सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Friday, 7 September 2012
विकाससकांच्या जाळ्यात " कूणबी राजा "
कुणबी आर्थात शेतकरी ! वंशपरंपरगत चालत आलेला शेती व्यावसाय पुढे नेवुन आपला आणि देशाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवनारा कुणबी समाज आज या ग्लोबलनायझेशन च्या युगात आपली मुळ ओळख विसरुन भलताच ग्लोबल होत आसल्याचे चित्र सध्या कोकण आणि राज्यात इतरत्र दिसत आहे. सध्या राज्यात विकासकांचे पिक आले आहे . आर्थात विकासकांच्या या पिलावली कोणाच्या आहेत हे कळुन न येन्या इतपत जनता मुर्ख नाही ? मोठ मोठ्या नेत्यांनी आपला काळा पैसा सफेद करन्या साठी विकासक नावाच पिल्लु संपुर्ण राज्यात सोडले आहे . हे पिल्लु आज राज्यातील गोर गरीब आणि शेतकर्याच्या मानगुटी वर बसले आहे . विकासाच्या नावाने आगदी कवडीमोल दराने हाजारो एकर जमिनी घ्यायच्या आणि आणि त्या भ्रष्टनेंत्यांच्या दावनीला बांधायच्या हा एकच उद्योग सध्या राज्यभर सुरु आहे. आणि आम्ही तो मुकाट्याने पाहत आहोत. आर्थात आशा दळभद्री फडतुस बघ्याचा भुमिके मुळे महाराष्ट्राची काय वाट लागली आहे ते आपल्या डोळ्या समोर आहेच.
आज खोडे पाडी किती तरी हजार एकर जमिनी या भ्रष्ट्र नेंत्यानी आपल्या घश्यात घातल्या आहे . कृपाशंकर सिंग हा त्याच एक ताज उदाहरन आहे. दारु आणि पैसा आणि गुंडागीरीच्या जोरावर शेतकर्याना आक्षरशा ओरबडले जातयं, कवडीमोल दराने जमिनी विकत घेतल्या जातात , सरकारी कर , राँयल्ट्या चुकवल्या जातात आणि सरकारी नियम धाब्यावर बसवुन निकृष्ट बांधकामे सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारली जातात . आणी यात गूंतवलेला काळा पैसा व्हाईट केला जातो . पण यात फसतो कोण ? तुम्ही आम्ही आणि शेतकरी ना ?
आज शेतकरी बांधवाना ही अंग मेहनतीची कामे करायची लाज वाटते आहे . सगळी कडे आय्याशीने धुमाकुळ घातलाय. आगदी कवडी मोल दराने शेतकरी आपली शेते हसत हसत या विकासकांच्या घश्यात घालत आहे . आणि आलेल्या पैसे दारु, बाटली आणि बये वर उधळुन लावत आहेत. काही काही महाभाग तर एका रात्रीत 10लाख रु चुराडा करनार्याची मला किव येते. कुठून आला येवढा माज ! बापजाद्याचा रक्ताच पाणी करुन जी जमिन जतन करुण ठेवली. ती कवडी मोल दराने या विकासकांच्या घश्यात घालन्या साठीच का ? आसा उद्धविग्न सावाल आम्हाला पडला आहे ?
आद्याच्या पिढ्याची चिंता सोडाच पण हयातीतल्या या पिढीला देखील अय्याशीच व्यसन लागले आहे. आश्या सगळ्या कारभारत विकासकांच फावल आहे आसो या सगळ्या गराड्यात माझा कुणबी बांधव आक्षरशा भरडुन निघाला आहे आज माझ्या तालुक्यात 60% कुणबी बांधव या विकासकांच्या दुष्ट्रचक्रात अडकुन सत्यानाश ओढावुन घेतला आहे याची खंत वाटतेय . पण एकही नेऋत्व यावर काही बोलत नाही किंबहुना इथले नेऋत्वच या विकासकांच्या इस्टेट एजंटगिरी करण्यात मशगुल आहे . तिथे समाज प्रबोधनाच काय ? आसो या सगळ्यात माजलेल्या गेंड्याच्या कातडीच्या विकासकांना आणि माझ्या उतावीळ शेतकरी आर्थात कुणबी बांधवाना एकच सांगन आहे की हिच वेळ आहे तुमचा नाही पण पुढच्या पिढीचा तरी विचार करुन जमिनी विकने सोडा नाहीतर एके काळचा राजा आज दिन आणि भुमिहीन म्हणुन आपला रसातळाला जाईल यात तिळमात्र शंका नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
-
शहापुर ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका गेली कित्तेक वर्ष या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , आणि काँग्रेसची सत्ता पण विकास मा...
-
✍🏻 प्रशांत गडगे संपादक-सा. विचारमंथन नुकताच निवडनुक आयोगाने पत्रकार परीषद घेवुन महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचा कार्यक्रम जाहिर केला...
-
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
No comments:
Post a Comment