Friday, 14 October 2011

!! आता सिमोल्लंघन झालेच पाहीजेत !!


सालाबाद प्रमाणे यावर्षी पण विजयादशमी आली. बाँम्बस्फोटान बरोबरच माहागाई वाढत असतांनाही आम्ही आगदी धडाक्यात दसरा दिवाळी साजरी करतोय. कारण सरकारी अहवाला नुसार 32 रु पेक्षा कित्तेक पटीने जास्त रुपये दर महीन्याला खर्च करतोय ?? जरी आज 32 रु. एक वेळच पोटभर अन्न जरी येत नसल तरी सरकारने दिलेली झुल आम्ही आगदी अवाक्षर हि न बोलता घेवुन मिरवतो आहो. किंबहुना दहशदवाद ,महागाई घोटाळे नितीमत्ता सगळ्याच गोष्टी वर सरकार आपयशी आसतांना देखील, आम्ही आमच्या सरकारचे गोडवे ईमाने ईतबारे गातोच आहोत. का तर मेरा देश महान ? पण मला नेहमी एकच प्रश्न पडतो ज्या सकारच्या काळात मोठ मोठे घोटाळे होतात, बाँम्बस्फोट होतात, माहागाईने जनता त्रस्त आहे .आश्या सरकारच्या सत्तेत देश महान कसा आसु शकतो. सरकार बेईमान आणि देश महान कस शक्य आहे. 

गरीबाला जिथे दोन वेळ आन्न मिळवन कठीन आहे तिथे सन साजरे कसे होऊ शकतात ? सरकार आज सगळ्याच परिस्थीतीवर मात करण्यात आपयशी ठरले आहे. भ्रष्ट्राचार आणि महागाईचा काळा राक्षस तुमच्या आमच्या मानगुटीवर बसला आहे. दहशदवाद नाक्या नाक्या वर दबा धरुन बसला आहे. कधी आपला घात होईल याची शाश्वती नाही.आशा वेळी आम्ही आमचे सन उत्सव आंनंदात कसे साजरे करु शकतो ? 

आमच्या हिदु धर्मात विजायदशमी ला आन्यन्य साधारन महत्व आहे याच दिवशी रामायनात प्रभु रामचंद्रानी दृष्ट्र रावनाचा वध केला .याच दिवशी आदिशक्ती आंबे मातेने ने महिषासुर या राक्षसाचा वध करुन दृष्ट्र शक्तीचा पुर्ण पराभव केला होता आणि याच दिवशी पांडवानी आज्ञातवास सोडुन कौरवांन विरोधी युध्दा साठी सिमोल्लंघन केले. हाच तो विजयादशमी चा दिवस !! 

सभोवताली सर्व विपरीत घडत आसतांना विजयादशमी चा फक्त एकमेंकाना आंनदाने शुभेच्छा देन्या पेक्षा या दिवसाचे खरे स्वरुप जाणून आता सरकार विरोधात आर्थात महागाई भ्रष्ट्राचार घोटाळे दहशदवादाला पोसनार्या सरकारचे पूर्ण दहन केल्या शिवाय खर्या अर्थने या देशात विजयादशमी साजरी होऊ कशी होऊ शकते !! 

आता सिमोल्लंघन व्हायलाच हवे.. हि तूमची माझी आणि येनार्या पिढीची गरज आहे !!

No comments:

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...