Friday 28 December 2012

गोष्ट एका खादाड बाबुची ...



शहापुर तालुक्यात खुप वर्षानंतर लाच लुचपत आधिकार्यानी छापा टाकुन गटशिक्षण आधिकार्याला 20 हाजार रुपयाची लाच घेतांना रंगे हात पकडुन अटक केली. आणि संपुर्ण शहापुरच हादरुन निघाले आर्थात हा हादरा इथल्या सगळ्याच सरकारी बाबुची झोप उडवनारा होता यांत काडी मात्र शंका नाही. सध्या भ्रष्ट्राचार हा राजशिष्टाचार झालायं , भ्रष्ट्राचारचे काळ भुत तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मानगुटीवर बसलयं, दिल्ली पासुन आमच्या गल्लीतल्या पारा पर्यत त्याचा जो नंगानाच सुरु तो एक दिवस देशाला घातक ठरनार आहे . आज लाखो करोडो रुपयांचे गफले आपल्याला सगळ्याच ठिकानी सर्रास पाहायला मिळतात त्यात फक्त विस हाजाराची लाच घेनारा एक महाभाग शहापुरात रंगे हात पकडला तर त्यात काय नवलं ? आशा दुर्देवी प्रतिक्रीया ऐकल्या आणि तळपायची आग डोक्यातच गेली, वर वर साधी वाटनारी ही घटना तशी खुपच गंभिर आहे , आद्याचे सुजान नागरीक घडवन्याची  जबाबदारी ज्या शिक्षण विभागाची आसते त्याच शिक्षण विभागातल्या गटशिक्षण आधिकार्याने चक्क एक शिक्षिके 20 हजार रु. लाच मागितली या शिक्षकाच्या पतीने वेळीच लाचलुचप विभागाकडे धाव घेवुन या माहाभागाला रंगेहात पकडुन दिले त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक ! पण शिक्षण विभागात आसा दुर्देवी प्रकार होणे हे आम्हा शहापुरकरांना शरमेची गोष्ट आहे.

    

                आज शहापुर तालुका झपाट्याने विकसित होत आहे . आता हे बदल जमिनी विकुन का सरकारी पातळीवर होत आहेत हा जरी चिंतनाचा विषय आसला तरी बदल होतोय हे वास्तव आपल्याला स्विकारावेच लागेल. आता बदल आला म्हणजे सरकारी कागद नाचनारच आणि आर्थात सरकारी कागद नाचवायचे म्हणजे सरकारी बांबुचा भाव वधारतोयच आज शहापुर मधली सगळ्याच सरकारी आँफिसेस मध्ये एकदा चक्कर टाकुनच बघा म्हणजे तुम्हाला कळेल या खादाड सरकारी बाबुचा भाव किती वधारलाय ते . रेशनिंग आँफीस पासुन ते रजिस्टर आफिस , पोलीस स्टेशन ते तहसिल कार्यालय सगळ्याच ठीकानी खादाड आणि मस्तवाल सरकारी बाबुची मस्ती आपल्याला पाहायलाच मिळते . किंबहुना लाच दिल्या शिवाय किवा लाच घेतल्या शिवाय कोणतेही सरकारी काम होतच नाही आसा शिष्टचार दुर्देवाने रुढ होतेय की काय आशी शंका येते . 5 रु. पासुन पाच लाख पर्यच ची लाच दिली आणि स्विकारली जाते हि आमच्या ग्रामीन भागातली व्यथा आहे . आज पंचायत समिती ग्रामपंचायत किंवा तहसिल कार्यलये हि तर भ्रष्ट्राचाराची उगमस्थाने आहेत जन्म दाखल्या पासुन ते जातपडताळनी दाखल्या पर्यत सगळे दाखले लाच दिल्या शिवाय क्वचितच मिळतात . त्यात गटशिक्षण आधिकार्याच्या लाच प्रकरणा मुळे इथल्या भ्रष्ट आधिकार्याना जरी धाक बसला आसला तरी आश्या कारवाया नेहमीच व्हायला पाहिजेत. त्यासाठी जनतेने पुढाकार घेने आवश्यक आहे. भ्रष्टाचर हा देशाला मारक आहे , जर उद्याच्या सुसंस्कूत नागरीक घडवनार्या शिक्षण खात्यात येवढा अंधार आसेल तर भावी पिढी काय प्रकाश पाडनार आहे याची कल्पना न केलेली बरी. भ्रष्ट्राचाराने आज कमालीचे टोक गाठले , तुम्ही प्रतिकार केला तरच भ्रष्ट्राचाराचे काळे भुत आपण संपवु शकतो, फक्त सुरुवात स्वःता पासुन करायला हवी .  भ्रष्ट्राचार निर्मुलनाची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे . दूष्ट्रीकोण बदला तर विचार बदलतात , त्याने केले म्हणुन मी करील ही प्रवृत्ती कुठे तरी थांबली पाहीजेत , स्वःताशी प्रामाणिक राहा .पैसा संपत्ती गाडी बंगला या गोष्टी पेक्षा नितीमत्ता महत्वाची !

        आज एका सरकारी बाबुच्या नितीमत्तेचा पर्दाफाश झालाय उद्या कदाचीत आसे आसंख्य खादाड मग्रुर मस्तावाल सरकारी बाबुचे काळे चेहरे उजेडात येतील फक्त तुम्ही आम्ही जागरुक राहीलो तर लाच देन आणि घेने हा ए प्रकारचा देशद्रोह आहे .  लाच मागणार्याना प्रतिकार केला तरच हे मस्तावाल बाबु ताळ्यावर येतील आन्यथा भ्रष्ट्राचाराचा मोकाट सुटलेला वळु भविष्यात तुम्हाला आम्हाला आवरने कठीन जाईल यात शंका नाही.�


No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...