Thursday, 9 February 2012

लोकशाही आणी मतदान !!

या लोकशाही आपल्याला दिलेल्या मुलभुत हक्का पैकी मतदानाचा हक्क महत्वाचा आहे. पण गेल्या काही वर्षापासुन होनार्या निडनुकीच्या मतदानाची घटती टक्केवारी हा चिंतेचा विषय झाला आहे. एकविसाव्या शतकात भारत जागतिक महासत्ता होन्याची स्वप्न बघतोय देशात साक्षरतेचे प्रमाण ही झपाट्याने वाढत आहे पण निवडनुक प्रक्रीयेत मतदानाला मिळनारा आल्प प्रतिसाद हाच या देश्याच्या अधोगतीस कारणीभुत ठरु शकतो कारण की देशाची 50% जनता फक्त मतदान करते. आणि या प्रक्रीयेतुन निवडुन आलेले लोकप्रतिनिधी 100% जनतेवर राज्य करतात या मुळेच या देशात आनेक समस्या निर्मान झाल्या आहेत किबहुना लोकशाहीस हे मारक आहे. हे चित्र बदलायच आसेल तर मतदान प्रत्येकाला सक्तीचे केले पाहीजेत आसे मला वाटते पण आसो जागतिकरनाने ग्लोबल झालेलो आम्ही मतदानाच्या दिवशी फक्त एक सुट्टी म्हणून आरामात साजरी करन्या पलीकडे काय करतो ? अत्ताच कर्नाकट विधान सभेत मंत्र्याचे आश्लिल व्हीडीओ प्रकरन पहील्यावर या त्याची पुर्ण आनुभुती येते या देशाच भल करायच आसेल तर मतदान करने सक्तीचे झालेच पाहीजेत. अन्यथा लोकशाही डोलारा कोसळायला वेळ लागनार नाही.

.

१. मतदान हे लोकशाहीतील पवित्र कर्तव्य आहे. हक्कही आहे. कोणत्याही कारणास्तव मतदानाबाबत उदासीन राहू नका. आपला हक्क बजावा, कर्तव्य पार पाडा. स्वतः मतदान करा आणि इतरांनाही मतदानास प्रवृत्त करा.

२. मतदानाचा हक्क वेळेत बजावा. त्यासाठी कोणी आग्रह करण्याची वाट पाहू नका.

३. उमेदवाराचे चारित्र्य, सार्वजनिक कार्य, गुणवत्ता, संबंधित राजकीय पक्षांची आजवरची कामगिरी आणि विविध प्रश्‍नांच्या संदर्भातील भूमिका, यासर्वांचा विचार करून मत द्या.

४. निर्भयपणे मतदान करा. प्रलोभनाला, दडपणाला बळी पडू नका.

५. जात, धर्म, घराणे अशा निकषांवर मतदान करू नका.

६. केवळ दोषारोपांचे राजकारण करणारे, बोलघेवडे आणि कर्तबगार उमेदवार यांच्यात फरक करा. कर्तबगारीला साथ द्या.

७. मतदानासाठी जाण्यास कोणत्याही सुविधा स्वीकारू नका.

८. जातीय, धार्मिक स्वरूपाचा भडक प्रचार आणि अफवा यांना साह्यभूत होऊ नका. मतदानासाठी जाति, धर्मविषयक आवाहनांना प्रतिसाद देऊ नका. समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींना थारा देऊनका.

९. शांतता व सलोखा राखण्यास संबंधित यंत्रणेला मदत करा. निवडणुकानंतरच्या संभाव्य गैरप्रकारांना वाव मिळू नये, याचा विचार आधीच करून मतदान करा.

१०. खोटे मतदान हा दखलपात्र गुन्हा आहे. गैरप्रकारांना हातभार लावू नका. गैरप्रकार उजेडात आणण्यासाठी संबंधित यंत्रणेला मदत करा. हिंसा, दहशत यांना भीक घालू नका. लोकशाही बळकट करण्याचा विचार मनात ठेऊन मतदान करा.

११. मतदान इलेक्‍ट्रॉनिक यंत्राद्वारे असल्याने एकदा बटन दाबल्यावर ते पूर्ण होते. यामुळे मतदान कोणाला करायचे याचा पूर्ण विचार करूनच बटण दाबा.

१२. उमेदवार पात्र नाहीत, असे आपले मत असल्यास तसे जाहीर करून नोंदवहीत नोंदवून नकाराधिकार बजावा. बोटाला शाई लावून घ्या.

१३. आपले मत मोलाचे आहे. त्यावर आपले आणि राज्याचे भवितव्य अवलंबून आहे, विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक मतदान करा.

No comments:

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...