Monday, 4 August 2014

काळ्या सरकारचा, काळा फतवा !!


आत्ताच राज्याचे राज्यपाल यांच्या स्वक्षरीनॆ राज्यात एक काळा फतवा काढला आहॆ. इतरांन साठी जरी हा अध्यादॆश आसला तरी आम्हा शहापुरातील बिगर आदिवासी समाजाची गळचॆपी करनारा काळा फतवाच आहॆ. आनॆक वर्षा पुर्वी दॆशात मॊघलाई हॊती तॆव्हा आशाच प्रकारचॆ मुठभरांन साठी बहुसंख्यावर आन्याय करनारॆ कायदॆ करुन बहुसंख्यांच्या सर्वभौमत्वावर ठॆच पॊहचवन्याची कामॆ कॆली जात हॊती. आशीच मॊघलाई आज शहापुर मध्यॆ सुरु आहॆ
                   शहापुर तालुक्यात कुणबी ,माळी ,मराठा ,आग्री ,बौध्द ,ब्राम्हन, लोहार ,चांभार ,शिंपी, सोनार आशा आठरापगड जातीचे लोक गुन्या गोँविंदा राहत आहेत पंरंतु शहापुर तालुका अनुसुचित जाती जमाती साठी अरक्षित आसल्या मुळे येथे आमदार ,ग्रां पं चे सरपंच , पं सं , सभापती आशी मुख्या पदे ही आदिवासी समाजा साठी अरक्षित आहेत. आर्थात येथे आदिवासी समाज फक्ता ३५% आसतांना सुध्दा  सरकारचा हा आदेश आम्ही गेली कित्तेक वर्प आम्ही मुकाट्याने पाळत आलो आहोत हेच आमचं दुर्देव की काय हा प्रश्न आमच्या पुढे पडला आहे ?आसो एवढ कमी काय की सरकारने दुर्देवी काळा फतवा आमच्या माथी मारला आहे. आर्थात आशा सडक्या कुजक्या कल्पना कोनाच्या डोक्यातुन बाहेर येतात हे शोध घेन्याची वेळ आता समिप येवुन ठेपली आहे. या काळ्या फतव्याच्या विरोधी जनभावना उग्र होत आसुन वेळीच हा फतवा मागे घेतला गेला नाही तर परिनाम वाईट होतील याची सरकारने दखल घ्यावी.  
       सरकारने जो काळा फतवा काढलाय तो आसा आहे " आनुसुचित जमाती साठी राखिव आसलेल्या क्षेत्रामधील  शासकिय आथवा निमशासकिय आस्थापना मध्ये आदिवासिंना १००% आरक्षन आणी बदली ही नाही  " आशा प्रकारचा फतवा काढुन सरकार काय सिध्द करु पाहते. बिगर अदिवासी ६८% आसुनही स्थानिकांनवर नोकरी भरतीत हा आन्याय कशा साठी ? हा प्रश्न आम्हाला पडलाय ? एकिकडे बिगर आदिवासी समाजावर येवढ्या मोठ्या प्रमाणात आन्यायापे घाट घातले जात आसुन ते आम्ही षंढ पने ते सहन करतोय याची लाज वाटते. येवढ्या वर्ष सतत पुढचे स्थान देवुन ही इथला आदिवासी समाज मागासच राहिलाय पण यात तालुक्याचा विकास खुंटलाय गेली कित्तेक वर्ष आमदार यांचाच मग चुक कोणाची ?  बस आता पुरे ! येवढ्या वर्ष आम्ही आन्याय सहन केला आता नाही ,  सरकार ला आता या काळ्या फतव्या विरुध्द जाब विचारावाच लागेल ! आज बिगर अदिवासीची सुक्षिशित पोर मोठ्या प्रमानात बेरोजगार आहेत . त्यांना स्थानिक ठिकानी नोकर्या नाहीत, आणी आदिवासिंना अरक्षनाच्या जिवावर १००% नोकर्या हे दुर्देव आहे .
                          शहापुर तालुक्यात आज ३२% आदिवासी तर ६८%  बिगर आदिवासी समाज आहॆ, जर दॊघांनमधॆ यॆवढी तफावत आसुन आदिवासिंना आरक्षन का?? आसा सवाल बिगर आदिवासी समाजामधून विचारला जातॊ. मॊल मजूरी करुन पॊटाला चिमटा दॆवुन इथला बिगर आदिवासी आपल्या मुलांना शिक्षन दॆत आहॆ. मग नॊकर्यानमधॆ आदिवासिंना आरक्षन दॆवुन सरकार का सिध्द करु पाहत आहॆ , हॆ आसचं सुरु राहनार आसॆल तर इथला बिगर आदिवासी कदापी शांत राहनार नाही. घटनॆची हि पयमल्ली आहॆ. आता वॆळीच या विरुध्द आवाज उठवला नाही तर यॆनार्या पुढच्या पिढ्या बिगर आदिवासी समाजाला कदापी माफ करनार नाहीत. म्हणुनच आता तरी सर्व राजकारन्यांनी एक हॊऊन बिगर आदिवासिंनवर हॊनार्या आन्याया विरुध्द जाब विचारायची वॆळ आली आहॆ. बिगर आदिवासी हक्क बचाव समिती माध्यामातुन जनजागृती सुरू आहॆ . लवकरच हा वणवा पॆट घॆवुन सरकारच्या या काळ्या फतव्या सहीत सरकारच तॊंड काळ कॆल्या शिवाय राहनार नाही आशी आशा वाटतॆ.

Wednesday, 20 November 2013

काँग्रॆस च्या गळाला कुणबी सॆना.

सध्या ठाणॆ जिल्हात कुणबी सॆनॆच्या लग्नाचा डंका जॊरात सुरु आहॆ म्हणॆ 23 तारखॆचा मुहूर्त ठरलाय..दॊन्ही कडची मंडळी आगदि आनंदि आहॆत..पण हॆ एवढ आचानक ठरलं की कुणबी सॆनॆच्या शिलॆदारांना याची काय खानखूनच लागली नाही. साखरपुड्याचॆ आमंत्रन आलॆ तॆ शहापुरच्या पत्रकार परिषदॆत कुणबी सॆनॆच्या व्यसपिठावर काँग्रॆसच्या नॆत्यांची रॆलचॆल वाढली आणि काय तॆ जनता समजली ? आसॊ पण कुणबी नॆत्यांच्या काँग्रॆस प्रवॆशानॆ कुणबी सौनिक हतबल आहॆ. आज त्यांना पडलॆल्या आसंख्य प्रश्नांनी गॊंधलॆल्या परिस्थित हाताश पणॆ तॊ हॆ सगळ पाहतॊ आहॆ. पण लग्नाचा मुहुर्त जवळ आला तरी या लघ्ना मागची नक्की भुमिका काय हे आजूनही कुनबी सॆनॆच्या कॊणत्याही नॆत्यानॆ त्याला समजवुन सांगितलॆ नाही.आणि कुनबी सौनिकांन सहीत समाजबांधवांची उत्सुकता शिगॆला पॊहचली आहॆ.

                    खर सांगायच तर आम्ही कुनबी सॆनॆचॆ कार्यकर्तॆ जरी नसलॊ तरी हितचिंतक जरुर आहॊत, यॆम तॆम महाराष्ट्रात कुणबी समाजा साठी काम करनार्या संघटना तश्या कमीच उरल्यात त्यात कुणबी सॆना ही एक आहॆ. म्हणुनच कुणबी सॆनॆच्या प्रत्यॆक हालचालीवर आम्ही बारीक लक्ष्य ठॆवुन आसतॊ. आत्ता पर्यंत सगळ्याच मुख्य राजकिय पक्षांनी कुणबी सॆनॆला यथॆच्छा वापरुन घॆतली हॆ वास्तव आहॆ . ऐके काळचा सधन म्हणुन ओळखला जानारा कुनबी समाज आज आनॆक संकटांशी एकाकी झूंजतॊ आहॆ. आशा वॆळी समाजाची एकी दाखवनार्या सँघटनाची फार निकड भासतॆ त्यात एक कुनबी सॆना हॊती. आता कुणबी सॆनॆचे सर्वॊसर्वा विश्वनाथ पाटील काँग्रॆसवासी हॊतात म्हणजॆ संघटना ही काँग्रेस प्रणित हॊतॆ की काय ही शंका प्रत्यॆक समाज बांधवाला पडली आहॆ ? जर जिल्हात बहुसंख्यानॆ कुणबी समाज आसतांनी आज पर्यंत सत्ताधार्यानी कुनबी समाजाकडॆ दूर्लक्ष का कॆल ? आणि आत्ता निवडनुकिच्या तॊंडावर काँग्रॆस च्या नॆत्यांना कुणबी सॆनॆची गरज का भासली..? आशा अनॆक प्रश्नानी गॊंधळुन गॆला आहॆ . आता या प्रश्नांची उत्तरॆ स्वभाविक पणॆ विश्वनाथ पाटलांनी द्यायला हवी हॊती पण लग्नाच्या गॊंधळात समाजबांधवला विसलॆ हॆ णात्र नक्की.. आसॊ आज वर कुनभी समाजाचा फायदा सगळॆच घॆत आलॆत पण विकास मात्र कॊणी कॆला नाही. काँग्रॆस च दऴभद्री राजकारन आम्ही जाऩतॊ आहॆत. जॆ दॆशाचा विकास करु शकलॆ नाही तॆ आमच्या समाजाचा काय विकास करतील हॆ आम्हाला ठावुक आहॆ पण विश्वनात पाटलांन सारख्या नॆत्यानॆ यांच्या मागॆ लागु नयॆ यॆवढी माफक आपॆक्षा जर समाज बांधव करत. आसतील तर त्यात गैर काय ?

                          काँग्रॆस ठाणॆ जिल्हातुन हद्दपार व्हायच्या वाटॆवर आहॆ त्या साठी साम काम दंड भॆद वापरुन जिल्हात काँग्रॆस वाढवायचा प्रयत्न जॊरात सुरु आहॆ . आसॊ त्याृच्यशी अमचं काय दॆन गॆन नाही पण यॆवढ्या वर्ष आम्हाला खितपटत ठॆवुन नुसता पक्षवाढी साठी आमचा कॊणी उपयॊग करत आसॆल तर समाजानॆ याृचा विचार नक्की करावा. विश्वनाथ पाटलांना काँग्रॆस मध्यॆ सहभागी करुन
काँग्रॆस नॆ हा कुटील डाव खॆळला आहॆ . आता समाजबांधवानीच ठरवायचं काय करायच ?  प्रत्यॆक वॆळी आम्हाला वॆगवॆगळी आश्वासनॆ द्यायची आमच्या आमच्य आम्हाला झुंजवायचं आणि स्वर्थाच्या पॊळ्या यांनी खायच्या..आता बस पुरॆ झाले !!...कुणबी सॆना एका वॆगळ्या वाटॆवर उभी आहॆ. समाजाचॆ आता हित हॊतॆ हॆ पाहन्याची उत्सुकता लागुन राहीली आहॆ पुढॆ काय वआडलय हॆ कॊणाला ठावुक नाही या सगळ्या संभ्रमात कुणबी बांधवाचच नुकसान हॊनार आहॆ. एवढ मात्र नक्की .. आणि भविष्यात जर कुणबी सॆना काँग्रॆस मध्यॆ विलिन झाली तर कॊणी आश्चर्य वाटुन घॆवु नयॆ..कारन काँग्रॆस मधील नेंत्यानी वैयक्तीक रित्या कॊणी सँघटना चालु नयॆ यावर हायकंमांडचा अक्षॆप आहॆ...तुर्तास थांबतॊ.

Saturday, 16 November 2013

सचिनाय नमॊ: नमॊह:

प्रिय , सचिन.

काल पर्यंत आम्ही क्रिकॆट पाहत हॊतॊ तॆ तुझ्यासाठी , तुझ्यातला शांत संयमी खॆळाडू आम्हाला नॆहमीच भावला..आणि याच मुळॆ तु क्रिकॆट चा दॆव झालास. आता ती खॆळी पुढच्या अनॆक शतकात हॊनॆ नाही. तु आम्हाला निकळ आनंद दिलास .. तुझ्या प्रत्यॆक चौकार आणि षटकारांनी आमच्या आयुष्यातलॆ किती क्षण आनंदानॆ द्विगुनीत झालॆत..तु जॊपर्यत खॆळपट्टीवर खॆळत आसायचा तॆव्हा छाती आभिमानानॆ भरुन यायची..तुझ्यातला तॊ निरागसपणा आता क्रिकॆट मधून कमी हॊईल थॊडक्यात काय तर तूझ्या नसन्यान क्रिकॆट विश्व पॊरकं झालंय..क्रिकेट मधल्या दॆवान आज निवृत्ती घॆतली..आणि क्रिकेट च दैवत्व संपलं...आता आम्ही नुसता खॆळ पाहू पण तॊ झंजावात. ??? क्रिकॆत मधलं एक सुवर्ण युगाची आज सांगता झाली .. पण सचिन तू आमर झालास....आमच्या सारख्या आनेक चाहत्याच्या ह्रदयाचा तु आनाभिषिक्त सम्राट आहॆस . आम्हाला तु दिलेल्या अनंदाची परतफेड होनॆ शक्य नाही ..तुझ्या पुढच्या वाटचालीस शुभॆच्छा !!!

तूझा एक वेडा चाहाता
प्रशांत.

Wednesday, 22 May 2013

क्रिकेट चा तमाशा IPL



क्रिकेट चा तमाशा "IPL"

खेळ पाहने हा प्रत्येक मनुष्याचा आवडता छंद आहे. पण याच छंदात जेव्हा नौटंकी घुसते तेव्हा याच खेळाचा तमाशा होतो, आणि आम्ही भारतीय हा तमाशा हौशीने बघतो आसं कुणी बोलले तर वावग ठरनार नाही. तसा क्रीडा हा आमचा प्रांत नाही म्हणुण आयपीयल वर पहिल्या पासुन लिहायचं टाळतं होतो . कारण या तमाशा बघायला किंबहुना या तमाशाच गुण गाण गाऊन दिड दमडी ची किमंत न देनार्या तमाश्याची फुकट प्रसिध्दी करणे ही मनाला न पटनारी गोष्ट होती. बाकी ज्याच त्यानेच ठरवावे ? महाराष्ट्राचे (अ)जाणते राजे शरद रावांनी राज्यावर दुष्काळाचे आस्मानी संकट कोसळले आसतांना ही आसल्या फडतुस आयपीयल ला 7व्या सिझन साठी मान्याता दिली. आणि दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधकांच्या टिकास्राने बेजार झालेल्या सरकारी मंत्री टट्टुना आपलं काळं तोंड झाकायला थोडी जागा मिळाली.

आवघ्या देशभरातल्या क्रिकेट रसिकांनी अक्षरशा लाखो करोडो रु, चा चुराडा करत या तमाशात भाग घेतला याची खंत वाटते. आणि ज्या दिवशी आयपीयल सुरु झाली तेंव्हाच महाराष्ट्रातला दुष्काळ संपला की काय आशी शंका आली . कारण रोज रोज 24 तास दुष्काळावर गाळा काढनारे टिव्ही पत्रकारांचा गळा सुकला आणि आचानक देशातला एक मोठा उत्सवाच्या थाटात आयपीयल चा तमाशा मोठ्या थाटा माटात सुरु झाला . मग प्रत्येक मँच ला एक नविन विषयं शहारुख चा वानखेडे स्टेडीयम प्रवेश , प्रिती ला स्टेडीयम वर प्रपोझ, चियर्स लिडरचे आचकट विचकट नृत्य आणी आता तर या तमाशाचा काळा पडदा टराटरा फाटला. या तमाशात खेळवल्या जानार्या मँच मनोरंजना साठी नव्हत्या तर त्या जुगारा साठी खेळवल्या जात होत्या. आम्ही भाबडे क्रिकेट रसीक जिवाचा आटा पिटा करुन मँच बघतोय आणि हे भडवे जुगार सट्टा लावुन आमच्या भावनांशी खेळत होते . तो शेंबडा श्रीशांत ज्याला शेंबुड पुसायची आक्कल नाही तो बायांसाठी आपला खेळ विकत होता , किती ही खेळाची आनास्था !!

खेळ हे पवित्र आहेत त्यांना मनोरंजनाचे साधन आहेत. लोंकाच्या भावणा त्यात गुतंलेल्या आसतात आणि त्याच भावनांचा बाजार आयपीयल मधुन मांडला गेला त्यांचा जुगार झाला करोडो किक्रेट रसिकांचा हा विश्वासघात नाही का ? आम्ही रसिंक 500/1000रु. टिकीटे काढुन यांचे हे तमाशे बघतो. पण त्याच वेळी आपल्या राज्यातला दुष्काळ आम्हाला दिसत नाही. तिथे शंभर दोनशे रु. कधी मदत देत नाही . पण हा खेळ नव्हे जुगार सट्टा आम्ही पैसे देवुन चार चार तास चियर्स लिडरची ढुंगन उगाच वाया घालवतो . कुठे चाललाय आपला प्रवास . इतक्या संवेदना बोथत झाल्यात का आमच्या ! दिल्ली पोलिसांच खरंच कराव तेवढ कौतुक कमीच आहे . त्यांनी क्रिकेट मध्ये वाढच चाललेली नौटंकी आणि त्यामुळे क्रिकेट मधला तमाशा वेळीच जनते समोर आनला. हे काम आमच्या महाराष्ट्र पोलिसांन कडुन कधिच झाले नसते कारण आख्खे गूहखाते आयपीयल चे आद्य प्रणेते शरद पवारांच्या हातात आहे. खेळातली हि नौटंकी वेळीच थांबली नाही तर खेळांच रुपांतर तमाशात व्हायला वेळ लागनार नाही. वाचक तुम्ही सुद्य आहात आयपील स्पर्धा भारताच्या खेळ पंरपरेला मारक ठरतात की तारक ? हे ज्याच त्यानेच ठरवावे.�



post by lakshvedh

Thursday, 28 February 2013

निश्चयाचा माहामेरु ..नानासाहेब धर्माधिकारी



आपल्या वडिलांकडुन समाजप्रबोधनाचा वारसा घेवुन वयाच्या तेवीसाव्या वर्षी रेवदंड्यामध्ये श्री समर्थ प्रसादिक आध्यत्मिक सेवा समिती स्थापन करुन केवळ सात समर्थ समवेत घेवुन लाखो समर्थ सेवक निर्मान करणारे महाराष्ट्रातील वंदनीय व्याक्तीमत्व म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी .

        आपल्या 87 वर्षाच्या कारकिर्दित नानासाहेबांनी दासबोध , सद्गुरुचरित्र,श्री मनाचे श्र्लोक, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, आशा सुमारे 20 ग्रंथाच्या आधारे मौखिक निरुपन देवुन आज्ञानामध्ये कुढत बसलेल्या सर्वसामान्य वर्गाला सत्तप्रवूत्तीकडे आकर्षित केले . आनिष्ठ रुढी पंरंपरा , देव धर्माबद्दल अंधश्रध्दा यांना दुर करुन समाजाचे परमार्थिक मार्गाने प्रबोधन घडवुन भक्ती आणी श्रध्दा यांचे महत्व पटवण्याचे काम नाना साहेबांनी केले . याच बरोबर बाल संस्कारवर्ग . बाल व प्रौढ साक्षरवर्ग आगदी विनामुल्य स्वरुपात चालवने , तसेच निरनिराळ्या धार्मिक ग्रंथाचे पुर्नलेखन  करणे व संत व आध्यात्मिक साहित्य विनामुल्य उपलब्ध करुन देने यासारखी आनेक समाज हिताची कामे त्यांनी केली .

      एकविसाव्या शतकात प्रवेश करतांनाच मानसाची दमछाक झाली आहे . विज्ञानाच्या वाढत्या अविष्कारा मुळे  नव नवी यंत्रे बाजारात आली आहेत . सुख सुविधा वाढल्या आहेत आणी या सुविधा मिळवन्या साठी  माणसाची धावपळ ही वाढली आहे. सुख  शोधता शोधता माणसाची शांती हरवली आहे . या गतीमान झालेल्या जिवनशैली तसेच सुखाच्या प्राप्ती साठी तोंड द्यावा लागनार्या स्पर्धामुळे मानसाच्या अंतरी भय, चिंता, संशय ,वाढीस लागला आहेत. त्याच मुळे समाजात विकृती, व्यासनाधिनता वाढत आहे , आणी हिच गोष्ट हेरुन त्यांनी असंख्य समाज बांधवाना एकत्र करुन कधी दासबोधाच्या तर कधी मनाच्या श्र्लोकाच्या माध्यमातुन निरुपण देवुन इश्वर भक्तीने शांती आणि समाधान मिळते हे पटवुन देन्याचे मोलाचे काम त्यांनी केले. हे सर्व करीत आसतांना आपल्या अंतरी ध्येयाप्रती निष्ठा व खंबीर निश्चय आसला तर आजही सज्जनांचे कार्य सफल होते  हे समाजाला त्यांनी दाखवुन दिले . एवढा मोठा प्रपंच उभा करतांना ते निस्पृह  भुमिकेत राहिले. कुठेही आपल्या कार्यचा गजावाजा न करता त्यांनी आपले काम पार पाडले पंरतु चंदन जसे कूठेही राहिले तरी त्याचा सुगंध कधी लपत नाही . तसेच नाना साहेबानी उभारलेल्या या कार्याबद्दल आनेक सामाजिक , शासकिय संस्थानी त्यांचा सत्कार, पुरस्कार आणि गैरव ही केला, पण ते पुरस्कार त्यानी स्विकारले ते फक्त जनतेचे मन राखन्यासाठी आसे त्यांनी आनेक वेळा नम्रतापुर्वक सांगितले आहे . हे सत्कार आणि पुरस्कार मिळावे म्हणुन त्यांनी समाजप्रबोधनाचा वसा घेतला नव्हता त्यामागे एक उद्देश होता . दुःखी, कष्टी, आणि रांजल्या गांजल्या लोकांना सन्मानाने जगता यावे आणि लोककल्याण व्हावे. म्हणुन ते आविरत झटत राहिले. आज या परमपुज्य गुरुवर्य विभुतीची  91 वा स्मृतीदिना निमित्त विनम्र आभिवादन !!

जय जय रघुविर समर्थ !!

प्रशांत गडगे .

सा. भिंवडी प्रभात. �



post by lakshvedh

Saturday, 16 February 2013

दुष्काळातला धर्म !!



एकी कडे कुंभमेळा आणि एकीकडे आमच्या महाराष्ट्रात दुष्काळ , सन 1972 पेक्षा हि भिषन दुष्काळ , लोंकाना, जनावरांना, खायला अन्न नाही पाणी नाही, फक्त दुरवर दिसते फक्त भेगाळलेली जमिन, आणि फाटलेले नशिब, आज कुंभ मेळ्यात जाऊन लाखो करोडो भाविक फक्त पाप धुण्या साठी लाखो लिटर पाणी प्रदुषित करीत आहेत .आणि इकडे आमचा शेतकरी पाण्या साठी टाहो फोडुन धायमोकलुन रडत बसलाय. आसो एकच देवाच्या ह्या किती लिला आम्ही उघड्या डोंळ्यानी पाहत आहोत, फक्त हाताश पणे पाहण्यापलिकडे तरी आजुन काय करु शकतो आम्ही ?

    आसो संवेदना हरवलेल्या बोधट मनाला अजुन किती धार लावु , त्यातच निर्लज्यतेचा कळस म्हणजे आमचे मग्रूर, अय्याश,टुक्कार, दळभद्री नेते. एकी कडे राज्य महागाईने , दुष्काळाने , त्रस्त आहे .आणि हे अकलेचे सडके कांदे लाखो करोडो रु. चे वाढदिवस लग्नसोहळे साजरे करतात . लाज कशी वाटतं नाही यांना, गेंड्याच्या कातडी सारखी जाड कातडीचे हे गेंडे यांना जनतेचा पैसा खान्यापलिकडे येतयं काय ?आम्ही सर्वसामान्या दरवेळी यांच्याच पक्षांना मतदान करणार आणि निवडनुकी नंतर उर बडवत शिव्या शाप देत पाच वर्ष पुन्हा हेच सहन करणार. आसो गेली कित्तेक वर्ष हे चक्र इमाने इतबारे सुरु आहे. पण बदलनार कधी आम्ही ? हा प्रश्न आजुन प्रश्नांकीतच आहे.

     आज सर्वसामान्य जनता दोन वेळचं खान्यासाठी मोहताज आहे . ज्यांना विश्वास ठेवला ते देव पण आज पाठीमागुन अंग काढुन मोकळे झालेत . याच जनतेचे करोडो रु. मंदिर , संस्था देवस्थानांच्या बँक आकांऊंट मध्ये आसेच पडुन आहेत पण एकाही देवाला आसं वाटतं नाही , तो पैसा गरीबांच्या दुःखावर इलाज व्हावा . मतब्बर राजकारी त्याच्या व्याजावर आपल्या पिढ्या पोसताहेत . जे संकटकाळी धावुन येत नाही त्या देवांना अयुष्यभर पुजुन फायदा काय ? आसा प्रश्न गोर गरीब जनतेला पडलाय ? धर्माच मोठ अवडंबर माजयलं कोण कुठे सोन्याच राज सिंहासन देतोय,कोण कुठे मुकूट . तर कोण सोन्याच छत्र. पण खरा देव तर कुठे आहे कोणालाच समजले नाही . मानवसेवा सोडुन माणुस दगडांचा गुलाम झाला . लाखो करोडो रुपये तिथे वाहतो पण मंदिराच्या पुढ्यातल्या भिकार्याला फक्त एकच रु. देतो . हिच किंमत का माणसाची ? आता खरंच वेळ आली आहे देवाने अवतरीत व्हायची 2014 निवडनुकित खरंच देवाने चमत्कार करावा आणि या निच नेंत्याचा घरचा रस्ता दाखवुन एक चांगले सु प्रशासन आस्तित्वाच यावे. जास्त जनहिताच्या माध्यमातुन सरकारने गोर गरीब सर्वसामान्यांच भल करो तोच खरा दैवी चमत्कार आसेल निदान आशी सद्बुध्दी तरी देवाने आमच्या तमाम जनतेला देवो हिच अपेक्षा !!   �



post by lakshvedh

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...