Thursday, 28 February 2013

निश्चयाचा माहामेरु ..नानासाहेब धर्माधिकारी



आपल्या वडिलांकडुन समाजप्रबोधनाचा वारसा घेवुन वयाच्या तेवीसाव्या वर्षी रेवदंड्यामध्ये श्री समर्थ प्रसादिक आध्यत्मिक सेवा समिती स्थापन करुन केवळ सात समर्थ समवेत घेवुन लाखो समर्थ सेवक निर्मान करणारे महाराष्ट्रातील वंदनीय व्याक्तीमत्व म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी .

        आपल्या 87 वर्षाच्या कारकिर्दित नानासाहेबांनी दासबोध , सद्गुरुचरित्र,श्री मनाचे श्र्लोक, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, आशा सुमारे 20 ग्रंथाच्या आधारे मौखिक निरुपन देवुन आज्ञानामध्ये कुढत बसलेल्या सर्वसामान्य वर्गाला सत्तप्रवूत्तीकडे आकर्षित केले . आनिष्ठ रुढी पंरंपरा , देव धर्माबद्दल अंधश्रध्दा यांना दुर करुन समाजाचे परमार्थिक मार्गाने प्रबोधन घडवुन भक्ती आणी श्रध्दा यांचे महत्व पटवण्याचे काम नाना साहेबांनी केले . याच बरोबर बाल संस्कारवर्ग . बाल व प्रौढ साक्षरवर्ग आगदी विनामुल्य स्वरुपात चालवने , तसेच निरनिराळ्या धार्मिक ग्रंथाचे पुर्नलेखन  करणे व संत व आध्यात्मिक साहित्य विनामुल्य उपलब्ध करुन देने यासारखी आनेक समाज हिताची कामे त्यांनी केली .

      एकविसाव्या शतकात प्रवेश करतांनाच मानसाची दमछाक झाली आहे . विज्ञानाच्या वाढत्या अविष्कारा मुळे  नव नवी यंत्रे बाजारात आली आहेत . सुख सुविधा वाढल्या आहेत आणी या सुविधा मिळवन्या साठी  माणसाची धावपळ ही वाढली आहे. सुख  शोधता शोधता माणसाची शांती हरवली आहे . या गतीमान झालेल्या जिवनशैली तसेच सुखाच्या प्राप्ती साठी तोंड द्यावा लागनार्या स्पर्धामुळे मानसाच्या अंतरी भय, चिंता, संशय ,वाढीस लागला आहेत. त्याच मुळे समाजात विकृती, व्यासनाधिनता वाढत आहे , आणी हिच गोष्ट हेरुन त्यांनी असंख्य समाज बांधवाना एकत्र करुन कधी दासबोधाच्या तर कधी मनाच्या श्र्लोकाच्या माध्यमातुन निरुपण देवुन इश्वर भक्तीने शांती आणि समाधान मिळते हे पटवुन देन्याचे मोलाचे काम त्यांनी केले. हे सर्व करीत आसतांना आपल्या अंतरी ध्येयाप्रती निष्ठा व खंबीर निश्चय आसला तर आजही सज्जनांचे कार्य सफल होते  हे समाजाला त्यांनी दाखवुन दिले . एवढा मोठा प्रपंच उभा करतांना ते निस्पृह  भुमिकेत राहिले. कुठेही आपल्या कार्यचा गजावाजा न करता त्यांनी आपले काम पार पाडले पंरतु चंदन जसे कूठेही राहिले तरी त्याचा सुगंध कधी लपत नाही . तसेच नाना साहेबानी उभारलेल्या या कार्याबद्दल आनेक सामाजिक , शासकिय संस्थानी त्यांचा सत्कार, पुरस्कार आणि गैरव ही केला, पण ते पुरस्कार त्यानी स्विकारले ते फक्त जनतेचे मन राखन्यासाठी आसे त्यांनी आनेक वेळा नम्रतापुर्वक सांगितले आहे . हे सत्कार आणि पुरस्कार मिळावे म्हणुन त्यांनी समाजप्रबोधनाचा वसा घेतला नव्हता त्यामागे एक उद्देश होता . दुःखी, कष्टी, आणि रांजल्या गांजल्या लोकांना सन्मानाने जगता यावे आणि लोककल्याण व्हावे. म्हणुन ते आविरत झटत राहिले. आज या परमपुज्य गुरुवर्य विभुतीची  91 वा स्मृतीदिना निमित्त विनम्र आभिवादन !!

जय जय रघुविर समर्थ !!

प्रशांत गडगे .

सा. भिंवडी प्रभात. �



post by lakshvedh

2 comments:

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...