Tuesday 11 December 2012

कोंडीत अडकलेली सेना ...



बाळासाहेब गेले, आणि काही तसाचत बाळासाहेबांचा द्वेष करनारी मंडळीना त्यांच्या नावाचा लौकीक कमी करण्यासाठी राजकारनात सक्रीय झाली . बाळासाहेबांच्या चितेला आग्नि लागते न लागते तोच कुणी तरी वैयक्तीक अकसातुन बाळासाहेबांच्या स्मारकाची बोंब उठवली, भावनेच्या भरात शिवसैनिंकानी साहेबांच्या प्रेमापोटी हि मागणी लावुन आणि साहेबांन विरोधी नेहमीच कटकारस्थान करणार्या चाहटाळांना आयत खाद्य मिळाले. बाळासाहेबांच्या स्मरका वरुन चाललेला वाद आवघ्या महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी दुर्देवी आहे .

              इतिहासात जे जे विर पुरुष झाले मग ते छत्रपती शिवप्रभु आसो छत्रपती संभाजी आसो किंवा बाळासाहेब आसो काही ना काही वाद काढायचा आणि या आलौकीक व्यक्तीमत्वानां वादाचा काळा डाग लावायचा. तोच फासा साहेबांच्या निधनानंतर काही तासातच फेकला आणि बाळासाहेबांन सारखे वंदनीय कर्तुत्व ही त्यात बदनाम झाले या सारखे दूर्देव ते कोणते ? आसो साहेबांच्या निधनाने शिवसैनिकांचा मनोधैर्य खचले आहे त्यामुळे काही प्रतिक्रीया जरुर आल्या आसतील त्या फक्त भावना होत्या . आणि त्या डिचवल्या गेल्या म्हणुनच हा वाद झाला .उध्दव ठाकरेंनी आता या वादावर पडदा टाकला आणि तोच शिवाजी पार्क चा विषय आला त्या नंतर शक्तीस्थळ  हे सगळं चाललयं काय ?  बाळासाहेबांच्या जाण्याने सेनेत मोठी पोकळी तयार झाली आहे . उध्दव ठाकरे या धक्क्यातुन सावतात न सावरतात तोच त्यांना चारी बांजुनी विरोधकांनी घेरले आहे . सेनापतीच्या निधना नंतर सेना गाफील झाली का काय ? आसं दृष्य सगळी कडे दिसतय , आर्थात विरोंधकांच्या कोंडीत सापडलेली सेना आता मुत्सद्दी गिरीने वागून तुर्तास फक्त शक्तीस्थळाच्या मागे लागुन साहेबांचा आखेरचा विसावा चौथरा पहिल्यांदा अधिकृत करुन घ्यायचा मागे लागली पाहिजेत. नांमांतर आणि स्मारक थोड्या फुसतीने घेतले तर नक्कीच दोन्ही प्रश्न चुटकी सरशी सुटतील यात शंका नाही. एकाच वेळी दाहा मागण्याशी झुंजून शक्ती वाय घालवन्या पेक्षा एका मागणी वर ठाम राहा हा साधा नियम जरी सेनाने पाळला आर्धी लढाई इथेच जिंकेल आणि साहेबांची किंबहूना बदनामी न होता लौकीक काही आर्थाने तरी वाढेल आसे वाटले तर गैर नाही.

             

           आवघ्या माहाराष्ट्राने साहेबांनवर मनापासुन प्रेम केले त्यातलाच मी एक .साहेबांच्या स्मारकावरुन किंवा साहेबांशी संबधीत कुठल्याही गोष्टीवर काही फडतुस मंडळी वाट्टेल तशा प्रतिक्रीया देतात हे मनाला पटनारे नाही मनातली घालमेल कुठुन तरी व्यक्त केलीच पाहीजेत म्हणुन हा ब्लाँग प्रपंच. बाळासाहेंबाची सेना आणि शिवसैनिक सुज्ञ आक्रमक आहेत तेवढेच संयमी ही आहेत हा सयंम कायम ठेवा बस् !!          �


No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...