लक्ष्यवेध - वेध घडलेल्या घटनांचा
सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Thursday 7 September 2023
लोकल ते ग्लोबल दहिहंडी..
आसो पण या महागाईच्या युगात नेत्यांनचे सन ही धुम धडाक्यात साजरे होताय हे मात्र खरे ,आणि आम्ही पण बेशरमा सारखे त्यांच्या आयोजित केलेले सनांच्या इव्हेंट मधे हसत हसत सहभागी होतो बेफामपणे थिरकतो हे काही भुषनावह नाही .
देशात दुष्काळ पडलायं त्याची कोणाला फिकीर नाही आर्धा महाराष्ट्र पाण्या साठी वनवन फिरतोय ,आँगस्ट उजाडला तरी शेतकरी आकाशाकडे डोळे लावुन बसलाय, महागाई वाढत चालली आहे, रुपया घसरतोय , आसाम दंगलीनी होरपळतोय , बेळगावचा आवाज कोणाच्या कानी जात नाही आणि हे नालायक राजकारणी लाखो रुपयांच्या हंड्या बांधत सुटलेत, आणि त्या फोडायला आम्ही झुंजतोय , हि राजकीय मंडळी लाखोंच्या हंड्या बांधुन संस्कृती जपताय ना तशीच थोडी माणुसकी पण जपा ? पुर्वी सन साजरे करन्यान मागे एक उद्देश आसायचा ,सामाजिक एकोपा वाढुन त्या योगे काही तरी चांगला सामाजिक संदेश दिला जात आसे आणि आत्ता सनांच्या नावावर नुसता धिंगाना नंगा नाच, मनोरंजन. देश कुठे चालंलय आणि यांच काही भलतच ! आजच्या युवापीढीला मार्गदर्शन करायच सोडुन आश्या नंगा नाच प्रोत्साहन नेते फक्त भारताचत मिळु शकतात. आसो तो भाग वेगळा.पण मला हल्ली आशा ग्लोबल हांड्या बांधनार्या नेत्यांची आकलेची खुप किव येते.
दरवर्षी केवळ काही तासात दहिहंडी उत्सवातुन करोडो रुपयांची उलाढाल होते कुठुन येतो हा पैसा ? कोण देतो ? स्वःताच्या खिशातुन कोणी दहा थरांसाठी लाख रु. देनार नाही ?कधी याच विचार केलाय का ? दुर्देवाने दही हंडी उत्सव म्हणजे एक राजकिय आखाडा निर्मान झालाय फक्त शक्तीप्रदर्शन आणि प्रसिध्दि साठी तरुणांना झुंजवलल नाचवल जातयं. हल्ली गल्लीतला एखादा चिरीमिरी भाई पण लाख रु. हंडी बांधुन मोठ्या समाजसेवकाचा आव आनतो तिथे मोठ्या राजकिय नेत्यांची बातच निराळी ? आसो आक्कलशुन्य नेंत्यानी दहिहंडी चा ग्लोबल ईव्हेंट केलाय आजची तरुणाई पण त्याला भरभरुन प्रतिसाद देते आणि इथेच राजकारण्यांच फावलं आहे . ज्याला देश घडवायच आहे तोच तरुण या राजकारण्यांचा गुलाम झाला तर आराजकता माजायला वेळ लागनार नाही. सध्याची एकदरीँत परिस्थिती तशीच आहे. तरुणांनो वेळीच जागे व्हा ! आणि गोपाळकाला या पवित्र्य सनाच्या आडुन राजकारन्यानी टाकलेला धुर्त कावा वेळीच ओळखा आन्यथा भ्रष्ट्र राजकारन्यांची हंडी कधीच फुटनार नाही.
Wednesday 13 October 2021
शहापुरच्या दशेला जबाबदार कोण ??
शहापुर ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका गेली कित्तेक वर्ष या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , आणि काँग्रेसची सत्ता पण विकास मात्र शुन्य 70 किमी च्या परिघात आसलेल्या या तालुक्यात डोळखांब,कसारा, घाटघर, किन्हवली, वैतरणा, खर्डी, आसे प्रमुख विभाग पडतात या मध्ये आदिवासी, कुणबी आशा दोन समाजाचे प्राबल्य आसल्याचे दिसुन येते. पण विकासाच्या बाबतीत आजुनही शहापुरचा विकास कागदावरच राहिला आहे . याचे मुख्य कारण म्हणजे अपरिपक्व नेऋत्व आणि उदासिन जनता यामुळे शहापुर तालुका विकासा पासुन वंचितच राहिला आहे .दरवेळी निवडनुकीच्या वेळीला लोकांना मोठ मोठी अश्वासने द्यायची आणि बक्कल पैसा कमवुन स्वःताच्या खिशात घालायचा हाच एक उद्योग इथल्या लोकप्रतिनिधीना चांगला जमतो आणि बिच्चारी जनता रस्ते पाणि आणि विज यासाठी टाहो फोडीत आहे. स्वंतंत्र्या नंतर 70 वर्ष उलटली तरी आजुन हि इथली काही खेड्यातुन तालुक्याच्या मुख्य रस्त्याला जोडनारे रस्ते नाहीत. वाहतुकीच्या सोई उपलब्ध नाहीत. शहापुर बस डेपो च्या मोडकळीस आलेल्या थर्डक्लास बस मधे प्रवास करुन नागरिक हैरान झाले आहेत. एक सरकारी प्रवास जिव मुठीत घेवुन करा अन्यथा खाजगी वाहतुक ही त्याच दर्जाची पण कधी बंड न करनारी ही जनता आजही तसाच प्रवास करत शहापुर पर्यत पोहतचते. रस्त्याची आवस्था तर विचारु नका ! पावसाळ्याच्या सुरुवातीला बनवलेले रस्ते पावसाळा संपेपर्यत वाहुन ही जातात आता शहापुर आसनगांव या मुख्य उदा. घ्या ना ? पावसाळा संपल्या नंतर बनवलेला हा रस्ता आजुन एप्रिल संपत आला तरी आजुन पुर्ण झाला नाही . जर शहापुर तालुक्याच्या दोन मुख्य शहरांना जोडनार्या रस्त्यांची ही अवस्था तर खेड्यांची काय ? आता पाण्याची च्या सोईच बघु शहापुर आजुन हि 140 गाव पाड्यांना टँकरने पाणि पुरवठा केला जातो . मुख्य म्हणजे मुंबई आणि उपनगरांना पाणि पुरवठा करनारा मुख्य तिन धरने याच तालुक्यात आहे तरी 140 गाव पाडे ताहानलेले राहिलेच कसे ? या तालुक्यात पाणि पुरवठा विभागा तर्फे शेकडो पाणि योजना मंजुर केल्या जातात. त्या कशा पुर्ण केल्या जातात हे या लोकप्रधिनिंना सांगायची गरज नाही ! आर्धि कामे तर त्यांचे कार्यकर्ते करतात. त्यामुळे आर्ध्य पाणि योजना तर बंद आहेत . वैद्यकिय सेवा तर पार कोलमडली आहे . उपजिल्हा रुग्नालय तर फक्त नावाला आहे . एकही चांगला डाँक्टर इथे उपचाराला उपलब्ध नाही . पोस्टमार्टेम आणि डेँसिंग पलिकडे इथे काही होत नाही . याच रुग्नालयात काम करनार्या डाँक्टरांनी खाजगी रुग्नालये थाटुन करोडो रु, कमवले पण एकही लोक प्रतिनिधिने त्यांना हिसाब विचारला नाही ? ह्या रुग्नालयात जनतेची प्रचंड लुट होत आसतांना प्रशासन ऐवडे गप्प का ? आश्या आनेक समस्या आम्हा शहापुर करांना भेडसवत आहेत पण एक ही नेऋत्व यावर आवाज का उठवत नाही . कारण एकच शहापुरचे सगळे राजकारन "स्व केंद्रीत" झाले आहे . इथल्या सगळ्याच राजकारण्याना स्वर्था पलिकडे काही दिसत नाही. फक्त आपापल्या कंपुचा विकास कसा होईल या चिंतेने ग्रासलेल्या या भाडखावुंना समाज हिताची कसली आली जान !! स्वतंत्र्या नंतर 70 वर्षानी देखील आजुन आम्ही रस्ते पाणि विज यावरच आडकुन पडलोय या वरुन या दळभद्री राजकारण्यांनी आत्तापर्यत काय सांगायला नको . आता पर्याय एकच आहे पुढच्या निवडनुकित यांना धडा शिकुन सुशिक्षित समाजहिताची जान आसलेला लोकप्रतिनिधी निवडुन दिले तरच काही बदल घडु शकतो अन्यथा पुढचे पाच वर्ष पुन्हा तेच !!
post by lakshvedh
Saturday 21 September 2019
या विधानसभा निवडनुकीत बिगर आदिवासिंचा मुद्दा कळीचा ठरनार का??
✍🏻 प्रशांत गडगे
संपादक-सा. विचारमंथन
नुकताच निवडनुक आयोगाने पत्रकार परीषद घेवुन महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यामुळे राजकिय आखाड्यामधल्या तालमी जोरात सुरु झाल्या आहेत. जशी जशी निवडनुका जवळ येतील तशा तशा या तालमी आणि कार्यकर्त्यांच्या कुस्ता जोरात पाहायला मिळतील यात शंका नाही, एकंदरीत निवडनुका हा लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव जरी आसला तरी या उत्सवात उडनारी राजकिय धुळवड, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची सोंग पाहुन एक महिना जनतेचे मनोरंजन होनार हे मात्र नक्की आहे.
शहापुरात मात्र आचारसंहिता घोषीत होण्याआधीच राजकिय आखाडे तापले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.एकीकडे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश घेवुन शिवसेनेतील पाच इच्छुक उमेदवारांची चांगलीच गोची केली आहे.त्यामुळे सध्यातरी तालुक्यात सर्वत्र विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवार यांतील संघर्ष याचीच चर्चा सुरु आहेत. या चर्चेतुन सध्यामितीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,काँग्रेस सह भाजप व इतर पक्ष पुर्णपणे बाहेर पडले आहेत.आसो
सन 2014 च्या विधानसभा निवडनुकीत शहापुर तालुक्यात नव्यानेच चर्चेला आलेल्या अनुसुचीत जमाती राखीव भागात नोकर भरतीत 100% आदिवसिंना अरक्षण देण्याच्या शासनाच्या अध्यदेशा विरोधात बिगर आदिवासी हक्क बजाव समिती द्वारे मोठ्या प्रमानात जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे त्या निवडनुकीत या अध्यादेशाचा फटका तत्कालीन आमदार दौलत दरोडा यांना बसुन त्यांचा पाच हजार मतांनी निसटता पराभव झाला होता.आत्ताचे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा यांनी त्यावेळी हाच मुद्दा उचलुन घेत निवडनुकीत आश्वासन देत बरीचशी बिगर आदिवासींची मते मिळवली होती. पण दुर्देवाने बिगर आदिवासिंनी 100% आदिवासी नोकरभरती अरक्षणाला विरोधात सुरु केलेल्या आंदोलनाला आजुनही यश आले नाही, त्यामुळे 100% अरक्षणाचे भिजते घोंगडे कायम आहे.
गेली पाच वर्ष बिगर आदिवासी हक्क बचाव समिती न्यायालयात व रस्त्यावर उतरुन लढा लढते आहे. पण बिगर आदिवासी समाजाची आपल्या न्याय हक्क प्रती आसलेली उदासिन भुमिका पाहता अंदोलने ज्या तिव्रतेने व्हायला हवीत तशी होत नाहीत. त्यामुळे शहापुर तालुक्यातील आनेकांनी याचा वापर फक्त आपल्या राजकिय पोळ्या भाजण्यासाठी केला तर काहीकांनी मोठ मोठ्या मंत्र्यांनसोबत फोटो सेशन केला. या आंदोलनामध्ये फोटोसेशन केलेले बहुसंख्य बिगर आदिवासी नेते नंतर च्या अंदोलनांन मध्ये फिरकलेच नाही हे वास्तव आहे.त्यानंतर शासनाकडुन दुत बनुन आलेले आमदार किसन किसन कथोरे यांनी उपोषन संपवल्यानंतर काही प्रतिक्रीया दिल्याचे आठवत नाही.त्यामुळे निवडनुकी पुरता काही काळ बिगर आदिवासिंच्या भावनेला हात घालुन या मुद्द्याच राजकारण केल जाते.आता ही ऐन निवडनुका पाहता काहीकांनी या मुद्द्याच राजकारण करायला सुरुवात केली आहे.बिगर आदिवासी हक्क बचाव समिती कोणतीही आधिकृत भुमिका नसतांना ही कुणी तरी उमेदवार जाहिर केला आहे.मुळात या उमेदवारालाच नोकरभरतील आदिवासिंना 100% आरक्षण आणि बिगर आदिवासिंचा लढा याबबत किती माहिती आहे? हा जरी चिंतनाचा विषय आसला तरी या या निवडनुकीत ही बिगर आदिवासिंचा मुद्दा कळीचा ठरणार का? हा प्रश्न कायम आहे.
Monday 7 November 2016
शहापुर पंचायत समितीचा राम भरोसे कारभार !!
Thursday 25 August 2016
बियर शाँपीनां आवर घालनार कोण ??
शहापुर तालुक्यासमोर कायदा सुव्यवस्थेचे आनेक प्रश्न सध्या आवासुन उभे आसले तरी गांवा गांवाच्या नाक्यांनवर झालेल्या बियर शाँपी मुळे सध्या नागरीक त्रस्त झाले आसल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आघाडी शासनाच्या काळात उत्पादन शुल्क विभागाने गांव तिथे बियर शाँप संकल्पना राबवत गांवा गांवात आधिकृत बियर शाँपींना परवानगी देवुन दारु व्यवसायाला राजमान्यता दिली आहे पण यामुळे जरी राज्याच्या तिजोरी वाढ झाली आसली तरी समाजाच स्वस्थ बिघडले आहे आसे बोलले तर वागवे ठरनार नाही. आज काल नव्याने झालेल्या या बियर शाँपी मुळे गांवा गावात हौदोस घातला आहे. एक अखअकी पिढी बरबाद करण्याच काम या बियर शाँपी कडुन सुरु आहे. एकीकडे शासन बियर शाँपीना आधिकृत परवाने देत आहे तर दुसरी कडे व्यसन मुक्ती साठी लाखो रुपये खर्च करीत आहे आहे. शासनाच्या या दुटप्पी धोरणा मुळे कायदा सुव्यवस्थेवर चांगलाच तान येत आसल्याचे चित्र दिसत आहेत.
गेल्या काही वर्षापासुन महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणिय वाढले आहे. यात चोर्या, दरोडे,खुन मारामारी, बलात्कार आशा घटनांनी वृत्तपत्रांची पाने च्या पाने भरली जातात पण शासनव्यवस्थेवर याचा परीनाम होत नाही. आत्तात कोपर्डी बलात्कारा सारखी लाजिरवानी घटना महाराष्ट्रात घडली. त्या घडनेतील आरोपी बलात्कार करण्या पुर्वी भर चौकात आसलेल्या बियर शाँप वरच दारु पित बसले आसल्याच तपासात उघड झाले आहे. गांवा गावांच्या नाक्यांनवर बियर शाँपी झाल्याने आजच्या पिढीला दारु मिळवने अवघड राहीले नाही. त्यामुळे भर नाक्यावर महिलांची छेड काढनारे किंवा गुंडागर्दी करनार्या बेवड्यांच्या संखेत वाढ झाली आहे.
आज शहापुर तालुक्या सारख्या आदिवासी तालुक्यात जिथे रस्ते विज पोहचले नाहीत तिथे बियर शाँप पोहचले आहेत याच आश्चर्य वाटतंय. आसो पण शहापुर तालुक्यातील गुन्हेगारीत ही याच बियर शाँप मुळे वाढ झाली आसल्याचे काही पोलीसच खाजगीत सांगत आहेत. मटका जुगार बियर शाँपी या सारख्या समाज विघातक व्यवसाय राजरोज पण गांवा गांवाच्या नाक्यावर सर्रास सुरु आहेत. पोलीस ही चिरीमिरी घेवु या कडे काना डोळा करीत आहेत हप्तेबाज प्रशासन आणी सुस्त शासन यामुळे तरुणपीढी बर्बाद होत आहे. सगळेच नियम डावलुन या बियर शाँपी कुणाच्या आशिर्वादावर सुरु आहेत ? हे पडद्या आडचे हे खट शोधुन यांवर कारवाई करणे गरजेच आहे. हे बियर शाँप जो पर्यंत बंद होत नाही तो पर्यंत गुन्हेगारी कमी होनार नाही.देशाच्या लोकशाहीत लोंकांनी स्व: ता उठाव केल्या शिवाय हे बियर शाँप उखडुन फेकने शक्य नाही. त्या मुळे पुढच्या ग्रामसभेत या बियर शाँपी विरुध्द आवाज उठवला तर हे बियर शाँप उखडुन टाकने नक्की शक्य आहे.
Sunday 14 August 2016
पत्रकारीतेचा बुलंद आवाज दबनार नाही..
पत्रकार प्रियेश जगे यांनवर झालेल्या भ्याड आणि प्रणघातक हल्ल्याला पंधरा दिवस उलटुन गेले तरी पोलीस प्रशासनला या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात यश आले नाही. ही जरी चिंतेची बाब आसली तरी पोलीस प्रशासनाचे अपयश या प्रकरणा मुळे अधोरेखित झाले आहे. शहापुर तसा आदिवासी दुर्मग तालुका त्यात ठाणे जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आसल्याने चाळीस ते पन्नास किमी च्या परीघात या तालुक्याचा पसारा वाढला आहे. त्यात ग्रामीन क्षेत्र आसल्यामुळे शासनाच्या विविध योजना या भागात जास्त राबवल्या जात आसुन मुंबईचे भुमाफीया शहापुर तालुक्यात जमिनींवर डोळा ठेवुन आहेत. त्यात अनेक छोटे मोठे बिल्डर तालुक्यात तयार झाले आहेत. या बिल्डरांची अनाधिकृत बांधकामे, शासकिय योजनांतील भ्रष्टाचार,किंवा कोणताही अडला नडला सामान्य नागरीक आसो यांच्या समस्या शहापुर तालुक्यातील पत्रकार नेहमीच मांडत आसतात. आपल्या निर्भिड लेखनीच्या माध्यमातुन जाब विचारुन संबंधीत यंत्रनेला सळो की पळो करुन सोडतात व पत्रकारीतेच्या माध्यमातुन अनेकांना ज्ञाय मिळवुन देतात.पण राजकिय नेते, बिल्डर, भष्ट्राचारी,अत्याचारी या सगळ्यांशी दोन हात करुन झुंज देनारा पत्रकार हा नेहमीच एकटा आसतो. हे सबंधीतांनी हेरले आसल्याने संपुर्ण राज्यातच पत्रकारांवनर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.
पंधरा दिवसापुर्वी आमचे मार्गदर्शक सहकारी बाळ जगे यांचे चिरंजीव पत्रकार प्रियेश जगे यांना दि. ३१जुलैला सांयकाळच्या सुमारास कुमार गार्डन हाँल समोर आपली चार चाकी वाहन दुरुस्ती करीता गेले आसता तिथे सात ते आठ दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करुन त्यांना जबर जखमी केले. ही साधी घटना नव्हती. किंबहुना शहापुर तालुक्याच्या इतिहासाला काळीमा फासनारी घटना होती. या प्रकरणात खरा सुत्रधार कोण हे जरी पोलीस तपासानंतर कळनार आसले तरी पंधरा दिवस उलटुन गेले तरी पोलिसांना या प्रकरणाचा तपास एक इंचाने पुढे सरकवता आला नाही हे दुर्दैव आहे. प्रत्रकार संघटनांनी याबाबत ठाणे पोलीस आधिक्षक यांची भेट घेवुन त्यांना निवेदन दिले परंतु आजुन त्याचा ही उपयोग झाला नाही. किंबहुना पोलिस विविध कारणं देवुन तपास लांबवीत आहेत आसा आरोप पत्रकार करीत आहेत. त्यातच लोकशाहीचा चौथा अधार स्तंभ म्हणुन माध्यम आणि वृत्त पत्रांकडे पाहीलं जात आसतांना किंबहुना कोणताही मोबदला न घेता प्रशासनाचे, आणि शासन यांचे निर्णय कार्यप्रणाली जनते पर्यत पोचवन्याचे काम माध्यमे करतात पण पत्रकारांवर होनारे हल्ले रोखन्यात शासन अपयशी ठरुन सबंधीत यंत्रनाही मुग गिळुन बसली आसल्याने पत्रकारांवर होनारे हल्ले वाढत आहेत.
शहापुरात सध्याअवैध्य मटका,जुगार, बियर शाँपी, दारुचे धंदे, दारुच्यी भट्ट्या, लाँजेस, सगळ काही तालुक्यात बेलगाम सुरु आसतांना त्यांची इतंभुत माहीती आसलेल्या पोलिस प्रशासनाला पोलीस आधिक्षकांचे अदेश आसुन ही प्रत्रकार प्रियश जगे यांवरील हल्ल्याची उकल करण्यास येवढा वेळ का लागतो हे जरी संशयास्पद ? आसले तरी आशा प्रकारणांनमुळे पत्रकारांनवर हल्ला करनार्या भ्याड आणि गांडु गावगुडांच्या हिम्मतीत वाढ होनार आसुन पत्रकारांच्या लेखनीची धार बोथट करनार्या प्रवृत्तीचा विजय होनार आहे. पोलिसांचे हे अपयश कदाचीत सत्याच्या बाजुने आणि प्रामाणिकपणे समाजहिता साठी झटनार्या पत्रकारांच्या मनोबल खच्ची करनारे जरी आसले तरी आसे शेकडो भ्याड हल्ले छातीवर झेलुन घ्यायचे बाळकडु पत्रकारांना स्वतंत्र्यापुर्व कालखंडातच मिळाले आहे. त्यामुळे कायद्याचे संरक्षण करनार्या पोलिसांनी त्यांच काम प्रमाणिक पणे पार पाडावे अन्यथा आज पत्रकारांवर हल्ले होतात उद्या पोलीसांनवर व्हायला वेळ लागनार नाही. महाराष्ट्रात पत्रकारीतेला एक वेगळा इतिहास आहे. अद्य पत्रकार बाळशास्री जांभेकर,लोकमान्य टिळक, आगरकरांन देशाच्या स्वतंत्र्य संग्रामात नेत्रुत्व केले तर प्र के आत्रे सारख्या धुरंधरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला नाही तर तो जिंकला. वाघाच काळीच आसलेली माणसं समाजहिता साठी पत्रकारीतेत येतात. त्यांचा एक एक शब्द एक एक तोफ आसते आणि त्याच शब्दांनीच आजवर लोकशाही शाबुत आहे. गोर गरीब जनतेला पत्रकारांचा असरा आहे. आश्या गावगुंडाच्या गांडु फडतुस भ्याड हल्ल्याला घाबरतील ते पत्रकार कसले? उलट आमची हिम्मंत आजुन दुप्पट वाढली आहे. असे कितीही हल्ले झाले तरी पत्रकारीतीचे बुलंद आवाज दबनार नाही हे हल्ले करनार्या गांडुनी लक्षात घ्यावे.
प्रशांत गडगे
संपादक
सा. विचारमंथन
Friday 5 August 2016
सावित्रीचा कहर..
कधी नव्हे तेवढा पाऊस या वर्षी संपुर्ण महाराष्ट्रात होत आहे. खर तर दुष्काळाच्या जखमांनवर अलगद हळुवार फुंकर मारनारा हा पाऊस गटारी आमावस्येच्या दिवशी मात्र काळ बनुन आला आणि ४४ निष्पाप नागरीकांचे बळी घेऊन गेला याच वाईट वाटतं. मंगळवारी संपुर्ण रायगड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी सुरु झालेले पाऊस संपुर्ण दिवसभर थांबला नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्वच नद्या दुधडी भरुन आक्राळ विक्राळ रुप घेवुन वाहत होत्या. त्यातलीच एक सावित्री नदी, या नदिवर महाड पासुन पाच किमी वर एक ब्रिटीशकालीन पुल आहे. तिनशे मिटर म्हणजे जवळपास अर्ध्या किमीचा हा विशालकाय पुल सावित्री नदिला आलेल्या पुरात व निसर्गाच्या एका तडाख्यात पाण्यात वाहुन गेला. क्षणात होत्याच नव्हतं झाले पण दुर्देवाने या पुलावर त्या वेळी राज्या परीवहन विभागाच्या दोन बस व पाच सहा चार चाकी वाहने प्रवास करीत होती तीही सावित्री नदीच्या पुरात वाहुन गेली. हि घटना रात्रीच्या किर्र अंधारात आणि मुसळधार पावसात घडली आसल्याने प्रशासन आणि नागरीकांना तत्काळ मदत करणे जमले नसले तरी या कारणाने निसर्गा समोर माणुस किती आगतिक आणि हतबल आहे याचा प्रत्यय येतो.
खर पाहिलं तर सावित्री नदिला पुर येन हि नैसर्गिक अपत्ती नाहीच आहे. पुल कोसळनं म्हणजे मानवनिर्मित हा अपघात आहे..कारण नदि नदिच्या ठिकानाहुन वाहत होती पुल कोसळलाय हा अपघातच आहे. पण त्या दिवशी निसर्गकोपला होता येवढ नक्की आसो दुसर्या दिवशी सकाळी जेव्हा घटना प्रसार माध्यमांना कळाली तो पर्यत शोधकार्य सुरु झाले होते. प्रसारमाध्यमे, प्रशासनातले निगरगट्ट आधिकारी, मंत्री, नेते सगळेच घटनास्थळी हजर होतात. जो तो आपल्या परीने आपण कस निर्दोष हे रेटुन सांगण्याचा केवीलवाना प्रयत्न करतांना पाहीले. यात परीवहनमंत्र्यांना दोन एसटीत बावीस जन बुडाले याच दुख कमी पण एका बस ड्रायवर ने समयसुचकता राखुन अनेकांना पुलावर जाण्यापासुन रोखल्याच त्वेशाने सांगत होते पण बुडालेल्या बस आणि प्रवाशांचे काय ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. हि सगळी दुर्दैंवी घटना घडुन सोळा तास उलटले तरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता घटनास्थळी हजर नव्हते. ते जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा करायचे ते नाही तर भलतेच उद्योग करुन बसले. एका माध्यम प्रतिनिधीने विचारलेल्या खोचक प्रश्नाला उत्तर न देता माध्यमांच्या कार्य प्रणालीचा उदो उदो करुन पत्रकारांना धकाकाबुक्की करुन धाककपटशाहीचा प्रयोग केला तर एकी कडे मुख्यमंत्री प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधत आसतांना महाशय निसर्गसहलीला यावे तसे आपले स्वता:चे पुलावरुन सेल्फी काढण्यांत दंग आसल्याचे समोर आले आहे. किती ही असंवेदनशिलता ! ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहोत, त्याच जिल्ह्यात घडलेल्या एका दुर्दैंवी घटनेमुळे अनेक नागरीकांचा बळी गेलाय तिथेच फोटो काढण्यात कुठली आली मर्दांनगी ? हे या महाशयांना कळायला हवे होते पण दुर्देव तसे घडले नाही.भारतीय जनता पार्टीवर लोकांनी विश्वास टाकुन बहुमताने सरकार निवडुन दिले आहे. विनयशिल मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडनवीस यांची महाराष्ट्रात ओळख आहे. पण त्यांच्याच मंत्रीमंडळात मंत्री जनतेच्या भावनेचा अनादर करुन बेलगाम वक्तव्य व कृती करीत आसतील तर यावर सकारने नक्कीच चिंतन करुन आशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला पाहीजेत ही जनतेची मागणी आहे.
सावित्री नदिवरचा हा ब्रिटिशकालीन पुल शंभर वर्ष जुना आसुन तो वाहतुकी साठी सुरक्षीत नव्हता आसे ब्रिटिशांनी व तसेच स्थानिक वृत्तपत्रांनी सांगुन सुध्दा सरकारने आणि प्रशासनाने वेळ काढु भुमिका घेवुन हा पुल वाहतुकीलाठी खुला ठेवला. निसर्गाच्या प्रकोपा पुढे हा पुल टिकला नाही याच दुख नाही पण यात अनेक निप्षाप नागरीकांचा बळी गेला.सरकार आणि प्रशासनाच्या दिगंराई मुळे अनेक संसार उघड्यावर पडले, घरातली कर्ती माणसं गेली याच दु:ख आहे. मागच्या वर्षी उत्तराखांड मधे ही ढग फुटी झाली हजारो माणसे मेली, २६ जुलै ला मुंबईत निसर्गाचा प्रकोप झाला तिथेही माणसं मेली पण सरकार आणि प्रशासन यातुन काही धडा घेत नाही. निसर्गाचा समतोल बिघडलाय तो कुठे ना कुठे कोपनार हे माहीत आसुनही आपण धडा घेवुन आपल्या चुका सुधारत का नाही ? घटना घडुन गेल्या नंतर खडबडुन जागे होऊन टाहो फोडण्या पेक्षा आधिच जर उपाय योजना केल्या असत्या तर आज शोक करण्याची वेळ आलीच नसती. सगळी कडे चमडी बचाव धोरण स्विकारनारे प्रशासनातील आधिकारी सबंधित मंत्री या सर्व दुर्घटनेला दोषी आसुन या सर्वांवर सदोष मनुष्यवधाची कारवाई होवुन कडक शासन होने गरजेचे आहे. दरवेळी नैसर्गिक अपत्ती येते आपण हतबल होवुन पाहत राहतो. अनेक निष्पाप नागरीक यात मारले जातात. चार चार दिवस शोधमोहीमा सुरु राहतात तरी हाती काही विषेश लागत नाही, हे अपयश कोणाच आहे ? सरकारनेच, प्रशासनाने, तुम्ही आम्ही सर्वांनी याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे आसुन पुढे आशा दुर्घटना घडु नये म्हणुन कायम सावध राहीले पाहिजेत. एकमेकांना साह्या करीत आशा नैसर्गिक अपत्तीत होणारी किमान जिवीतहनी तरी रोखता आली तरी पुष्कळ होईल. बाकी चौकशा दोषारोप पत्र नंतर होतच राहतात. पण ज्या कुटुंबाचा माणुस यात दगावतो त्या कुटुंबाची होनारी हनी ही न भरुन येनारी आसते हे अंतिम सत्य आहे. या दुर्घटनेत ज्ञात आज्ञात मृत्यु पावलेल्या सर्व मृत्यु पावलेल्या सर्व नागरीकांना सा. विचारमंथन परीवारा कडुन भावपुर्ण श्रध्दांजली.
प्रशांत गडगे
संपादक
सा. विचारमंथन
लोकल ते ग्लोबल दहिहंडी..
लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...
-
एकी कडे कुंभमेळा आणि एकीकडे आमच्या महाराष्ट्रात दुष्काळ , सन 1972 पेक्षा हि भिषन दुष्काळ , लोंकाना, जनावरांना, खायला अन्न नाही पाणी नाही, फक...
-
शहापुर तालुक्यात खुप वर्षानंतर लाच लुचपत आधिकार्यानी छापा टाकुन गटशिक्षण आधिकार्याला 20 हाजार रुपयाची लाच घेतांना रंगे हात पकडुन अटक केली. आ...
-
निवडनुकीच्या तोंडावर आलेला प्रजासत्ताक दिन या देशातील राजकारन्यासाठी प्रचाराची आणि आपले बेगडी देश प्रेम व्यक्त करन्याची सुवर्ण संधी आहे अस म...