सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Tuesday, 20 November 2012
भगव्या सुर्याचा आस्त ...
भगव्या सुर्याचा आस्त.....
बाळासाहेब एक नाव, नव्हते एक वयल होते.ज्याने संपुर्ण महाराष्ट्र व्यापला होता. गेली पाच दशके तमाम हिंदु आणि मराठी माणसाच्या ह्रदय सिंहासनावर आधिराज्य गाजवनारे हिंदुस्थान मधील एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब !! ज्यांच्या ऐवढी किर्ती क्वचितच कोणत्या नेत्याला मिळते. सत्ताधारी आसो वा विरोधक नेहमीच त्यांना वचकुन आसायचे. त्यांच्या एका शब्दापुढे मोठे मोठे नेते नांगी टाकायचे येवढे आफलातुन नेते म्हणेजे एकच बाळासाहेब ठाकरे ! सुरुवातीच्या काळात बाळासाहेब एक व्यंगचित्रकार उदयाला आले पण मराठी भाषकांवर होणार्या आन्याला वाचा फोडनार्या व्यंगचित्रांना प्रसिध्दी न देनार्या फ्री प्रेस वृत्तपत्राला कायमची सोडचिठ्ठी देवुन त्यांनी 13 आँगस्ट 1960 मध्ये मार्मिक या साप्ताहीकाची स्थापना केली आणि तिथेच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एक नव्या संघर्षची नांदी झाली. किंबहुना एका भगव्या सुर्याचा उदय झाला. मार्मिक मधुन प्रसिध्द होणारी व्यांगचित्रे ही प्रामुख्याने मुंबईतील मराठी माणसावर होणार्या आत्याचारावर आधारीत आसल्याने अल्पावधितच बाळासाहेब प्रसिध्दी झोतात आले. आणि इथुन पुढे थंड पडलेल्या, ग्लानी आलेल्या लाखो मराठी बांधवांना चेतवुन त्यांचा एका मोठा लढा उभारन्याचे शिवधनुष्य बाळासाहेबांनी पाच दशके लिलया पेललं आर्थात यामागे त्यांची महाराष्ट्रा प्रति आसलेली नितांत श्रध्दा आणि तगमग हीच खरी शक्तीस्थान बनुन सुरुवाती पासुन शेवट पर्यत त्यांच्या मागे भक्कमपणे उभी होती.
दाक्षिणात्यांची मुजोरी दिवसेंनदिवस वाढत होती. याची चिड तर सगळ्याच मराठी बांधवाना येत होती पण या विरुध्द आवाज उठवनार कोण ? आणि आशा वेळी बाळासाहेबांनी मार्मिक मधून मराठी माणसाला आवाज दिला. आणि शेकडो तरुण पेटुन उठले याच पेटुन उठलेल्या तरुणांना बाळासाहेबांनी नेऋत्व दिले आणि 19 जून 1966 शिवतिर्थावर शिवसेनेचा जन्म झाला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आसो किंवा उठाव लुंगी बजावो पुंगी सारख्या अदोलानांनी आख्खा महाराष्ट्र पेटुन उठला तो आज मिती पर्यत शांत झालाच नाही हेच बाळासाहेबांचे मोठ यश.23 जाने 1989 रोजी सामना या वृत्तपत्राच्या माध्यमातुन त्यांनी आपला विचार आनेक शिवसैनिकांपर्यत आपला विचार नुसता पोहचवलाच नाही तर रुजवला देखिल.आपल्या आमोघ आणि प्रतिभाशाली वकृत्वाने त्यांनी लाखो लाखो जनसमुदायाच्या सभा आशा जिंकल्या. सभेला आलेल्या तरुणांना नेमके काय हवे याची नाडी ओळखुन बाळासाहेब अतिशय मार्मिक आणि शेळक्या शब्दात देशातल्या भल्या भल्या नेत्याचा आपल्या ठाकरी शौलीत खरपुस समचार घेत. आणि त्यांची हिच वृत्ती जनमासात प्रचंड लोकप्रिय झाली. पूढे त्यांच्या भाषनाचा कैफ आसाच वाढत गेला आणि दिवसागणित महाराष्ट्राचे बाळासाहेबांन वरचे प्रेम वृध्दिंगंत होत गेले यात शंका नाही.
गेली पाच दशके बाळासाहेब शिवसेनाप्रमुख म्हणुण अवघ्या महाराष्ट्राच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान आहेत. बाबरी मशिद पाडनार्या शिवसौनिकांची जाहिर पाठ थोपाटनारे किंवा हिटलर चा समर्थन करणारे बाळासाहेब थोड्याच काळात आवघ्या देशातल्या हिंदुच्या गळ्याचले ताईत बनले आणि तिथेच त्यांना हिंदुह्रदयसम्राट हि उपाधी बहाल झाली. मराठी बरोबरच हिंदुत्वाला प्राधान्या देनार्या बाळासाहेबांनी पोटात एक आणि ओठात एक आशी भुमिका आल्या अयुष्यात कधीच घेतली नाही. पाकिस्थानला मुंबई खेळन्यास घातलेली बंदी आसो किंवा पाकधर्जिन्या पाकड्यावर केलेले थेट भाष्य आसो किंवा बांग्लादेशीघूसखोरांनवर घेतलेली भुमिका आसो या मुळे जागतिक पातळीवर देखिल बाळासाहेबांचे नाव आदराने घेतले जाई. यात नवल नव्हते. जात पात विरहित राजकारण त्यात ही 80% समाजकारण आणि 20 % राजकारण हे सुत्र देवुन लाखो शिवसौनिक घडवनारा हा नेता काही निराळाच !!
बाळासाहेब एक झुंजार नेता वक्ता तर होतेच पण माणुस म्हणुण ते एक असामन्य होते .त्यांची तुलना कराची झालीच तर फक्त सुर्याशी होऊ शकते,आहो रात्र कधीही न थकता फक्त जनकल्याना साठी झटनार्या सुर्याप्रमाणे बाळासाहेब आजीवन झटत राहीले आखेरच्या श्वासा पर्यंत ते झटत होते..
त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी आनेक मित्र कार्यकर्ते शिवसैनिक जोडले जशी जशी वेळ वाढत गेली शिवसेनेचे तेज वाढत गेले.याच तेजातुन मग छगन भुजबळ, मनोहर जोशी, नारायन राणे, राज ठाकरे, उध्दव ठाकरे आसे आनेक द्गिज नेते जन्माला आले किंबहुना साहेबांनी ते घडवले! यातले काही एक निष्ठ राहीले काही फितुर झाले, पण बाळासाहेबांनी त्याची पर्वा कधी केली नाही. ते एका व्रतस्त योध्या प्रमाणे फक्त प्रामाणिकपणे लढा देत राहिले. आखेर 1995 मध्ये तो दिवस उजडला, शिवसेनेच्या तेजाने संपुर्ण महाराष्ट्र तळपु लागला .शिवसेनेचा भगवा ध्वज आखेर विधान सभेवर फडकला आणि बाळासाहेबांचे नेऋत्व सर्वमान्य झाले.आणि केवळ दुर्देव म्हणुण आवघ्या पाच वर्षात हे तेज कमी झाले आणि शिवसेनेच्या हातातुन सत्ता निसटली ती आज मितीपर्यत.. याच काळात साहेबांनी स्वःता घडवलेले नेते शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत विरोधकांच्या छावणीत दाखल झाले पण बाळा साहेबांची हिंम्मत खचली नाही एका धिरोद्दत्त योध्या प्रमाणे नाना अडचणीवर मात करीत ते लढत राहीले, कधी अप्तस्वकियांशी तर कधी विरोधकांशी यामध्ये ही त्यांचा ठाकरीबाणा कायम होता हे आपल्याला विसरता येनार नाही.
बाळासाहेब एक रसायन होते . एका का ते बोलायला लागले की अपोआप रक्त गरम होई आणि माणुस चेतवुन उठे याच मुळे शिवसेनेत तरुणांचा मोठा सहभाग आहे . आज गावो गावी सेनेच्या शाखा चांगल्या काम करतात त्याची मुख्य प्रेरणास्रोत फक्त बाळासाहेब ! हळु हळु वय वाढत होते बाळासाहेबांच्या विचारांना नाही पण शरीरांना बंधने येत होती, पण त्याची पर्वा न करताच बाळासाहेब नेहमीच मैदान उतरुन विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याच वेगळच तंत्र त्यांना अवगत होते. जनमासांची नस आणि नस ओळखनारे बाळासाहेबांना आता स्वःताच्या प्रकृतीची शंका येत होती आणी आत्ताच्या दसरा मेळाव्यात त्यांनी हि खंत बोलुन ही दाखवली आणि तमाम हिंदुस्थान दुर्देव ती शंका खरी ठरली, आणि सलग चार दिवस मृत्युला झुंजत ठेवनारे बाळासाहेब काळाच्या स्वाधीन झाले. आपल्या 86 वर्षाच्या कारकीर्दीत एक राजनेता मुत्सद्दी सेनापती, द्राष्ट्रा नेता, धुरंधर वक्ता, कुशल व्यंगचित्रकार, निर्भिड पत्रकार, आश्या आनेक पदव्या ज्याच्या पायाशी लोळन घालत होत्या. करोडो शिवसौनिकांच्या ह्रदयात ते मानाने विराजमान झाले होते.याची प्रचिती अवघ्या जगाला त्यांच्या अंतयात्रे वेळी आलीच आसेल .30 लाखाच्या जमावाने सअश्रु आणि शोक अनावर डोळ्यांनी त्यांना निरोप दिला . न भुतो नभविष्यात आसा नेता होणे शक्य आवघ्या महाराष्ट्राला बाळासाहेबांची पोकळी पुढची काही दशके नक्कीच जानवेल . जनमानसावर आपल्या कतुर्त्वचा वेगळाच ठसा उमटवन्यार्या एकमेव बाळासाहेब ठाकरे या तेजोवलयाला माझा त्रिवार मुजरा !!
आ. सरसेनापती हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याना सआश्रु नयनानी भावपुर्ण अदरांजली ।। �
�
�
Subscribe to:
Post Comments (Atom)
तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
-
शहापुर ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका गेली कित्तेक वर्ष या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , आणि काँग्रेसची सत्ता पण विकास मा...
-
✍🏻 प्रशांत गडगे संपादक-सा. विचारमंथन नुकताच निवडनुक आयोगाने पत्रकार परीषद घेवुन महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचा कार्यक्रम जाहिर केला...
-
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
No comments:
Post a Comment