Monday 2 January 2012

कुणबी समाजाचे राजकारणातील स्थान ???

कालच मी कुणबी या सामजिक संस्थेच्या पहिल्या वर्धापण दिनाला हजेरी लावली, कार्यक्रम तसा भव्य पण समाजातील प्रंचड दुही मुळे गर्दी थोडी कमीच होती. वर्धापण दिनाच्या या कार्यक्रमाला तालुक्यातील स्वःताला कुणबी नेते म्हणुन घेनारे नेते कमीच हजर होते. कार्यक्रमला सुरुवात झाली ती काशिनाथ तिवरे च्या भाषनाने, नेहमीच्याच रटाळ भाषनांना समाजबांधव कंटाळु नये म्हणुन आधीच आयोजकांनी वक्त्याना काही विषय दिले होते त्यातला पहिलाच विषय संपुर्ण राज्यातल्या कुणबी बांधवाना अंर्तमुख करनारा होता तो म्हणजे राजकारनातील कुणबी समाजाच स्थान ?? खरोखर प्रश्न ऐकला खड्रबडुन जागाच झालो. स्वंतंत्र्य मिळून आज सहा दशक आजाडली तरी अजुन आमचं स्थान प्रश्नचिंन्हाकितच राहीलयं. किती मोठी हि कुणबी समाजाची शोकांतीका काशीनाथ तिवरे सारखा चार पावसाळे जास्त काढलेला नेताल्या जर या प्रश्नाच उत्तर सापडले नाही. मग आम्ही तर खुप लहान आहोत. तरी आम्ही या प्रश्नाला थोड अंर्तमुख होऊन थोड बारकायीने विचार केला आणि काही धक्कादायक निकषांनवर येवुन थांबलो.
संपुर्ण राज्यात बहुसंखेने आसनारा कुणबी समाज शेतकरीच समजला जातो.वाडवडीलांन पासुन आलेल्या शेतीवर दिवस भर राबराब राबुन उदरनिर्वाह करनारा आमचा कुणबी जागतिक करणाच्या रोट्या मुळे सहाजिकच प्रगती कडे अकर्षला गेला. तसेच मुळात स्थानिक आसल्याने राजकारनात तसा दबदबा होता तसा आजही आहे. शामराव पेजेच्या नेऋत्वाने पहिल्यांदा कोकणात संघटीत झाला. किंबहुना कोकणात तरी कुणबी समाजाचा राजकारणात मोलाचा सहभाग असुन मुळात कुणबी समाज राजकारणात सक्रीय आसतांनाही आमच्या समाजाच स्थान अजुन आम्हाला ठरवता आलं नाही. हि आमच्या नेत्यांची चुक म्हनावी लागेलं किवा अमच्या समाजाचे अपयश, एकीकडे तुकाराम महाराजांचा वारसा सांगनारे आम्ही आज त्यांची शिकवन विसरलो आहोत, "भले तर देवु कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हानु काठी" आम्ही फक्त एकमेकांच्या लंगोट्या फेडुन इतरांना दिल्या आणि म्हणुनच दुर्देवाने हि वेळ आज अपल्यावर आली आहे. हे हि विसरुन चालनार नाही.
आपसातल्या प्रंचड दुही मुळे हा कुणबी बांधव कधीक एक झाला नाही याची खंत वाटते. सतराशेसाठ राजकीय पक्षामध्ये विघुलेल्या आमच्या समाजाला एकीची किंमत कधी कळालीच नाही.त्यामुळे हाताच्या बोटावर मोजन्या इतकेच मुठभर नेते या राज्याच्या राजकारनात यशस्वी ठरले. आणि दुर्देवाने पक्ष्याच्या जोड्यामुळे समाजासाठी त्यांना काही करता आले नाही. आजही कुणबी समजातील तरुनाला कुणबी पाच नेत्याची नावे सांगता येत नाही ? केवढी ही समजाबद्दलची उदासिनता ?? एके काळी जमिदार म्हणुन गणला गेलेला कुणबी समाज काही दिवसात भुमिहीन व्हायच्या मार्गावर उभा आहे. किती भयान आणि भिषन परिस्थितीतुन समाज चालला आसताना समाजात प्रबोधनाच द्या सोडुन चंगळवाद आणि व्यासनाधिनताच वाढत चालली आहे . हातावर मोजन्या सारख्या काही संघटना समाजासाठी काही काम करीत आसतात पण त्यातही चमकोगीरी कडे आवास्तव आणि समाजहिताला कमी आश्या शायनर तरुणांची भर्ती दिसून येते. यामुळे संघटनेकडे बघन्याचा समाजाचा दृष्ट्रीकोन बदलतो याच भान देखील या कार्यकत्याना राहत नाही आणि समाजाविषयी तळमळ आसलेल्या खर्या कार्यकर्त्यचे यामुळे हिरमुस होतो. आसो आसाच काहीसा प्रकार मी कुणबीचा बाबतीत हि झाला तो भाग वेगळा..
आजही कुणबी समाज कधी एक झाला तर राज्याला त्याची दखल घ्यावीच लागेल. इतर पक्षान साठी रस्त्यावर उतरनारा , डोकी फोटनारा, अक्रमक कुणबी समाज आनेक पक्षाना सत्तेत आननारा पंरंतु स्वाःता सत्तेपासुन लांब राहीलेला असो किवा लांब फेकलेला आसो आमच राजकारणातील स्थान अजुन हि प्रश्नांकितच आहे. हे त्रिवार सत्य !! अंनत गिते आणि किसन कथोरे विश्वनाथ पाटील यांसारखी माणसं अजुनही हिंमतीने समाज बांधनीच काम करतात ते कौतुगास्पद आहे . त्याच बरोबर मी कुणबी सारख्या समाजिक संघटना त्यांच्या या कार्याचे बळ वाढवीत आहेत. त्या मुळे राजेश गडगे विशेष कौतुक. आश्याच कुणबी संघटना ह्या महाराष्ट्रतात स्थापन झाल्या तर दुहि ची मेख आपण मोडु शकतो आणि कुणब्यांची प्रंचड एकी चे एक विराट दर्शन या महाराष्ट्राला घडवु शकतो आणि ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी कुणब्यांच राजकारणातील स्थान प्रश्नांकित नाही तर वलयांकित होईल यात शंका नाही..

1 comment:

Unknown said...

wah prashant chan lihile aahes tu

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...