Tuesday 28 August 2012

पुण्यातली बेफाम तरूणाई...


आज पुण्यातली अल्पवयीन मुलांची मद्यपार्टी ची बातमी पाहीली आणि अचंबिंत झालो.आभ्यास आणि शिक्षणनाच्या मुख्य टप्यावर ही तरुनपीढी आशी बेधुंद पणे वागत आसेल तर उद्याच्या भारता साठी ही धोक्याची घंटा आहे, आणी आश्या मद्यपी पार्ट्यना या नव्या पीढीने हजेरी लावने हि नक्कीच सामाजिक अधोगतीची नांदी आहे . वयाच्या 15 व्या वर्षा पासुन आजची नविन पिढी व्यसनाधिनते कडे वळते आहे किंबहुना आज त्यांवर कोणाचाही दबाव राहीला नाही. ही पिढी पालकांना जुमानत नाही शिक्षकांचा मान राखत नाही . थोडक्यात स्वकेंद्रीत झालेली हि पिढी आय्याशी आणि व्यासनाधिनतेच्या अहारी जात आहे, पण यामगची थोडी पार्श्वभुमि पण आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. पुर्वीच्याकाळी एकत्र कुटुंब प्रणाली अस्तिवात होती त्या मुळे संस्काराची एक मोठी शिदोरी एका पिढी कडुन दुसर्या पिढी कडे हस्तांतरीत होत होती. आता 21व्या शतकात विभक्त कुटुंब प्रणाली आली आणि इथेच गोची झाली, आई बाप दिवस भर नोकरी धंद्यासाठी नाइलाजाने घराबाहेर आसतात. त्यातच आपल्या मुला मुलींना काही कमी पडु नये म्हणुन टिव्ही इंटरनेट यांची चोख व्यवस्था घरी केली जाते. आणि याच मध्यमांतुन बाहेर कलीयुगाचा जो थयथयाट सुरु आहे तो तुमच्या आमच्या घरात राजेरोस फिरत आहे. यातुनच रेव्ह पार्ट्या मद्यपी हुक्का पार्ट्यची निमंत्रने आपल्या पाल्याना घरपोच मिळत आहेत. अभ्यासाचे आणि शाळेचे काही काही तास सोडले तर बाकीच्या वेळेत आपला पाल्य करतोय काय ? याचा कधी पालकांनी विचार केलाय काय ? फेसुबुक, युट्युब, सारख्या सोशल नेटवर्कीन साईट वर आपला पाल्य कोणते दिवे लावतो. त्याच्या मित्र वर्गात कोण कोण आहेत ह्या वर कधी पालकांच कधी लक्ष्य दिलय का ? आज शाळा काँलेजातुन संस्कार देने तर बंद झाले आहे . आणि पालकांन कडे वेळ नसल्या मुळे आजची नवी पिढी भरकटच चालली आहे . पर्यायाने 21व्या शतकात पाश्चिमात्य संस्कृती आमच्या संस्कूतीला डोईजड होत आहे . त्यातुनच टिव्ही इंटरनेट च्या माध्यमातुन पाश्चिमत्य संस्कृतीचा जो काही प्रचार सुरु आहे तो नक्कीच आपल्या संस्कृतीला मारक ठरतो यात शंका नाही . आजची नवी पिढी एका प्रचंड असुरक्षित आणी प्रचंड दबावा खाली जगत आहे वाढती स्पर्धाचा सामना करत आसतांना त्यांचा संवाद कुठे तरी हरवला आहे. प्रत्येक पालकाचा आपल्या आपल्या पाल्याशी संवाद वाढवला तर भविष्यात आसे प्रकार घडनार नाही आशी आशा वाटते. �

Location : Manas Mandir Jain Rd, Asangaon, Maharashtra,

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...