Friday 14 October 2011

!! खड्यात गेली लोकशाही !!



जिवनं महाग आणि मृत्यु स्वस्त आहे ,
रोजी रोटी साठी धडपनार्या
सामन्यच त्यांच लक्ष्य आहे...

कुठुन येतात? कुठे जातात?
कुणाला काही माहित नाही,
त्यांनी सांडवलेल निष्पाप रक्त आता आम्हाला पाहवत नाही.....

खुप सहन केल अजुन ही करतो आहे , 
इंडीया स्पीरीट च्या नावाने अजुनही जगतो आहे....

कसलं आल स्पीरीट अन् कसलं काय?
खरचं हतबलते पुढे आम्ही लाचार 
अन् काय ?

रोज आमचं बेभरश्याच राहटगाड,
सरकारी भरश्यावर लोटतो आहोत,
आज नाही तर उद्या मरण येनारच याच भरवश्यावर जगतो आहोत..... 

सरकारच्या कृपेने 
सगळ काही भोगतो आहोत ,
लोकशाहीचा टेँभा जगात मिरवीत आहोत....

खड्यात गेली ती लोकशाही
अन् खड्यात गेलं सरकार
आमच्या रक्षणा साठी आता अम्हीच होवु तयार !!

~प्रशांत

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...