Wednesday, 21 December 2011

"भारतरत्न" कोणासाठी ??

भारतरत्न म्हणजे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान गेली आता हा सन्मान देशाने कोणाला द्यावा की देवु नये ऐवढे सांगन्या इतपत तरी मी मोठा नाही. पण गेल्या काही वर्षा पासुन सचिन तेंडुकरला क्रिडाक्षेत्रातील भक्कम कामगिरी बद्दल हा सन्मान द्यावा हि मागनी जोर धरीत होती पण क्रिडाक्षेत्रातील कामगीरी बाबत कोणती तरतुद या सन्मानाच्या नियमावलीत नसल्या कारणाने हा विषय लांबनीवर पडला होता पण आता या सन्मानाच्या नियामावलीत तशी तरतुद करुन क्रिडाक्षेत्रातील आणि चित्रपट भक्कम कामगिरी करनार्या खेळाडुना आताभारतरत्न किताब बहाल करता येनार आहे पण मुळ हा मुद्दा की खेळ हे मनोरंजनाचे साधन आहे. पैसा आणि प्रसिध्दी या दोन्ही लयलुट करुन जर भारतरत्न किताब कुणाला मिळत आसेल तर मला मात्र हरकत आहे.
.
खेळांना अताच्या युगात चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत, कारण म्हणजे ग्लोबलनायझेशन आणि काँरपोरेट यंगीस्थान पीढी प्रत्यक्ष मैदानावर खेळन्या पेक्षा खेळ पाहन्यालाच महत्वदेते, त्यात खेळाचे नवीन नवीन ट्रेंन्ड बाजारात आल्याने खेळ सध्या भलत्याच उंचीवर पोचले आहेत. त्यात राष्ट्रकुल चे कलमाडी, पवार साहेब, दालमिया, ही नावे आपल्या चांगल्याच परीचयाची आहेत तर आसो. मुळ विषयाच कडे वळतो भारतरत्न हा भारताचा सर्वाच्च नागरी सन्मान आहे आणि अत्तापर्यत तो 41 जनांना आदरपुर्वक बहाल करण्यात आला आहे. त्यात साउथ आफ्रिकेचे नेँल्सन मंडेलांचा समावेश आहे. हा सन्मान प्रप्त करण्यार्या मध्ये,
1 धोंडे केशव कर्वे
2 पांडुरंग वामन काळे
3 लाल बहादुर शारत्री
4 डाँ भिमराव अंबेडकर
5 विनोबा भावे
6 जयप्रकाश नारायन
7 मदर तेरेसा
8 अब्दुल कलाम
9 लता मंगेशकर
10 भिमसेन जोशी
.
आशा आनेक गुणी आणि समाजासाठी दिवसरात्र झटनार्या, किंबहुना आपले संपुर्ण जीवनच समाजासाठी अर्पण करनार्या या असामान्य व्यक्ती, मध्ये जर क्रिडा आणि चित्रपट या दोन क्षेत्राचा समावेश झाला तर या यादी मध्ये कुठ कुठली नावे झळकतील हे सुज्ञास न सांगितलेलेच बरे आसो या 41व्यक्तीचे कर्तुत्व त्यांच्या नावावरुनच कळते ऐवढे ते महान होते आणिआहेत ही. त्यांची समाजाविषयी आसलेली तळमळ आणि त्याग पाहुनच, भारतातल्या जनतेने त्यांना हा सर्वोच्य सन्मान त्यांना कृतघ्नपणे बहाल केला. आज दुर्देवाने नियमावलीत बदल करुन
क्रिडा आणि चित्रपट या दोन क्षेत्रांचा समावेश करन्याचा विचार सरकार करीत आहे. या वरुन आपली नितीमत्ता किती खाली येत आहे याच दर्शन जगाला आणी आपल्या पुढच्या पिढीला आपन दाखवत आहोत.
.
क्रिडा आणी चित्रपट यांच्या पार्ट्याचे रंगीत वर्णन आपण पेज 3 वर वाचतोच आहेत. क्रिडाक्षेत्रातील आसो किंवा, चित्रपट क्षेत्रातील आसो, जे काम ते देशासाठी करतात त्याचा त्यांना मोबदला हि दिला जातो, आणि प्रसिद्दी ही... आता सचिन च घ्याना काय कमी आहे सचिन कडे क्रिडा क्षेत्रात त्याची कामगीरी माहानच आहेपण सामाजिक कामगीरीच काय ? उद्या अमिताब भारतरत्न मागेल ? परवा बिपाशा,सौफ आली च नाव कोणी तरी सुचवेल तुम्हाला आम्हाला हे पटनार आहे का ? आर्थात नाही मग सरकार का या उठाठेव करतय कळत हेच कळत नाही.
भारतरत्न किताबाचे पावित्र्य खुप मोठे आहे एका चुकीच्या व्यक्तीच्या समावेशा मुळे या सगळ्या मोठ्या असामीचा आपमान होवु शकतो, त्यामुळे सरकारने ही उठाठेव न केलेलीच बरी ? देशातील विकासकामांकडेच लक्ष द्यावे आणि फक्त सामाजकल्याना साठी आणि देशहित आणि देशाच्या सेवेसाठी( कोणत्याही प्रकारचा मलिदा न खाता)संपुर्ण आयुष्य वेचनार्यानाच हा किताब द्यावा तरच "भारतरत्न" खर्या अर्थाने भारतरत्न राहिल अन्याथा त्याला मातीमोल व्हायला वेळ लागनार नाही.

प्रशांत गडगे .

No comments:

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...