Monday 7 November 2016

शहापुर पंचायत समितीचा राम भरोसे कारभार !!

शहापुर पंचायत समितीचा राम भरोसे कारभार !!
आसनगांव / प्रशांत गडगे
ठाणे जिल्हा विभाजन आणि सर्वच राजकिय पक्षांनी जिल्हा परीषद निवडनुकीवर घातलेल्या बहिष्कारा मुळे ठाणे जिल्हा परीषद गेली दिड वर्षापासुन बरखास्त आहे. त्यात जिल्हा परीषदेच्या सर्व कारभाराची सर्व सुत्र प्रशासक हाकत आसल्या मुळे प्रशासकिय आधिकार्यांची चांदी आली आसुन सर्वसामान्य नागरीकांची कामे खोळंबली आसल्याच्या तक्रारीत लक्षणीय वाढ झाली आसल्याची धक्कादायक माहीती समोर येत आहे. शहापुर पंचायत समितीची हीच अवस्था आसुन मुजोर आणि कामचुकार आधिकार्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका आसलेल्या शहापुर तालुक्याचा विकास ठप्प झाला आसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका म्हणुन शहापुर तालुक्याची ओळख आसुन भौगोलिक दृष्ट्या शहापुर तालुक्याचे क्षेत्रफळ ही मोठे आहे. त्यामुळे येथिल गोर गरीब आदिवासी व इतर जनतेला शासकिय कामासाठी वीस ते चाळीस किमी चा पल्ला पार करुन तालुका मुख्यालयात यावे लागते. गेल्या दिड वर्षापासुन ठाणे जिल्हा परीषद बरखास्त आसल्यामुळे शहापुर पंचायत समितील कामचुकार आधिकार्यांची चांदि आली आसुन नागरीकांसाठी आसलेल्या अनेक योजना बारगळल्या आहेत. इथला आधिकारी वर्ग फक्त ठेकेदारांची विविध बिले काढण्यात दंग आसल्याचे चित्र समोर येत आहे. शहापुर पंचायत समितीच्या गट विकास आधिकारी एस.कुलकर्णी मँडम यांचा आधिकार्यांनवर वचक नसुन नागरीकांच्या अनेक तक्रारींना सर्रास केराची टोपली दाखवली जात आसल्याची माहीती मिळते. तसेच शहापुर पंचायत समिती कडुन राबवन्यात येनार्या विविध विकास कामांन दर्जा बाबत ही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आसुन आरोग्य, कृषी, बालविकास, आणि शिक्षण आशा महत्वपुर्ण खात्यांचा कारभार राम भरोसे सुरु आसल्याचे कळते आहे. पाणी योजनांमधे झालेला प्रचंड भ्रष्टाचार उघडकिस येवुनही दोषीवर आजुन कारवाई झाली नसल्याने आधिच नागरीकांनमधे असंतोष आसुन आगामी पाणी टंचाई ची टांगती तलवार तालुक्याच्या माथी आसुन कुपोषनात ही लक्षणिय वाढ झाली आहे. एकंदरीत पंचायत समिती मार्फत गेल्या दिड वर्षात राबवलेल्या योजना आणि करण्यात आलेली विविध विकासकामे कामे यांची चौकशी होऊन आधिकार्यांच्या वाढत्या मुजोरीला चाप लावने गरजेचे आसल्याची चर्चा तालुक्यात सुरु आसुन सर्वसामान्य नागरीकांनी यापुढे पंचायत समितीत कामे किंवा तक्रारी घेवुन जावे कि नाही हा प्रश्न पडला आसुन नागरीकांनमधे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...