Wednesday 28 December 2011

आण्णांच्या आंदोलनाची दशा आणी दिशा ?

.
गेल्या वर्षभरा पासुन अण्णाचे जनलोकपाल विधयका साठी अंदोलन सुरु होते सुरवातीला मी हि या अंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला कारण एकच भ्रष्ट्राचारा विषयी मनात असलेली चिड आणि एका मराठी माणसाच्या अंदोलनाला देशभरातुन ऐवढा प्रचंड पांढीबा मिळत आसतांना आपण शांत का? या नंतर जन लोकपालची पुर्ण माहिती घेतली आणी त्याच वेळी खात्री झाली की सरकार जनलोकपाल संसदेत सहजा सहज मांडनार नाही. त्यानंतर 16 आँगस्ट च्या अदोलनाला मिळालेला पांढीबा आणि सरकारची झालेली कोंडी पाहता खरच या देशातली सगळीच जनता भ्रष्ट्राचाराला वैतागली आहे.आणि जनतेला काँग्रेस सरकारला जो संदेश पोचवायचा होता तो अण्णाच्या मार्फत जनतेने अतिशय योग्य पध्दतीने पोचवला होता. आणि त्याचा धसका सरकारने चांगलाच घेतला, त्या नंतर शहा कटशाहचं राजकारण सुरु झाले टिम आण्णाच(फक्त अण्णा सोडुन) च्या अंगातले काही सुप्त गुण एक एक करुन जनते समोर येवु लागले .अर्थात आँगस्ट मधील अंदोलन विजयाची हवा टिम अण्णाच्या डोक्यात घुसत चालल्याची शंका मनात येवु लागली. जी गोष्ट नको होती तीच गोष्ट प्रकर्षाने जाणवु लागली, मग या मध्ये केजरवाल किरण बेदी वर झालेले भ्रष्ट्राचाराचे आरोपांवर टिम अण्णांनी दिलेली प्रतिक्रीया किंवा प्रशांत भुषन चे काश्मिर विषयी बेताल वक्तव्य असो किंवा अण्णाच्या ब्लांग वरुन राजु परुळेकरशी झालेला वाद आसो किंवा शरद पवारान वर झालेल्या हल्ल्याचे अनावधाने आण्णा कडुन झालेले सर्मथन आसो, प्रसिध्दी माध्यमांना दिलेले अवास्तव महत्व आसो, दुर्देवाने या सगळ्या घटना काँग्रेस ला फायदा देनार्या ठरल्या यात शंका नाही.
.
जनलोकपालच्या अंदोलना लोकाबरोबरच प्रसिध्दि खुप मोलाचा वाटा आहे हे टाळुन जमनार नाही त्यांनी या अदोलनाला ग्लोबल बनवल पण ग्रामीन भागातल्या जनते पर्यत पोचन त्यांना शक्य झाल नाही हे ही तेवढच सत्य आहे. त्यांनतर पुन्हा आण्णानी जंतर मंतर वर एक दिवसाच्या लक्षणिय उपोषन केले आणि तेव्हाच भाजप आणि इतर राजकिय पक्षानी या कायद्याला जाहिर पांढीबा दिला आणि आंदोलनाच्या वाढत्या दबावा पुढे झुकुन काँग्रेस सरकारने जन लोकपाल काहि अंशी संमातर लोकपाल नावाचा अतिशय घाईत काल परवाच संसदेत चर्चे साठी आनला आणि याच वेळी अण्णानी पुन्हा जन लोकपाल मागणी साठी मुंबईत उपोषनाला बसले आर्थात घटनाक्रम सांगन्याचा उद्देश येवढाच की एखादी चळवळ जेव्हा सुरु होते तेंव्हा तिच्या कडे पाहण्याचा लोकमानसाचा दृष्टीकोण वेगळा असतो ,पण ती चळवळ जेव्हा मध्यावर पोचते तेव्हा तिच्यातल्या गुण आणि दोषाचे जाणिव लोकमानसाला होते, आणि याच लोकमानसाची सुरवाती येवढीच अपुलकी चळवळी शेवटा पर्यत पोचलीच तर ती चळवळ यशस्वी होते अस माझ स्पष्ट मत आहे. जनलोकपाल संसदेत जरुर आला आसता अण्णांनी उतावळे पणा न करता थोडी संयमी भुमिका घेणे अवश्यक होते.ती आण्णानी घेतली नाही आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे नेता कमी आणि आनुयायी जास्त बोलायला लागले तर लोंकांची आंदोलना वरची निष्ठा कमी होते. आणि ह्याच गोष्टी भान टिम आण्णांना उरलं नाही.
.
या नंतर संसदेत जी चर्चा झाली खरोखर ती खुप गंभिर होती राजकारण म्हणजे बेआक्कल आणि बेजबाबदार हा जो सर्वसामान्या मध्ये न्युगंड निर्माण झाला होता त्याला काही अंशी छेद देनारी भाषणे या निमित्ताने ऐकाला मिळाली. तर आसो सरकारणे आणलेले लोकपाल बिल भारताच्या सर्वोच्या संसदेने मंजुर केले, काही आसो पण आण्णाच्या आंदोलना मुळे संसदेत लोकपाल कायदा मंजुर झाला याच सर्व श्रेय आण्णान द्यावे लागेल यात तिळमात्र शंका नाही. आण्णा तुमचं आंदोलन आगदी योग्य दिशेला सुरु होत भले मध्ये मध्ये थोड भरकटतं असो आता तर तुम्ही काँग्रेस विरुध्द दोन हात करन्याची घोषना केली आहे . खरोखर ती प्रशंसनीय आहे समोरचा जेव्हा लढायला आपल्या मैदाना येत नाही त्या वेळी नक्कीच आल्याला त्याच्या मैदानात जावे लागते. आणी तुम्ही आता राजकीय मैदानात काँग्रेशी दोन हात करनार आहात यात आम्हाला अंनंदच आहे, तुम्हाला जनलोकपाल अंदोलनात आलेले यश जरी कमी वाटतं आसले तरी आमच्या दृष्ट्रीने खुप आहे निदान भ्रष्ट्राचारा विरोधात सरकारी पातळी वर सुरुवात तरी झाली. फक्त एकच विंनंती आहे विजयाचा हवा डोक्यात जावु देवु नका आणी प्रसिध्दि माध्यमांनवर आजिबात विश्वास ठेवु नका, लक्ष्यात ठेवा पाडन्या साठीच हे तुम्हाला डोक्यावर घेतात.. आता पर्यत ज्या हिंम्मतीने लढलात तसेच कायम लढत राहा देशातली जनता नक्कीच तुमच्या सोबत आहे.


प्रशांत गडगे

No comments:

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...