Monday 23 January 2012

एकमुखी रुद्राक्ष...... बाळासाहेब ठाकरे !!

.
बाळासाहेबाची रुद्राक्ष तुला पहिली आणी अंनंद झाला. मनात एकच विचार आला की रुद्राक्ष तर आनेक आसतात पण एकमुखी रुद्राक्ष काही निराळाच त्याची तुला शक्यच नाही. संपुर्ण महाराष्ट्रातील किंबहुना हिंदुस्थानातील तमान हिंदुच्या ह्रदयावर गेली सात दशक निर्विवाद वर्चस्व गाजवन्याचा भाग्य बाळासाहेबाना मिळाले त्याचा आज 86 वा वाढदिवस आहे . भारताच्या राजकारनात आता पर्यत साठी उलटल्या नंतर ही आपला दबदबा कायम राखुन ठेवनारे खुप कमी नेते आहेत त्यांमध्ये बाळासाहेब हे अग्रस्थानी आहेत. ज्यांचा एक शब्द आजही प्रमान मनुन आनेक शिवसैनिक दिवस रात्र झटत आहेत. हिंदुस्थानच्या तमाम हिंदु बांधवान मध्ये धर्म जागृती करुन आवघ्या हिंदुस्थानला "गर्व से हम हिंदु है" म्हणत ताठ मानेनं जगायला शिकवले ते बाळासाहेबांनी !!

बाळासाहेब एक तोफ आहे जिच्या तोंडातुन एखादा गोळा सुटला की त्याच क्षणात वनव्यात रुंपारत होतं आणि जिकडे तिकडे फक्त आगच आग, या अगीत हिंदुचा द्वेष करन्याची यात राख झाली हे काही आपल्याला सांगायला नको, पण ही तोफ कधी स्वर्था साठी उडाली नाही हे ही तेवढच खरं ! तर आसो बाळासाहेबाना आमोघ वकृत्वाने आणि सडेतोड विचारांनी हिंदुस्थानातील हिंदुची मने जिंकायला वेळ लागला नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शिवसेनेची स्थापना करुन हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व चा नारा देत त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र काबीच केला. आपल्या आनेक भाषनानंमधुन मोठ मोठ नेंत्याच्या खिल्ल्या उडवत ,टोमने मारत या नेंत्याचा चांगलाच समाचार घेतला. पण यात कधी मुळ प्रश्नांकडे कधीच दुलर्क्ष्य केल नाही. आणि याच मुळे आनेक शिवसैनिकाची त्यांच्याशी नाळ जुळली ती कायमचीच !!

मी ही बाळासाहेबांचा एक निस्सीम चाहता आहे. आज काल लहान मुंलाना राजकारन्याच्या सावलीला देखील उभ नाही करत पण माझ बालपन थोड वेगळ गेलंय, बाळासांहेबाचा विचाराचा झंजावात माझ्या जन्मा अगोदराच आमच्या घरात पोहचला होता 1986 साली आमच्या वडीलांनी गावात शिव सेनेच्या शाखेची स्थापना केली आणि शिवसेनेचे सावली आमच्या घरावर पडली, या सावलीतच आम्ही वाढलो मोठे झालो किंबहुना सकाळ ते संध्याकाळ आनेक शिवसैनिकांचा राबता आमच्या घरातच असायचा त्यामुळे शिवसेनेचे संस्कार या मनावर झालेत आसे म्हटल्यास वागवे ठरनार नाही. शिवसेनेचे तालुक्यातील आनेक निवडनुका, राजकारण आणि बाळासांहेबाच्या विचारांचा समजुन घेन्याचा योग माझ्या अयुष्यात फार कमी वयात आला. बाळा साहेबांची सभा भाषने आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर खुप मोठा आहे. एखाद्याच्या मनात जर घुसले तर कायमचे.. आसा आशी दैवी शक्ती लाभलेले बाळासाहेब म्हणजे अपवादच..!
अतापर्यत त्याच्या आणि शिवसेनेच्या अयुष्यात खुप वादळे आली पण ती सर्व वादळे परतुन लावुन हा विशाल वटवृक्ष अजुन निश्चल उभा आहे लाखो शिवसैनिंकाना प्रेरणा देन्या साठी. बाबरी मशिदी प्रकरनी केलेली वक्तव्य आसो किंवा कोणाला दिलेल्या शिव्या आसो एकदा गेलाला शब्द कधीही मघार न घेनारा... पोटात एक आणी तेच ओठात आसलेला हिंदुस्थानातील एकच नेता बाळसाहेब ठाकरे....
रुद्राक्ष म्हणजे हिंदु मध्ये पुजनीय आणी शुभ शकुन ! यातही एकमुखी रुद्राच दुर्मिळ पण हिंदुस्थानाला बाळासाहेबान सारखा एकमुखी रुद्राक्ष केवळ नशीबानेच मिळालाय हे ही काही कमी नाही....!!

आशा आमच्या लाडक्या हिंदुह्रदय सम्राट बाळसाहेबांना दिर्घायुष्य लाभो हिच आई जगदबें चरनी प्रार्थना !! आणि वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ।।

3 comments:

www.sumbran.blogspot.com said...

chhan chhan sundar bhsha shaili aahe tuzi jap ti

www.sumbran.blogspot.com said...

chhan chhan sundar bhasha shali aahe tuzi jap tila

Anonymous said...

धन्यवाद ! दादा.

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...