रेस सरकारची चुकीची धोरने आणि संकुचीत विचारसारणी. आणि याच मुख्य कारणा मुळे देशात काही वर्षात आराजकता माजेल यात शंका नाही .

    सध्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आर्थमंत्री आसतांना अँडाम स्मिथ च्या 200 वर्षापुर्वीच्या मुक्त भांडवलशाही आर्थव्यवस्थेचा स्विकार केला . आणि भारतात सरकारी उद्योगांच्या खाजगीकरणाचा पाया घातला. मुक्त भांडवलशाही म्हणजे 200 पुर्वी अँडाम स्मिथ ने  1776मध्ये वेल्थ आँफ नेशन्स नावाचा पाच खंडाचा ग्रंथ लिहला त्यात त्याने आसे म्हटले की प्रत्येक व्यक्ती स्वःताचे जास्तीत जास्त हित साधते प्रत्येक व्यक्तीला सरकारने अनिर्बंध मोकळी दिली तर प्रत्येक व्यक्ती आपले कमाल हित साध्य करील आणि आपोआपच समजाचे हित होईल. यात फक्त सरकारने कायदा सुव्यवस्था संभाळावी . वर वर मोहक वाटनार्या या मुक्त भांडवशाही आर्थव्यवस्थेने आगदी उलटे केले आणि संपुर्ण देशाचे वाट्टोळ व्हायची वेळ आली तरी सरकार आजुन झोपाच काढतयं का ? आज टाटा बिर्ला रिलायन्स सारखे भांडवल दार  देशातल्या सगळ्याच उद्योगांत मुक्त संचार करत आहेत . मानवी गरजा आसनार्या A TO Z उत्पदनात या बड्या उत्पकांची मक्तेदारी सुरु आहे

              या स्पर्धेत छोट्या छोट्या व्यापारी देशोधडीला लागले आहेत एंकदरी हा देश भांडवलदारांचा गुलाम होतो की काय आशी शंकेने सर्वसामान्य नागरीक बेजार झाला आहे. एकीकडे गँस पासुन रोशन पंर्यत सगळ्याच सेवा सुविधा सरकार नाकारत आहे . आणि एकिकडे भांडवल शहा जनतेची प्रचंड लुट करत आहे . आता या दुष्टचक्रातुन सुटका करण्या ऐवजी सरकार फक्त भ्रष्ट्राचार आणि स्वहित करण्यातच मशगुल आहे या पेक्षा दुर्देव ते कोणते पुढे काही वर्ष आसेच सुरु राहिलेतर आराजकता माजायला वेळ लागनार  नाही . जनता पिचत चालले आधारवड नाही, भविष्यात काय होईल, याची शाश्वती नाही. आशा भिषन परिस्थितीत देशाला सर्वनाशाचे डोहाळे लागले तर नवल काय ?       �


Tuesday 11 December 2012

कोंडीत अडकलेली सेना ...



बाळासाहेब गेले, आणि काही तसाचत बाळासाहेबांचा द्वेष करनारी मंडळीना त्यांच्या नावाचा लौकीक कमी करण्यासाठी राजकारनात सक्रीय झाली . बाळासाहेबांच्या चितेला आग्नि लागते न लागते तोच कुणी तरी वैयक्तीक अकसातुन बाळासाहेबांच्या स्मारकाची बोंब उठवली, भावनेच्या भरात शिवसैनिंकानी साहेबांच्या प्रेमापोटी हि मागणी लावुन आणि साहेबांन विरोधी नेहमीच कटकारस्थान करणार्या चाहटाळांना आयत खाद्य मिळाले. बाळासाहेबांच्या स्मरका वरुन चाललेला वाद आवघ्या महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी दुर्देवी आहे .

              इतिहासात जे जे विर पुरुष झाले मग ते छत्रपती शिवप्रभु आसो छत्रपती संभाजी आसो किंवा बाळासाहेब आसो काही ना काही वाद काढायचा आणि या आलौकीक व्यक्तीमत्वानां वादाचा काळा डाग लावायचा. तोच फासा साहेबांच्या निधनानंतर काही तासातच फेकला आणि बाळासाहेबांन सारखे वंदनीय कर्तुत्व ही त्यात बदनाम झाले या सारखे दूर्देव ते कोणते ? आसो साहेबांच्या निधनाने शिवसैनिकांचा मनोधैर्य खचले आहे त्यामुळे काही प्रतिक्रीया जरुर आल्या आसतील त्या फक्त भावना होत्या . आणि त्या डिचवल्या गेल्या म्हणुनच हा वाद झाला .उध्दव ठाकरेंनी आता या वादावर पडदा टाकला आणि तोच शिवाजी पार्क चा विषय आला त्या नंतर शक्तीस्थळ  हे सगळं चाललयं काय ?  बाळासाहेबांच्या जाण्याने सेनेत मोठी पोकळी तयार झाली आहे . उध्दव ठाकरे या धक्क्यातुन सावतात न सावरतात तोच त्यांना चारी बांजुनी विरोधकांनी घेरले आहे . सेनापतीच्या निधना नंतर सेना गाफील झाली का काय ? आसं दृष्य सगळी कडे दिसतय , आर्थात विरोंधकांच्या कोंडीत सापडलेली सेना आता मुत्सद्दी गिरीने वागून तुर्तास फक्त शक्तीस्थळाच्या मागे लागुन साहेबांचा आखेरचा विसावा चौथरा पहिल्यांदा अधिकृत करुन घ्यायचा मागे लागली पाहिजेत. नांमांतर आणि स्मारक थोड्या फुसतीने घेतले तर नक्कीच दोन्ही प्रश्न चुटकी सरशी सुटतील यात शंका नाही. एकाच वेळी दाहा मागण्याशी झुंजून शक्ती वाय घालवन्या पेक्षा एका मागणी वर ठाम राहा हा साधा नियम जरी सेनाने पाळला आर्धी लढाई इथेच जिंकेल आणि साहेबांची किंबहूना बदनामी न होता लौकीक काही आर्थाने तरी वाढेल आसे वाटले तर गैर नाही.

             

           आवघ्या माहाराष्ट्राने साहेबांनवर मनापासुन प्रेम केले त्यातलाच मी एक .साहेबांच्या स्मारकावरुन किंवा साहेबांशी संबधीत कुठल्याही गोष्टीवर काही फडतुस मंडळी वाट्टेल तशा प्रतिक्रीया देतात हे मनाला पटनारे नाही मनातली घालमेल कुठुन तरी व्यक्त केलीच पाहीजेत म्हणुन हा ब्लाँग प्रपंच. बाळासाहेंबाची सेना आणि शिवसैनिक सुज्ञ आक्रमक आहेत तेवढेच संयमी ही आहेत हा सयंम कायम ठेवा बस् !!          �


तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...