Wednesday 22 May 2013

क्रिकेट चा तमाशा IPLक्रिकेट चा तमाशा "IPL"

खेळ पाहने हा प्रत्येक मनुष्याचा आवडता छंद आहे. पण याच छंदात जेव्हा नौटंकी घुसते तेव्हा याच खेळाचा तमाशा होतो, आणि आम्ही भारतीय हा तमाशा हौशीने बघतो आसं कुणी बोलले तर वावग ठरनार नाही. तसा क्रीडा हा आमचा प्रांत नाही म्हणुण आयपीयल वर पहिल्या पासुन लिहायचं टाळतं होतो . कारण या तमाशा बघायला किंबहुना या तमाशाच गुण गाण गाऊन दिड दमडी ची किमंत न देनार्या तमाश्याची फुकट प्रसिध्दी करणे ही मनाला न पटनारी गोष्ट होती. बाकी ज्याच त्यानेच ठरवावे ? महाराष्ट्राचे (अ)जाणते राजे शरद रावांनी राज्यावर दुष्काळाचे आस्मानी संकट कोसळले आसतांना ही आसल्या फडतुस आयपीयल ला 7व्या सिझन साठी मान्याता दिली. आणि दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधकांच्या टिकास्राने बेजार झालेल्या सरकारी मंत्री टट्टुना आपलं काळं तोंड झाकायला थोडी जागा मिळाली.

आवघ्या देशभरातल्या क्रिकेट रसिकांनी अक्षरशा लाखो करोडो रु, चा चुराडा करत या तमाशात भाग घेतला याची खंत वाटते. आणि ज्या दिवशी आयपीयल सुरु झाली तेंव्हाच महाराष्ट्रातला दुष्काळ संपला की काय आशी शंका आली . कारण रोज रोज 24 तास दुष्काळावर गाळा काढनारे टिव्ही पत्रकारांचा गळा सुकला आणि आचानक देशातला एक मोठा उत्सवाच्या थाटात आयपीयल चा तमाशा मोठ्या थाटा माटात सुरु झाला . मग प्रत्येक मँच ला एक नविन विषयं शहारुख चा वानखेडे स्टेडीयम प्रवेश , प्रिती ला स्टेडीयम वर प्रपोझ, चियर्स लिडरचे आचकट विचकट नृत्य आणी आता तर या तमाशाचा काळा पडदा टराटरा फाटला. या तमाशात खेळवल्या जानार्या मँच मनोरंजना साठी नव्हत्या तर त्या जुगारा साठी खेळवल्या जात होत्या. आम्ही भाबडे क्रिकेट रसीक जिवाचा आटा पिटा करुन मँच बघतोय आणि हे भडवे जुगार सट्टा लावुन आमच्या भावनांशी खेळत होते . तो शेंबडा श्रीशांत ज्याला शेंबुड पुसायची आक्कल नाही तो बायांसाठी आपला खेळ विकत होता , किती ही खेळाची आनास्था !!

खेळ हे पवित्र आहेत त्यांना मनोरंजनाचे साधन आहेत. लोंकाच्या भावणा त्यात गुतंलेल्या आसतात आणि त्याच भावनांचा बाजार आयपीयल मधुन मांडला गेला त्यांचा जुगार झाला करोडो किक्रेट रसिकांचा हा विश्वासघात नाही का ? आम्ही रसिंक 500/1000रु. टिकीटे काढुन यांचे हे तमाशे बघतो. पण त्याच वेळी आपल्या राज्यातला दुष्काळ आम्हाला दिसत नाही. तिथे शंभर दोनशे रु. कधी मदत देत नाही . पण हा खेळ नव्हे जुगार सट्टा आम्ही पैसे देवुन चार चार तास चियर्स लिडरची ढुंगन उगाच वाया घालवतो . कुठे चाललाय आपला प्रवास . इतक्या संवेदना बोथत झाल्यात का आमच्या ! दिल्ली पोलिसांच खरंच कराव तेवढ कौतुक कमीच आहे . त्यांनी क्रिकेट मध्ये वाढच चाललेली नौटंकी आणि त्यामुळे क्रिकेट मधला तमाशा वेळीच जनते समोर आनला. हे काम आमच्या महाराष्ट्र पोलिसांन कडुन कधिच झाले नसते कारण आख्खे गूहखाते आयपीयल चे आद्य प्रणेते शरद पवारांच्या हातात आहे. खेळातली हि नौटंकी वेळीच थांबली नाही तर खेळांच रुपांतर तमाशात व्हायला वेळ लागनार नाही. वाचक तुम्ही सुद्य आहात आयपील स्पर्धा भारताच्या खेळ पंरपरेला मारक ठरतात की तारक ? हे ज्याच त्यानेच ठरवावे.�post by lakshvedh

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...