कालच आचार्य आत्रे रंगमदिरात गिरगाव व्हाया दादर नाटकाचा प्रयोग पाहिला, तसा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचलाच आहे, पण वेळ होता अन् योगायोगानेच या नाटकाचा प्रयोग हि त्या मुळे हे शक्य झाल, एका सत्य घटनेवर आधारीत आणि वास्तवाशी संबध आसलेल्या या नाटकाला तशी तुरळकच गर्दी होती, आणि कोणताही धांगडधिंगा न करता शांततेत नाटक पाहत होती..
या नाटकाची संहिता तशी साधीच पण खुप काही सांगुन जानारी काल परवाच हि घटना घडुन गेली की, काय ? आशी जाणीव करुन देनारी.. अर्थात आज पन्नास वर्ष उलटली तरी जखम ही आजुन ओलीच आहे फक्त थोडी खपली धरली आहे. 105 हुत्म्याच्या बलिदाना नंतर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, आचार्य आत्रे, एस् एम जोशी काँ डांगे आणि अनेकाच्या नेऋत्वाने सतत पाच वर्ष मोरारजी देसाई आणि नेहरु सारख्या लोकांशी संघर्ष करुन मिळवली आहे हि मुंबई...
नाटकाच्या शेवटच्या दृष्यात खुप भयान आणि वास्तवातला एक प्रसंग चितारला आहे मन हेलावनारा आणि डोळ्यात अश्रु येता येता एक सामाजिक बांधिलकीची जाण करुन देनारा. संयुक्त महाराष्ट्राच्या अंदोलनात हुतात्मा झालेल्याची एक विधवा फ्लोराफांऊट जवळ चळवळीच इतिहास आठवत आसते मध्येच एक 14 वर्षाचा मुलगा तिच्या कडे विस्मयाने बघुन तिचा तिरस्कार करुन निघुन जातो. प्रसंग संपतो...
पण प्रत्येक रसिकाला अंर्तमुख करुन जातो..
जी मुंबई महाराष्ट्रात आनन्या साठी ज्या ज्ञात अज्ञात हुतात्म्या नी आपल्या संसाराची राख रांगोळी केली, लाठ्या खाल्या काठ्या खाल्या वेळ आली तेव्हा बलिदान केले त्या हुतात्म्या बद्दल आजच्या या तरूणपीढी ला काहीच माहीती आज शंभर पैकी जेमतेम फक्त 20 तरुणांना या मुबई सह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ माहीत आहे. कीती लज्जास्पद आहे... कारण हा इतिहास कधीच या पिढीला शिकवला गेला नाही सांगीतला गेला नाही.आजही मुंबईला बाँम्बे म्हणुन संबोधनारे कीती मराठी महाभाग मी याच महाराष्ट्रात पाहीले आहेत हेच याच एक ज्वलंत उदाहरण,जसा भारताच्या स्वंतंत्र्य लढ्याचा इतिहास आहे तसाच दुर्देवाने मराठी माणसाला महाराष्ट्रा सहित मुंबई , आम्हाला या दळभद्री कांग्रेस विरुध्द संघर्ष करुन घ्यावी लागली आहे. हा ही एक इतिहास आहे.. हा इतिहास आजच्या तरुणपीढी पर्यत पोचायलाच हवा कारण भविष्यात पुन्हा आसे कुटील डाव होनारच , आणि वेळी रक्तरंजीत इतिहास या पिढीला माहीतच नसेल तर आमची हि मुंबई हातची गेली म्हणुन समजा. हा इतिहास हस्तांतरीत करण्याचे काम आपल्या सगळ्यांच आहे, प्रत्येक मराठी मानसाला आभिमानाने जर मुंबईत राहायचं आसेल तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ प्रत्येक मराठी घरात घरात पोचलीच पाहीजे, जर हा इतिहास पोचलाच नाही आणी उद्या जर यदा कदाचीत मुंबई महाराष्ट्रतुन वेगळी झालीच तर आपल्या कर्माला दोष देत बसु नका !
मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्रत्येक मराठी तरुणा पर्यत पोहचलाच पाहीजेत यासाठी, भविष्यात मुंबई वेगळी करन्याचा प्रयत्न कोणी केलाच तर पुन्हा या क्रांती च्या मशाली सत्ताधार्याच्या घश्यात घालन्या साठी या पिढीला आत्ताच जागे केले पाहीजेत..
.
प्रशांत गडगे
सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Subscribe to:
Post Comments (Atom)
तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
-
शहापुर ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका गेली कित्तेक वर्ष या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , आणि काँग्रेसची सत्ता पण विकास मा...
-
✍🏻 प्रशांत गडगे संपादक-सा. विचारमंथन नुकताच निवडनुक आयोगाने पत्रकार परीषद घेवुन महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचा कार्यक्रम जाहिर केला...
-
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
No comments:
Post a Comment