Saturday, 16 February 2013

दुष्काळातला धर्म !!एकी कडे कुंभमेळा आणि एकीकडे आमच्या महाराष्ट्रात दुष्काळ , सन 1972 पेक्षा हि भिषन दुष्काळ , लोंकाना, जनावरांना, खायला अन्न नाही पाणी नाही, फक्त दुरवर दिसते फक्त भेगाळलेली जमिन, आणि फाटलेले नशिब, आज कुंभ मेळ्यात जाऊन लाखो करोडो भाविक फक्त पाप धुण्या साठी लाखो लिटर पाणी प्रदुषित करीत आहेत .आणि इकडे आमचा शेतकरी पाण्या साठी टाहो फोडुन धायमोकलुन रडत बसलाय. आसो एकच देवाच्या ह्या किती लिला आम्ही उघड्या डोंळ्यानी पाहत आहोत, फक्त हाताश पणे पाहण्यापलिकडे तरी आजुन काय करु शकतो आम्ही ?

    आसो संवेदना हरवलेल्या बोधट मनाला अजुन किती धार लावु , त्यातच निर्लज्यतेचा कळस म्हणजे आमचे मग्रूर, अय्याश,टुक्कार, दळभद्री नेते. एकी कडे राज्य महागाईने , दुष्काळाने , त्रस्त आहे .आणि हे अकलेचे सडके कांदे लाखो करोडो रु. चे वाढदिवस लग्नसोहळे साजरे करतात . लाज कशी वाटतं नाही यांना, गेंड्याच्या कातडी सारखी जाड कातडीचे हे गेंडे यांना जनतेचा पैसा खान्यापलिकडे येतयं काय ?आम्ही सर्वसामान्या दरवेळी यांच्याच पक्षांना मतदान करणार आणि निवडनुकी नंतर उर बडवत शिव्या शाप देत पाच वर्ष पुन्हा हेच सहन करणार. आसो गेली कित्तेक वर्ष हे चक्र इमाने इतबारे सुरु आहे. पण बदलनार कधी आम्ही ? हा प्रश्न आजुन प्रश्नांकीतच आहे.

     आज सर्वसामान्य जनता दोन वेळचं खान्यासाठी मोहताज आहे . ज्यांना विश्वास ठेवला ते देव पण आज पाठीमागुन अंग काढुन मोकळे झालेत . याच जनतेचे करोडो रु. मंदिर , संस्था देवस्थानांच्या बँक आकांऊंट मध्ये आसेच पडुन आहेत पण एकाही देवाला आसं वाटतं नाही , तो पैसा गरीबांच्या दुःखावर इलाज व्हावा . मतब्बर राजकारी त्याच्या व्याजावर आपल्या पिढ्या पोसताहेत . जे संकटकाळी धावुन येत नाही त्या देवांना अयुष्यभर पुजुन फायदा काय ? आसा प्रश्न गोर गरीब जनतेला पडलाय ? धर्माच मोठ अवडंबर माजयलं कोण कुठे सोन्याच राज सिंहासन देतोय,कोण कुठे मुकूट . तर कोण सोन्याच छत्र. पण खरा देव तर कुठे आहे कोणालाच समजले नाही . मानवसेवा सोडुन माणुस दगडांचा गुलाम झाला . लाखो करोडो रुपये तिथे वाहतो पण मंदिराच्या पुढ्यातल्या भिकार्याला फक्त एकच रु. देतो . हिच किंमत का माणसाची ? आता खरंच वेळ आली आहे देवाने अवतरीत व्हायची 2014 निवडनुकित खरंच देवाने चमत्कार करावा आणि या निच नेंत्याचा घरचा रस्ता दाखवुन एक चांगले सु प्रशासन आस्तित्वाच यावे. जास्त जनहिताच्या माध्यमातुन सरकारने गोर गरीब सर्वसामान्यांच भल करो तोच खरा दैवी चमत्कार आसेल निदान आशी सद्बुध्दी तरी देवाने आमच्या तमाम जनतेला देवो हिच अपेक्षा !!   �post by lakshvedh

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...