भारत हा महात्मा गांधी चा देश आहे, मी तर मुळीच हे मानत नाही पण बहुसंख्य गांधीवादी असे म्हणतात, महात्मा गांधी या देशात जन्मले आणि याच देशात बंदुकीच्या गोळ्या खावुन मेले देशप्रेमा साठी किंवा देशहिता साठी तर मुळीच नाही असे मला वाटते अजुन आठ दहा वर्ष जगलेच आसते तर आजुन कोणते दिवे लावले आसते हे त्यांच त्यांनाच ठावुक ,जगातील कुठे नाही पण भारतात त्यांच्या गांधी वादाचा नामजप हा सगळ्याच जास्त प्रमाणात होतो हे हि तेवढच खंर, आसो, या देशात गांधी मुळे गांधीवादाला एक वलय प्राप्त झालय, इथल्या सरकारी कचेरी पासुन तर चलनी नोटे पर्यत गांधीची छबी दिसते, पण त्याच बरोबर जगात गांधीची सर्वाधीक बदनामी विंटबना कुठे होत आसेल तर या देशात का ? इथे आज ज्या काही घटना घडत आहेत त्या गांधीवादात बसतात का ? याच थोडा विचार करा ना ? सत्य, न्याय, आहिंसा, मानवता, हि तत्व देशात गांधीवादी पाळतात का ? गांधीच्या काँग्रेस पक्षा कडुन तरी हि तत्व पाळली जातात?
राज्यकर्तानीच हि तत्व अक्षरशा पायदळी तुडवली त्याची किती उदाहरने देता येतील भ्रष्ट्राचार करणे, मतदारांना लाच देने, आंदोलन मोडुन काढने. हि तत्व गांधीवादात बसतात का ? 1लाख 76 कोटी रु . महा घोटाळा भारतात झाला, कोणाच्या कृपेने ? एकीकडे जनतेची प्रंचड लूट कारायची आणि दुसरी कडे त्याच जनतेसमोर मतांची भिक मागायची हा कुठला आला गांधीवाद !! गल्ली पासुन दिल्ली पर्यत सगळेच राजकारनी आणि राजकर्ते गांधीच्या नावाचा जय घोष करतात आणि एकीकडे लाचारी,लबाडी भ्रष्ट्राचार कृतघ्नता पाखंड याला उधान आसा उलटाच प्रवास गांधीवाद्याचा पाहायला मिळतो. सत्तेसाठी जनतेशी प्रातरणा हि तर रक्तातच आहे यांच्या, म्हणतात की राजकारनात आणी सत्तकारणात ला गांधीवाद लालबहादुर शास्री निधनानंतर संपला आणि ते खरेच आहे. कुठे ते आणी कुठे आजचे मंत्री...
हिदुस्थानात आज गांधीवाद कमी आणि त्याची मार्केटिंग जास्त सुरु हे गांधीशी काडीचा संबध नसलेला गावगुंड मुन्नाभाई आज गांधी टोपी घालून आज पंचायत निवडुकीत ऐटीत मते मागतो आहे तर कोणी गांधीटोपी घालुनच लाच घेतो आहे. किती भिषन घडतय हे. तो महात्मा बघत आसेल हे तर त्याच्या अत्म्याला किती वेदना होत आसतील हे देवच जानो....
गांधीवादा सारख्या विषयावर लिहिन्याची मुळीच हौस नव्हती पण आत्तच आण्णा हजारे यांच्या गांधीवादावर आक्षेप घेवुन गांधीवादी विचारांची जो अर्थ सांगीतला जातो तो या राजकारण्या आणी काँग्रेसवाल्यांकडुन पाळला जातोय का याचा विचार करायची वेळ आज आपल्या सगळ्यावर आली आहे. गांधीवाद फक्त तोँडात पोटात काही वेगळच आशी आजची परीस्थिती आहे साठ वर्ष फक्त फसणुक केली या गांधीवाद आणि काँग्रेसनी विकास काय शुन्य ?? देशात आत्यचार बलात्कार भष्ट्राचार गुन्हेगारी वाढतेय हे का थांबु शकत नाही गांधीवाद, निवडनुकी वेळी फक्त गांधीवाद आणि इतर वेळी कुठे जातो तुमचा हा गांधीवाद !!
आज देश कुठे चाललाय आण्णा सारखा चारित्र्यवान माणुस याच एक शब्द चुकीचा काय बोलला तर तो गांधीवादाच्या विरोधी किती दिवस झाले तो आहिंसेने सत्या साठी लोकपालची मागणी करतो त्याला गांधीवादाने उत्तर द्यायच सोडुन खोटी आश्वासने देता हाच गांधीच्या काँग्रेस चा गांधीवाद का ? गांधीवाद आम्हाला कधीच पटला नाही आणि पटनार देखील नाही त्याच विरोधच करु पण गांधीवाद्या कडुन गांधीवादाची जी विटंबना चाललेल ती पाहुन हसु ही अवरत नाही. असा गांधीवाद तुम्हालाच लखलाभो, गांधीवादाच सोंग घेवुन जनतेची बरीच फसवनुक तुम्ही केली पण आशा आहे जनता आता शहानी झाली असेल, तुमच्या ह्या सोँगाचा पडदा टरा टरा फाडुन वेशीवर टांगन्याच्या संधी वाट पाहत आहे, हे सगळं पाहतांना मनात सारखा एकच प्रश्न येतो "हा कसला गांधीवाद" ??
प्रशांत गडगे
सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Subscribe to:
Post Comments (Atom)
तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
-
शहापुर ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका गेली कित्तेक वर्ष या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , आणि काँग्रेसची सत्ता पण विकास मा...
-
✍🏻 प्रशांत गडगे संपादक-सा. विचारमंथन नुकताच निवडनुक आयोगाने पत्रकार परीषद घेवुन महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचा कार्यक्रम जाहिर केला...
-
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
No comments:
Post a Comment