Thursday 14 June 2012

मनसे "राज"

आजचा दिवस आम्हा मनसैनिकांसाठी तसा खासच कारण आज महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व आ. राज साहेबांचा वाढदिवस महाराष्ट्रात खुप नेते आहेत पण इथल्या मातीशी नाळ जुळलेले दोन तिनच नेते महाराष्ट्रात आहेत ते म्हणजे बाळासाहेब शरद पवार आणि राजसाहेब किंबहूना बाकीची भारुड भरतीच ती..पण या तिन नेंत्याची इथल्या भुमीपुत्राची नेमकी नस ओळखली आणि अल्पावधीच आनेक समर्थकांच्या गळ्यातील ताईत बनले यात शंका नाही. बाळासाहेब आणि शरद पवारांच्या पुढे राजसाहेब तसे नवखे आणि तरुणच पण आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दिद सगळ्याच अंचबित करणार्या आनेक लिलया राजसाहेबांनी सहज केल्या .त्यांच्या अदम्य इच्छाशक्ती आणि प्रामाणिक पणा मुळे यशाची आनेक शिखरे त्यांना पार पाडली. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या माध्यमातुन आनेक तरुणांना एकत्र करुन महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नवनिर्मानाची नांदी दिली.
आज राज ठाकरे या नावा भोवती एक वेगळच वलय निर्मान झालंय, उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्न डोळ्यात साठवून लाखोंच्या संख्येने तरुण राजसाहेबांच्या मागे उभे आहेत. अन्याय अत्याचार आणि मराठी आस्मिते साठी राजसाहेबांनी नेहमीच संघर्ष केला मग तो रस्त्यवर आसो वा रस्त्याबाहेर, म्हणुनच आजच्या युवा पिठीच्या गळ्यातले ताईत आहेत. आसो सांगायच झाल तर खुप सांगता येईल पण आज शब्द ही भारावुन गेलेत आश्या आमच्या लाडक्या साहेबांचा जन्मदिवस, आई एकवीरा त्यांना उदंड निरोगी अयुष्य देवो हिच सदिच्छा ! त्यांच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढत जावो आणि या महाराष्ट्राच भल होवो हिच आपेक्षा !!

जय मनसे ! जय महाराष्ट्र !!

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...