Tuesday 14 August 2012

हे कसले स्वातंत्र्य ?

15 अँगस्ट 1946 रोजी आनेक क्रांतीकरकांच्या बलिदानाने सुमारे दिडशे वर्षाच्या गुलामीनंतर या पवित्र भारत भुमिच्या चरणावर स्वतंत्र्याचा आभिषेक झाला. किती तरी ज्ञात अज्ञात आनेक स्वंतंत्र्य सैनिकांनी कशाचीही तमा न बाळगता या आग्नीकुंडात आपल्या प्राणाचे बलिदान केले त्या सर्व विरांच्या असिम धैर्यला आणि शौर्याला लाख लाख सलाम !!
आजचा दिवस तसा गोड छत्रपती शिवप्रभुच्या जाज्वंल्य आणि प्रेरणादायी इतिहास आम्हा तमाम भारतीयांना नेहमीच प्रेरणा देतो पण छत्रपतींच्या आणि शंभुराजांच्या निर्वाना नंतर हा इतिहास कोणी गंभिरतेने घेतला नाही आणि हिंदवी स्वराज्याची पडझड सुरु झाली. अखंड हिंदुस्थान मानबिंदु आसलेल्या भगव्या जरीपताक्याते तेज कमी होत गेले, मोघलाई संपली, आणि इंग्रजांची एकहाती सत्ता संपुर्ण भारतावर प्रस्थापित झाली आणि आपण गुलामी स्विकारली, आसे का घडले ? याच विचार केला तर प्रामुख्याने एक कारण समोर येते, गुलामी आपल्या रक्तारक्तात भिनली आहे . छत्रपती शिवाजी महाराजांन सारखा एखादा युगपुरुष आपल्या अदम्य साहस शैर्य राजकारण आशा आनेक गुणसंपत्ते मुळे आपल्याला गूलामगिरीतुन मुक्त करतो, पण, (छत्रपती सारखा वीर क्वचितच जन्माला येतो हे आपण आता विसरलो आहोत)या नंतर दूर्देवाने आसा युग पुरूष अजुन झाला नाही , आणि होनार नाही. यांनंतर इंग्रजाविरुध्द दिडशे वर्षाच्या संघर्षा नंतर कुठे आपल्याला स्वंतंत्र्याची शिदोरी मिळाली ती आजमिती पर्यत शाबुत आहे .आसो स्वंतंत्र्य मिळुन आज 66 वर्ष झाली तरी देशाच्या परिस्थितीत मात्र काही सुधारना झाली नाही. शहर वाढली, औद्योगिक क्रांती, हरित क्रांती झाली,व्यापार वाढला तरी गरीबी मात्र तशीच राहीली. आजची आणि स्वतंत्र्यपुर्व परिस्थिती काही वेगळी नाही. आज आम्ही स्वंतंत्र्य आहोत, पण गुलामीच्या बेड्या अजुन आमच्या पायात तश्याच आहेत. घटने आम्हाला स्वंतंत्र्य दिलयं पण अम्हाला ते उपभोगता येत नाही. आज हि आपण गुलामच आहोत . मुठभर नेंत्याचे सरकारी बाबुचे आणि भष्ट्रसमाज प्रवृत्तीचे !!
देशात आज आराजक माजलंय असंतोषाचा सुप्त लाव्हा दबा धरुन बसलाय, हा लाव्हा कधी उफाळुन येईल याचा नेम नाही. आण्णा आसो किंवा बाबा आसो भष्ट्राचार निर्मुलना साठी जंग पछाडतात तिकडे सरकार भ्रष्ट्राचार्याना संरंक्षण देते. माहागाई राक्षसाने तर सर्वत्र हाहाकार माजवललाय, त्यात अतंर्गत अपासातील वाद आलेच . शेतकरी हवालदिल आहे. भांडवदांरांची मोठी चलती सुरु आहे. आसाम दंगली मध्ये होरपळतोय, सरकार कडुन बांग्लादेशी मुस्लिमांचा पाहुनचार जोरात सुरु आहे . रुपया डबघाईला आलाय, आणि काँग्रेस सरकार सोनियामय झालय.सरकार चालवायला लाचार,नामर्द, नादान, नेंत्यांची मोठी मागणी आहे . एकंदरीत आज देश मोठ्या अराजकतेच्या तोंडावर उभा आहे . ज्या दिवशी देशात सर्वत्र पसरलेल्या अंसंतोषाचा स्फोट होईल तेव्हा काय घडेल याची कल्पना न केलेलीच बरी किंबहुना आजची परिस्थिती कोणत्याही भारतीयला भुषनावह ठरेल आशी नाही नाही.
देशाची लोकसंख्या बरोबर भ्रष्ट्रचार आणि घोटाळे झपाट्याने वाढत आहेत यामुळे देशाची एकुनच अर्थव्यवस्था खिळखिळी होवुन देशाच्या विकासालाच मोठी खिळ बसली आहे. गरीबी बेरोजगारी मुळे देशात गुन्हेगारीच प्रमाण वाढत चालले आहे. देशाचा कणा आसलेला तरुणवर्ग अय्याशी आणि व्यसनाधित होतोय आणि नंतर भ्रष्ट्राचारी नेत्याचा शरणना धिन होत चालाल आहे ,आणी यातच भष्ट्राचारी नेत्याच फावलं आहे. एकंदरीतच भ्रष्ट्राचार्यानी देशाची बट्ट्याबोळ केला आहे .आसले नादान नेते आमच्या नशिबी आले या पेक्षा आधिक दुर्देव कोणते? आसो देशगाडा चालला आहे तो चालु द्या.गेंड्याच कातडी प्रमाणे जाड आसलेल्या नेत्यांच्या आणि जनतेच्या कानावर आमचा टाहो कधीच पोचनार नाही, आणि पोचला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.आमच्या लेखल्या झिजतील पण भ्रष्ट्राचारी नेंत्याचे हात काही झडनार नाहीत. देश जसा चाललात तसाच चालत राहील. अराजकते हा प्रवास कधी संपेल सांगता येत नाही पण नवं काही घडेल आशी आशा आहे, पुन्हा एकदा भारत सुजलाम सुफलाम होण्यासाठी क्रांन्ती झालीच पाहिजेत.आमचं स्वंतंत्र्य आज भ्रष्ट्रराज्यव्यवस्थेने आणि भ्रष्ट्र प्रवृत्तीनी हिरवुन घेन्याचा कुटील डाव टाकला आहे पण त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवुन त्यांना याच मातीत गाडल्या शिवाय भारतीय शांत बसनार नाही .ज्या दिवशी देशातली भ्रष्ट्रराज्यव्यवस्था आणि भ्रष्ट्रप्रवृत्तीचा समुळ नाश होईल त्याच दिवशी भारताचे स्वांतंत्र्य लैकिकार्थाने चिरायु होईल यात शंका नाही.
.
जय हिंद ! जय भारत !!

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...