Sunday, 14 August 2016

पत्रकारीतेचा बुलंद आवाज दबनार नाही..


पत्रकार प्रियेश जगे यांनवर झालेल्या भ्याड आणि प्रणघातक हल्ल्याला पंधरा दिवस उलटुन गेले तरी पोलीस प्रशासनला  या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात यश आले नाही. ही जरी चिंतेची बाब आसली तरी पोलीस प्रशासनाचे अपयश या प्रकरणा मुळे अधोरेखित झाले आहे. शहापुर तसा आदिवासी दुर्मग तालुका त्यात ठाणे जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आसल्याने चाळीस ते पन्नास किमी च्या परीघात या तालुक्याचा पसारा वाढला आहे. त्यात ग्रामीन क्षेत्र आसल्यामुळे शासनाच्या विविध योजना या भागात जास्त राबवल्या जात आसुन मुंबईचे भुमाफीया शहापुर तालुक्यात जमिनींवर डोळा ठेवुन आहेत. त्यात अनेक छोटे मोठे बिल्डर तालुक्यात तयार झाले आहेत. या बिल्डरांची अनाधिकृत बांधकामे, शासकिय योजनांतील भ्रष्टाचार,किंवा कोणताही अडला नडला सामान्य नागरीक आसो यांच्या समस्या शहापुर तालुक्यातील पत्रकार नेहमीच मांडत आसतात. आपल्या निर्भिड लेखनीच्या माध्यमातुन जाब विचारुन संबंधीत यंत्रनेला सळो की पळो करुन सोडतात व पत्रकारीतेच्या माध्यमातुन अनेकांना ज्ञाय मिळवुन देतात.पण राजकिय नेते, बिल्डर, भष्ट्राचारी,अत्याचारी या सगळ्यांशी दोन हात करुन झुंज देनारा पत्रकार हा नेहमीच एकटा आसतो. हे सबंधीतांनी हेरले आसल्याने संपुर्ण राज्यातच पत्रकारांवनर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.

    पंधरा दिवसापुर्वी आमचे मार्गदर्शक सहकारी बाळ जगे यांचे चिरंजीव पत्रकार प्रियेश जगे यांना  दि. ३१जुलैला सांयकाळच्या सुमारास कुमार गार्डन हाँल समोर आपली चार चाकी वाहन दुरुस्ती करीता गेले आसता तिथे सात ते आठ दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करुन त्यांना जबर जखमी केले. ही साधी घटना नव्हती. किंबहुना शहापुर तालुक्याच्या इतिहासाला काळीमा फासनारी घटना होती. या प्रकरणात खरा सुत्रधार कोण हे जरी पोलीस तपासानंतर कळनार आसले तरी पंधरा दिवस उलटुन गेले तरी पोलिसांना या प्रकरणाचा तपास एक इंचाने पुढे सरकवता आला नाही हे दुर्दैव आहे. प्रत्रकार संघटनांनी याबाबत ठाणे पोलीस आधिक्षक यांची भेट घेवुन त्यांना निवेदन दिले परंतु आजुन त्याचा ही उपयोग झाला नाही. किंबहुना पोलिस विविध कारणं देवुन तपास लांबवीत आहेत आसा आरोप पत्रकार करीत आहेत. त्यातच लोकशाहीचा चौथा अधार स्तंभ म्हणुन माध्यम आणि वृत्त पत्रांकडे पाहीलं जात आसतांना किंबहुना कोणताही मोबदला न घेता प्रशासनाचे, आणि शासन यांचे निर्णय कार्यप्रणाली जनते पर्यत पोचवन्याचे काम माध्यमे  करतात पण पत्रकारांवर होनारे हल्ले रोखन्यात शासन अपयशी ठरुन सबंधीत यंत्रनाही मुग गिळुन बसली आसल्याने पत्रकारांवर होनारे हल्ले वाढत आहेत.

      शहापुरात सध्याअवैध्य मटका,जुगार, बियर शाँपी, दारुचे धंदे, दारुच्यी भट्ट्या, लाँजेस, सगळ काही तालुक्यात बेलगाम सुरु आसतांना त्यांची इतंभुत माहीती आसलेल्या पोलिस प्रशासनाला पोलीस आधिक्षकांचे अदेश आसुन ही प्रत्रकार प्रियश जगे यांवरील हल्ल्याची उकल करण्यास येवढा वेळ का लागतो हे जरी संशयास्पद ? आसले तरी आशा प्रकारणांनमुळे पत्रकारांनवर हल्ला करनार्या भ्याड आणि गांडु गावगुडांच्या हिम्मतीत वाढ होनार आसुन पत्रकारांच्या लेखनीची धार बोथट करनार्या प्रवृत्तीचा विजय होनार आहे. पोलिसांचे हे अपयश कदाचीत सत्याच्या बाजुने आणि प्रामाणिकपणे समाजहिता साठी झटनार्या पत्रकारांच्या मनोबल खच्ची करनारे जरी आसले तरी आसे शेकडो भ्याड हल्ले छातीवर झेलुन घ्यायचे बाळकडु पत्रकारांना स्वतंत्र्यापुर्व कालखंडातच मिळाले आहे. त्यामुळे कायद्याचे संरक्षण करनार्या पोलिसांनी त्यांच काम प्रमाणिक पणे पार पाडावे अन्यथा आज पत्रकारांवर हल्ले होतात उद्या पोलीसांनवर व्हायला वेळ लागनार नाही. महाराष्ट्रात पत्रकारीतेला एक वेगळा इतिहास आहे. अद्य पत्रकार बाळशास्री जांभेकर,लोकमान्य टिळक, आगरकरांन देशाच्या स्वतंत्र्य संग्रामात नेत्रुत्व केले तर प्र के आत्रे सारख्या धुरंधरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला नाही तर तो जिंकला. वाघाच काळीच आसलेली माणसं समाजहिता साठी पत्रकारीतेत येतात. त्यांचा एक एक शब्द एक एक तोफ आसते आणि त्याच शब्दांनीच आजवर लोकशाही शाबुत आहे. गोर गरीब जनतेला पत्रकारांचा असरा आहे. आश्या गावगुंडाच्या गांडु फडतुस  भ्याड हल्ल्याला घाबरतील ते पत्रकार कसले? उलट आमची हिम्मंत आजुन दुप्पट वाढली आहे. असे कितीही हल्ले झाले तरी पत्रकारीतीचे बुलंद आवाज दबनार नाही हे हल्ले करनार्या गांडुनी लक्षात घ्यावे.

प्रशांत गडगे
  संपादक
सा. विचारमंथन

No comments:

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...