Saturday, 4 May 2024

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्या प्रत्येक पक्षात घुसखोरीची किड  लागल्याने त्या त्या पक्षातील  निष्टांवंत एक तर सतरंज्या उचलतात , किंवा मागच्या रांगेत असतात, तर काही  अडगळीत गेले आहेत, जे टिकून आहेत ते "शिकून" आहेत,त्यामुळे सोईच्या राजकारणाने विरोध पत्करून स्व:ताच्या पायावर धोंडा मारून घेणार  कोण ? पक्षाची तत्व, विचारांची बांधीलकी नसलेल्या व पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सुखदुखात कधीच सामिळ नसलेल्या  आयाराम उमेदवारासाठी पक्षातील नेते, पुढारी, वाईटपणा घेण्यास धजावत नसल्याने एखादी गोष्ट कमावण्या पैक्षा गमाण्याची भीती जास्त वाटत असते.  भिंवडी लोकसभेसाठी भाजपा ऐवजी पंचायतराजमंत्री कपिल पाटील जास्त आपले वाटत असल्याने  विरोधी पक्षातील सर्वच नेते पुढारीच्या तलवारी "मॅन" झाल्याचे चित्र दिसून येतेय,   मुरबाड तालुक्याती राष्टवादीला उमेदवारी नाही, सरकारातील शिंदे गटाला कपिल पाटला शिवाय पर्याय नाही सर्वच पक्षातील नेते पुढारी  कपिल पाटलांसाठी कामकरीत असल्याचे चित्र दिसून येते.
कपिल पाटलांना विरोध करणारा असा कोणताच व कोणत्याच पक्षातील नेता पुढारी समोर येत नाही, उलट विविध पक्षातील नेते पुढारी मागच्या दारांने लोकांच्या नजरा चुकवून त्यांच्या खाजगी भेटी गाठी घेण्यात धन्याता मानित असल्याने वास्तव आहे, भिवंडी लोकसभा हि भाजपाची महाराष्ट भरातील एकेरी निवडणूक ठरते की काय?अशी शंका काही बुद्धीवंत व्यक्त करतात,                                               भाजपाच्या शाखा उपशाखा  कामाला लागल्या आहेत, तर  काही  आमदारांच्या कुबड्यावर  दावा  करीत  मनोरंजन करताना दिसून  येत असले तरी त्यांचे घोडे फरार होऊन कधी टांगा पलटी करतील  हे सांगता येत नाही,    ह्या भिंवंडी लोकसभेसाठी   वैचारिक, सामजिक बांधीलकी नसलेल्या नवख्यांकडून मनोंजन सुूरू असले तरी दोन दगडावर ज्यांच पाय त्याच काही खरं न्हाय हे पाहता  प्रत्येक पक्षातील नेते पुढारी सावध पवित्रा घेऊन काम करीत असल्याने, आजच्या घडीला या भिवंडी लोकसभेच्या निवडणूकीत  तिस-यांदा कपिल पाटिल हॅटट्रिक करणार-  आत्ता लिड किती ! अशी परिस्थिती डोळ्या समोर दिसत आहे,                                               महाराष्ट भरातील भाजपाचा असा एकमेव भिवंडी लोकसभा मतदार संघ हा भाजपासाठी खा कपिल पाटलांचा हा अभेदकिल्ला म्हणावा लागेल, कपिल पाटलांना  विरो़ध करून पायावर धोंडा मारून घेईल कोण ? 
 खा. कपिल पाटलांनी करोडोच्या निधीतून साधलेला विकास हि एक जमेची बाजू आहे, तर केलेल्या कामाच्या विकासावर व कार्यकर्त्यांची फौज त्यांतच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात वाड्या पाडे पिंजून काढत असून त्यांनी केलेल्या कामाची पोहच पावती मागत असल्याने एकंदरीत तिस-यांदा पंचायतराजमंत्री हॅटट्रिक करणार  असं जाणकार आपलं मत व्यक्त करतात !

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...