Tuesday 25 October 2011

देशभक्ती आणि आहिंसा ???

काल परवाच प्रशांत भुषन ला काही हिंदुत्ववादी तरुणांनी कोर्टातील त्यांच्या कार्यालयात घुसुन चोप चोपला जेव्हा हि बातमी कळाली तेव्हा वाटलं की काँग्रेस चे कोणी कार्यकर्ते आसतील. पण ज्या वेळी प्रशांत भुषन ने केलेली बेताल विधाने ऐकली तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली. कोण हा प्रशांत भुषन आणि त्याला पाकिस्थान चा ऐवढा पुळका का येतो ? आणि हि विधाने करताना आश्या काही तोर्यात बोलत होता की काश्मिर याच्या बापाचाच आहे का ?
ज्याने फाळणी अनुभवले किंवा फाळनी बद्दल काही वाचल आहे ,त्यालाच कळेळ देशाची फाळनी किती दुर्देवी आसते,अनेक क्रांतीकारच्या बलीदान नंतर हा देश सुमारे दिडशे वर्षाच्या गुलामगीरीतुन मूक्त झाला पण फक्त एका फाळणीनेच या देशातील हजारो हिंदु मुस्लीमांची कत्तल झाली. ज्या अहिंसेच्या पुजार्याने ह्या फाळनीला मान्यता दिली त्याच्यामुळेच या देशात हिंसेचा आगडोंब उसळला तो आजुनही शांत होत नाही .जी फाळनी व्हायला नको होती ती झाली आणि आता पुन्हा परत त्याची पुनरावृत्ती कशा साठी ?
.
प्रशांत भुषन सारखा एक विधीतज्ञ आणि जबाबदार माणसाच्या मेंदुत ऐवढेसडके विचार आसतील तर का नाही या देशातल्या तरुनांची माथी भडकनार!!आणि आशा वेळी भडकायलाच पाहीजेत, ज्या देशाच मिठ खायच आणि त्याच देशाचे तुकडे पाडायचे कुठली आली हीनिती. आधिच या देशात भ्रष्ट्राचार महागाई बेरोजगारी वाढली आहे त्या काँग्रेस सरकारनी तर निचपणाचा तर कळस गाठला आहे. त्यात आण्णा सारख्यासाध्या माणसाने भ्रष्ट्राचारा विरुध्द रनशिंग फुकले आणि देशाच्यातरुणांनी हि आक्षरशा डोक्यावर घेतले त्या मागे अण्णाचे स्वच्छ चारित्र्य आणि विचारसारनी मोठा हात आहे. पण म्हणतात ना वाघाच कातड घालुन गाढव कधी वाघ होत नसतो तसाच प्रकार प्रशांत भुषनने केला आणि याच देशातल्या तरुनांनी त्याला आक्षरशा पायदळी तुडवलाच नाही तर ढुंगनावर लाथा टाकुन सरळ हि केला. त्याच्या या विधानाला जरी काही काही विषेश महत्व जरी नसल तरी आशा प्रवृत्ती या देशातुन समुळ नाश करन्या साठी किवां या प्रवृत्तीना धडा शिकवन्या साठी ज्या धाडसी हिंदुत्ववादी तरुणांनी जो काही पराक्रम केला त्याचे त्रिवार आभिनंदन !!
आणि या पुढे हा देश तोडन्याची कोणी भाषा करत आसेल तर त्याला याच मातीत गाडायला इथले तरुण सक्षम आहेत यात शंका नाही !!
स्वं.सावरकर भगतसिंग यांनी आम्हालाफक्त देशभक्ती शिकवली आहे आहिंसा नव्हे !!
~प्रशांत

Friday 14 October 2011

!! खड्यात गेली लोकशाही !!जिवनं महाग आणि मृत्यु स्वस्त आहे ,
रोजी रोटी साठी धडपनार्या
सामन्यच त्यांच लक्ष्य आहे...

कुठुन येतात? कुठे जातात?
कुणाला काही माहित नाही,
त्यांनी सांडवलेल निष्पाप रक्त आता आम्हाला पाहवत नाही.....

खुप सहन केल अजुन ही करतो आहे , 
इंडीया स्पीरीट च्या नावाने अजुनही जगतो आहे....

कसलं आल स्पीरीट अन् कसलं काय?
खरचं हतबलते पुढे आम्ही लाचार 
अन् काय ?

रोज आमचं बेभरश्याच राहटगाड,
सरकारी भरश्यावर लोटतो आहोत,
आज नाही तर उद्या मरण येनारच याच भरवश्यावर जगतो आहोत..... 

सरकारच्या कृपेने 
सगळ काही भोगतो आहोत ,
लोकशाहीचा टेँभा जगात मिरवीत आहोत....

खड्यात गेली ती लोकशाही
अन् खड्यात गेलं सरकार
आमच्या रक्षणा साठी आता अम्हीच होवु तयार !!

~प्रशांत

!! आता सिमोल्लंघन झालेच पाहीजेत !!


सालाबाद प्रमाणे यावर्षी पण विजयादशमी आली. बाँम्बस्फोटान बरोबरच माहागाई वाढत असतांनाही आम्ही आगदी धडाक्यात दसरा दिवाळी साजरी करतोय. कारण सरकारी अहवाला नुसार 32 रु पेक्षा कित्तेक पटीने जास्त रुपये दर महीन्याला खर्च करतोय ?? जरी आज 32 रु. एक वेळच पोटभर अन्न जरी येत नसल तरी सरकारने दिलेली झुल आम्ही आगदी अवाक्षर हि न बोलता घेवुन मिरवतो आहो. किंबहुना दहशदवाद ,महागाई घोटाळे नितीमत्ता सगळ्याच गोष्टी वर सरकार आपयशी आसतांना देखील, आम्ही आमच्या सरकारचे गोडवे ईमाने ईतबारे गातोच आहोत. का तर मेरा देश महान ? पण मला नेहमी एकच प्रश्न पडतो ज्या सकारच्या काळात मोठ मोठे घोटाळे होतात, बाँम्बस्फोट होतात, माहागाईने जनता त्रस्त आहे .आश्या सरकारच्या सत्तेत देश महान कसा आसु शकतो. सरकार बेईमान आणि देश महान कस शक्य आहे. 

गरीबाला जिथे दोन वेळ आन्न मिळवन कठीन आहे तिथे सन साजरे कसे होऊ शकतात ? सरकार आज सगळ्याच परिस्थीतीवर मात करण्यात आपयशी ठरले आहे. भ्रष्ट्राचार आणि महागाईचा काळा राक्षस तुमच्या आमच्या मानगुटीवर बसला आहे. दहशदवाद नाक्या नाक्या वर दबा धरुन बसला आहे. कधी आपला घात होईल याची शाश्वती नाही.आशा वेळी आम्ही आमचे सन उत्सव आंनंदात कसे साजरे करु शकतो ? 

आमच्या हिदु धर्मात विजायदशमी ला आन्यन्य साधारन महत्व आहे याच दिवशी रामायनात प्रभु रामचंद्रानी दृष्ट्र रावनाचा वध केला .याच दिवशी आदिशक्ती आंबे मातेने ने महिषासुर या राक्षसाचा वध करुन दृष्ट्र शक्तीचा पुर्ण पराभव केला होता आणि याच दिवशी पांडवानी आज्ञातवास सोडुन कौरवांन विरोधी युध्दा साठी सिमोल्लंघन केले. हाच तो विजयादशमी चा दिवस !! 

सभोवताली सर्व विपरीत घडत आसतांना विजयादशमी चा फक्त एकमेंकाना आंनदाने शुभेच्छा देन्या पेक्षा या दिवसाचे खरे स्वरुप जाणून आता सरकार विरोधात आर्थात महागाई भ्रष्ट्राचार घोटाळे दहशदवादाला पोसनार्या सरकारचे पूर्ण दहन केल्या शिवाय खर्या अर्थने या देशात विजयादशमी साजरी होऊ कशी होऊ शकते !! 

आता सिमोल्लंघन व्हायलाच हवे.. हि तूमची माझी आणि येनार्या पिढीची गरज आहे !!

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...