Friday, 29 June 2012

धाव विठ्ठला....

आज आषाढी एकादशी अर्थातच अवघ्या वैष्णवांचा अंनंद सोहळा. लहानपणा आषाढी एकादशी ओढ आणि उत्कंठा काय असते ती आजोबांन कडे पाहून नेहमीच अनुभवतो पण हा अंनद सोहळा पाहण्याच भाग्य अजुन नशिबी आलं नाही तो भाग वेगळा पण टिव्ही आणि वाचुन हा सोहळा किती अंनंददायक आहे याची आनुभुती प्रत्येक वारी पाहून येतेच. वर्षभर शेतात कष्ट करनार्या बळीराज्याच अराध्य दैवत म्हणजे पांडुरंग. म्हणुणच की काय ? काळा मातीतला काळा देव म्हणुनच शेतकर्याना कष्टकर्याना हा जास्त भावतो. भक्त पुंडलीकाची मातृ पितृ भक्ती पाहून स्वर्गीय वैभव झुगारुन फक्त भक्ताच्या हाकेला ओ देवुन अठ्ठावीस युगे एका विटेवर अखंड भक्ताच्या कल्याना साठी उभा राहीलेला कलीयुगातला नामनिराळाचा देव म्हणजे पांडुरंग विठ्ठल !!

फक्त पुंडलीकाच्या च नव्हे तर संपुर्ण भक्ताच्या हकेला ओ देनारा आसा हा पांडुरंग कधी ज्ञात अज्ञ्यात पणे आपल्या हकेला देखील धावलाच आसेल आज लाखो वारकरी वारीच्या निमित्ताने शेकडो मैलाचे अंतर पार कर पांडुरंगाच्या चरनी लिन होण्या साठी वारी करतात अर्थात या पंचवीस दिवसात त्यांचा संवाद असतो अंर्तंमनातल्या पांडुरंगाशी . आणि आषाढी च्या दर्शना नंतर नवी उमेद नव्या आशा घेवुन पुन्हा एकदा नवी झेप घेन्याच सामर्थ्य घेवुन लाखो वारकरी पुन्हा घरी परतत आसतात आसो संत ज्ञानेश्वरांना साठी रेड्याच्या तोंडुन वेद बोलवनारा , संत तुकारामांची गाथा तारनारा ,जनाईच्या घरी दळन कांडनारा आश्या अनेक रुपांत ज्याचे अस्तीत्व किंबहुना चराचरात भरुन उरलेल्या पाडुरंगाची महती मी पामर काय गाऊ पण सध्या परिस्थिती खुप वाईट आहे रे पांडुरंगा शेतकर्याचा कष्टकर्याना हा काळ खुप कठीन आहे एकीकडे निसर्ग साथ देत नाही दुसरी भ्रष्ट्रराजसत्ता. कसं व्हायचं कष्टकर्याच ? शेतकरी आत्महत्या करतोय आणि कष्टकरी करखान्यात मरतोय. आता तुच धावुन ये किंबहुना तशी वेळ आली आहे. आता या राजकारण्यावर विश्वास नाही राहीला,सगळ्याच भल करायला आता तुच धाव रे पांडुरंगा ! नाहीतर तेवढी ताकद तरी दे आमच्यात या मतांध रगेल बेगुमान राजसत्ता उलथवला...आजच्या या दिवशी ऐवढच साकडे घालतोय तुला..
.
आषाढी एकादशीच्या विठ्ठलनादमय खुप खुप शुभेच्छा ।।

Thursday, 14 June 2012

मनसे "राज"

आजचा दिवस आम्हा मनसैनिकांसाठी तसा खासच कारण आज महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व आ. राज साहेबांचा वाढदिवस महाराष्ट्रात खुप नेते आहेत पण इथल्या मातीशी नाळ जुळलेले दोन तिनच नेते महाराष्ट्रात आहेत ते म्हणजे बाळासाहेब शरद पवार आणि राजसाहेब किंबहूना बाकीची भारुड भरतीच ती..पण या तिन नेंत्याची इथल्या भुमीपुत्राची नेमकी नस ओळखली आणि अल्पावधीच आनेक समर्थकांच्या गळ्यातील ताईत बनले यात शंका नाही. बाळासाहेब आणि शरद पवारांच्या पुढे राजसाहेब तसे नवखे आणि तरुणच पण आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दिद सगळ्याच अंचबित करणार्या आनेक लिलया राजसाहेबांनी सहज केल्या .त्यांच्या अदम्य इच्छाशक्ती आणि प्रामाणिक पणा मुळे यशाची आनेक शिखरे त्यांना पार पाडली. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या माध्यमातुन आनेक तरुणांना एकत्र करुन महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नवनिर्मानाची नांदी दिली.
आज राज ठाकरे या नावा भोवती एक वेगळच वलय निर्मान झालंय, उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्न डोळ्यात साठवून लाखोंच्या संख्येने तरुण राजसाहेबांच्या मागे उभे आहेत. अन्याय अत्याचार आणि मराठी आस्मिते साठी राजसाहेबांनी नेहमीच संघर्ष केला मग तो रस्त्यवर आसो वा रस्त्याबाहेर, म्हणुनच आजच्या युवा पिठीच्या गळ्यातले ताईत आहेत. आसो सांगायच झाल तर खुप सांगता येईल पण आज शब्द ही भारावुन गेलेत आश्या आमच्या लाडक्या साहेबांचा जन्मदिवस, आई एकवीरा त्यांना उदंड निरोगी अयुष्य देवो हिच सदिच्छा ! त्यांच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढत जावो आणि या महाराष्ट्राच भल होवो हिच आपेक्षा !!

जय मनसे ! जय महाराष्ट्र !!

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...