Thursday, 28 February 2013

निश्चयाचा माहामेरु ..नानासाहेब धर्माधिकारी



आपल्या वडिलांकडुन समाजप्रबोधनाचा वारसा घेवुन वयाच्या तेवीसाव्या वर्षी रेवदंड्यामध्ये श्री समर्थ प्रसादिक आध्यत्मिक सेवा समिती स्थापन करुन केवळ सात समर्थ समवेत घेवुन लाखो समर्थ सेवक निर्मान करणारे महाराष्ट्रातील वंदनीय व्याक्तीमत्व म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी .

        आपल्या 87 वर्षाच्या कारकिर्दित नानासाहेबांनी दासबोध , सद्गुरुचरित्र,श्री मनाचे श्र्लोक, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, आशा सुमारे 20 ग्रंथाच्या आधारे मौखिक निरुपन देवुन आज्ञानामध्ये कुढत बसलेल्या सर्वसामान्य वर्गाला सत्तप्रवूत्तीकडे आकर्षित केले . आनिष्ठ रुढी पंरंपरा , देव धर्माबद्दल अंधश्रध्दा यांना दुर करुन समाजाचे परमार्थिक मार्गाने प्रबोधन घडवुन भक्ती आणी श्रध्दा यांचे महत्व पटवण्याचे काम नाना साहेबांनी केले . याच बरोबर बाल संस्कारवर्ग . बाल व प्रौढ साक्षरवर्ग आगदी विनामुल्य स्वरुपात चालवने , तसेच निरनिराळ्या धार्मिक ग्रंथाचे पुर्नलेखन  करणे व संत व आध्यात्मिक साहित्य विनामुल्य उपलब्ध करुन देने यासारखी आनेक समाज हिताची कामे त्यांनी केली .

      एकविसाव्या शतकात प्रवेश करतांनाच मानसाची दमछाक झाली आहे . विज्ञानाच्या वाढत्या अविष्कारा मुळे  नव नवी यंत्रे बाजारात आली आहेत . सुख सुविधा वाढल्या आहेत आणी या सुविधा मिळवन्या साठी  माणसाची धावपळ ही वाढली आहे. सुख  शोधता शोधता माणसाची शांती हरवली आहे . या गतीमान झालेल्या जिवनशैली तसेच सुखाच्या प्राप्ती साठी तोंड द्यावा लागनार्या स्पर्धामुळे मानसाच्या अंतरी भय, चिंता, संशय ,वाढीस लागला आहेत. त्याच मुळे समाजात विकृती, व्यासनाधिनता वाढत आहे , आणी हिच गोष्ट हेरुन त्यांनी असंख्य समाज बांधवाना एकत्र करुन कधी दासबोधाच्या तर कधी मनाच्या श्र्लोकाच्या माध्यमातुन निरुपण देवुन इश्वर भक्तीने शांती आणि समाधान मिळते हे पटवुन देन्याचे मोलाचे काम त्यांनी केले. हे सर्व करीत आसतांना आपल्या अंतरी ध्येयाप्रती निष्ठा व खंबीर निश्चय आसला तर आजही सज्जनांचे कार्य सफल होते  हे समाजाला त्यांनी दाखवुन दिले . एवढा मोठा प्रपंच उभा करतांना ते निस्पृह  भुमिकेत राहिले. कुठेही आपल्या कार्यचा गजावाजा न करता त्यांनी आपले काम पार पाडले पंरतु चंदन जसे कूठेही राहिले तरी त्याचा सुगंध कधी लपत नाही . तसेच नाना साहेबानी उभारलेल्या या कार्याबद्दल आनेक सामाजिक , शासकिय संस्थानी त्यांचा सत्कार, पुरस्कार आणि गैरव ही केला, पण ते पुरस्कार त्यानी स्विकारले ते फक्त जनतेचे मन राखन्यासाठी आसे त्यांनी आनेक वेळा नम्रतापुर्वक सांगितले आहे . हे सत्कार आणि पुरस्कार मिळावे म्हणुन त्यांनी समाजप्रबोधनाचा वसा घेतला नव्हता त्यामागे एक उद्देश होता . दुःखी, कष्टी, आणि रांजल्या गांजल्या लोकांना सन्मानाने जगता यावे आणि लोककल्याण व्हावे. म्हणुन ते आविरत झटत राहिले. आज या परमपुज्य गुरुवर्य विभुतीची  91 वा स्मृतीदिना निमित्त विनम्र आभिवादन !!

जय जय रघुविर समर्थ !!

प्रशांत गडगे .

सा. भिंवडी प्रभात. �



post by lakshvedh

Saturday, 16 February 2013

दुष्काळातला धर्म !!



एकी कडे कुंभमेळा आणि एकीकडे आमच्या महाराष्ट्रात दुष्काळ , सन 1972 पेक्षा हि भिषन दुष्काळ , लोंकाना, जनावरांना, खायला अन्न नाही पाणी नाही, फक्त दुरवर दिसते फक्त भेगाळलेली जमिन, आणि फाटलेले नशिब, आज कुंभ मेळ्यात जाऊन लाखो करोडो भाविक फक्त पाप धुण्या साठी लाखो लिटर पाणी प्रदुषित करीत आहेत .आणि इकडे आमचा शेतकरी पाण्या साठी टाहो फोडुन धायमोकलुन रडत बसलाय. आसो एकच देवाच्या ह्या किती लिला आम्ही उघड्या डोंळ्यानी पाहत आहोत, फक्त हाताश पणे पाहण्यापलिकडे तरी आजुन काय करु शकतो आम्ही ?

    आसो संवेदना हरवलेल्या बोधट मनाला अजुन किती धार लावु , त्यातच निर्लज्यतेचा कळस म्हणजे आमचे मग्रूर, अय्याश,टुक्कार, दळभद्री नेते. एकी कडे राज्य महागाईने , दुष्काळाने , त्रस्त आहे .आणि हे अकलेचे सडके कांदे लाखो करोडो रु. चे वाढदिवस लग्नसोहळे साजरे करतात . लाज कशी वाटतं नाही यांना, गेंड्याच्या कातडी सारखी जाड कातडीचे हे गेंडे यांना जनतेचा पैसा खान्यापलिकडे येतयं काय ?आम्ही सर्वसामान्या दरवेळी यांच्याच पक्षांना मतदान करणार आणि निवडनुकी नंतर उर बडवत शिव्या शाप देत पाच वर्ष पुन्हा हेच सहन करणार. आसो गेली कित्तेक वर्ष हे चक्र इमाने इतबारे सुरु आहे. पण बदलनार कधी आम्ही ? हा प्रश्न आजुन प्रश्नांकीतच आहे.

     आज सर्वसामान्य जनता दोन वेळचं खान्यासाठी मोहताज आहे . ज्यांना विश्वास ठेवला ते देव पण आज पाठीमागुन अंग काढुन मोकळे झालेत . याच जनतेचे करोडो रु. मंदिर , संस्था देवस्थानांच्या बँक आकांऊंट मध्ये आसेच पडुन आहेत पण एकाही देवाला आसं वाटतं नाही , तो पैसा गरीबांच्या दुःखावर इलाज व्हावा . मतब्बर राजकारी त्याच्या व्याजावर आपल्या पिढ्या पोसताहेत . जे संकटकाळी धावुन येत नाही त्या देवांना अयुष्यभर पुजुन फायदा काय ? आसा प्रश्न गोर गरीब जनतेला पडलाय ? धर्माच मोठ अवडंबर माजयलं कोण कुठे सोन्याच राज सिंहासन देतोय,कोण कुठे मुकूट . तर कोण सोन्याच छत्र. पण खरा देव तर कुठे आहे कोणालाच समजले नाही . मानवसेवा सोडुन माणुस दगडांचा गुलाम झाला . लाखो करोडो रुपये तिथे वाहतो पण मंदिराच्या पुढ्यातल्या भिकार्याला फक्त एकच रु. देतो . हिच किंमत का माणसाची ? आता खरंच वेळ आली आहे देवाने अवतरीत व्हायची 2014 निवडनुकित खरंच देवाने चमत्कार करावा आणि या निच नेंत्याचा घरचा रस्ता दाखवुन एक चांगले सु प्रशासन आस्तित्वाच यावे. जास्त जनहिताच्या माध्यमातुन सरकारने गोर गरीब सर्वसामान्यांच भल करो तोच खरा दैवी चमत्कार आसेल निदान आशी सद्बुध्दी तरी देवाने आमच्या तमाम जनतेला देवो हिच अपेक्षा !!   �



post by lakshvedh

शहापुरच्या दशेला जबाबदार कोण ??

शहापुर ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका गेली कित्तेक वर्ष या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , आणि काँग्रेसची सत्ता पण विकास मा...