Thursday 7 September 2023

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड नव्हतं,किंबहुना त्या काळच्या शिक्षकांमध्ये आपल्या पेशा बद्दल एक आस्था होती त्यामुळे तशी कधी गरजच पडली नाही. त्यामुळे शाळा आणि अभ्यास संपल्यावर जो काही वेळ मिळेल तो खेळ आणि मैज मजा करन्यात जात होता . त्यातच सनवार आले की अंनंदाला उधानच यायच मग दहीहंडी किंवा गणपती आसो, की नवरात्र दिवाळी आसो.. या सगळ्या सनांमध्ये अंनंदाला पारावरच नसे त्या काळी शहारातल्या मोठ मोठ्या हंड्या फक्त वर्तमान पत्रातुन पाहायला मिळायच्या . दहिकाल्याच्या दिवशी भल्या सकाळीच उठुन सगळ्या मिंत्राना गोळा करुन पावसाच्या पाण्यात चिंब भिजुन गलका करत "गोंविंदाराजे गोपाळा" जय घोष करत गावातुन हंडी साठी वर्गणी गोळा करत आख्खा गाव पालथा घालायचो. जी वर्गणी गोळा होईल त्यातुन एक हंडी बांधली जायची, आणि मग हि फोडतांना होनारा जल्लोष काही निराळाच, चिखलाने नखशिकांत माखलेल्या गोपाळांची वरात आई आल्या शिवाय जात नव्हती. पण आता जसा जसा मोठा होत गेलो तसे तसे सन बदलले आणि सनांचे स्वरुपही . ग्लोबलनाझेशन या युगात सनही ग्लोबल झाले एवढ मात्र खरं ! आता हंडीचा इव्हेंट झालाय आणि गणपतीचा फेस्टीवल,इतर सनांचे काय झाले ते न सांगितलेले बरे !
आसो पण या महागाईच्या युगात नेत्यांनचे सन ही धुम धडाक्यात साजरे होताय हे मात्र खरे ,आणि आम्ही पण बेशरमा सारखे त्यांच्या आयोजित केलेले सनांच्या इव्हेंट मधे हसत हसत सहभागी होतो बेफामपणे थिरकतो हे काही भुषनावह नाही .

देशात दुष्काळ पडलायं त्याची कोणाला फिकीर नाही आर्धा महाराष्ट्र पाण्या साठी वनवन फिरतोय ,आँगस्ट उजाडला तरी शेतकरी आकाशाकडे डोळे लावुन बसलाय, महागाई वाढत चालली आहे, रुपया घसरतोय , आसाम दंगलीनी होरपळतोय , बेळगावचा आवाज कोणाच्या कानी जात नाही आणि हे नालायक राजकारणी लाखो रुपयांच्या हंड्या बांधत सुटलेत, आणि त्या फोडायला आम्ही झुंजतोय , हि राजकीय मंडळी लाखोंच्या हंड्या बांधुन संस्कृती जपताय ना तशीच थोडी माणुसकी पण जपा ? पुर्वी सन साजरे करन्यान मागे एक उद्देश आसायचा ,सामाजिक एकोपा वाढुन त्या योगे काही तरी चांगला सामाजिक संदेश दिला जात आसे आणि आत्ता सनांच्या नावावर नुसता धिंगाना नंगा नाच, मनोरंजन. देश कुठे चालंलय आणि यांच काही भलतच ! आजच्या युवापीढीला मार्गदर्शन करायच सोडुन आश्या नंगा नाच प्रोत्साहन नेते फक्त भारताचत मिळु शकतात. आसो तो भाग वेगळा.पण मला हल्ली आशा ग्लोबल हांड्या बांधनार्या नेत्यांची आकलेची खुप किव येते.
दरवर्षी केवळ काही तासात दहिहंडी उत्सवातुन करोडो रुपयांची उलाढाल होते कुठुन येतो हा पैसा ? कोण देतो ? स्वःताच्या खिशातुन कोणी दहा थरांसाठी लाख रु. देनार नाही ?कधी याच विचार केलाय का ? दुर्देवाने दही हंडी उत्सव म्हणजे एक राजकिय आखाडा निर्मान झालाय फक्त शक्तीप्रदर्शन आणि प्रसिध्दि साठी तरुणांना झुंजवलल नाचवल जातयं. हल्ली गल्लीतला एखादा चिरीमिरी भाई पण लाख रु. हंडी बांधुन मोठ्या समाजसेवकाचा आव आनतो तिथे मोठ्या राजकिय नेत्यांची बातच निराळी ? आसो आक्कलशुन्य नेंत्यानी दहिहंडी चा ग्लोबल ईव्हेंट केलाय आजची तरुणाई पण त्याला भरभरुन प्रतिसाद देते आणि इथेच राजकारण्यांच फावलं आहे . ज्याला देश घडवायच आहे तोच तरुण या राजकारण्यांचा गुलाम झाला तर आराजकता माजायला वेळ लागनार नाही. सध्याची एकदरीँत परिस्थिती तशीच आहे. तरुणांनो वेळीच जागे व्हा ! आणि गोपाळकाला या पवित्र्य सनाच्या आडुन राजकारन्यानी टाकलेला धुर्त कावा वेळीच ओळखा आन्यथा भ्रष्ट्र राजकारन्यांची हंडी कधीच फुटनार नाही.

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...