Thursday 3 January 2013

अकार्यक्षम नेंत्यामुळे कुणब्यांची दुर्दशा !!कालच्या मी कुणबी समाजिक संघटनेच्या तृतीय वर्धापन दिनाला हजेरी लावली आणि पुन्हा एकदा समाजाच्या दशे पासुन ते दिशे पर्यतचा प्रवास सगळ्याच मान्यवर उलगडून दाखवला, तसे कुणबी समाजाचे मेळावे  किंवा जाहिर कार्यक्रम कमीच होतात पण "मी कुणबी" संघटनेने समाजा साठी एक जाहिर व्यासपिढच उभे केले आहे. त्यामुळे मी कुणबीचे कौतुक करु तेवढेच कमीच, व्यासपिठावर तालुक्यातील अनेक स्वयंघोषीत कुणबी नेंत्यांची रेलचेल होती, किसन कथोरे , आणि विश्वनाथ पाटील, शरद पाटील, यांना वगळता एकही वक्ता जमलेल्या समाज बांधवांचे मने जिंकन्यात यशस्वी झाला नाही. थोडक्यात शहापुर तालुक्यातले सगळेत बडे नेते व्यासपिठावर उपस्थित आसुन सुध्दा एकाही नेत्याने आपल्याच तालुक्यातील समाज बांधवांशी संवाद साधन्याचा प्रयत्न केला  नाही याचे अश्चर्य वाटले .

            गेली कित्तेक वर्ष, शंकर खाडे, काशिनाथ तिवरे , दशरथ तिवरे , हे तिनही नेते आपापल्या पक्षातुन शहापूर तालुक्यात कुणबी समाजाचे नेऋत्व करीत आहे , थोड्या फार फरकांने सगळ्यांनीच सत्ता उपभोगली आहे. पण समाजासाठी तिचा किती उपयोग केला? याच उत्तर मिळने कठीन आहे . या  सगळ्याच स्वयंघोषीत नेंत्यानी फक्त आज पर्यत कुणबी बांधवांचा स्वहिता आणि पक्षहिता साठी वापर केला. पण समाजहिता कधी महत्व दिले नाही, किंबहूना आसे केले आसते तर मी कुणबी सारखी झुंजार संघटना उभीच राहिली नसती . ज्या नेंत्याना समाजाला दिशा देता येत नाही ते नेते कूठले ? फक्त निवडनुका आल्या का कोंबड्या झुंजवायच्या तसा समाज झुंजवायचा नंतर युत्या करून समाजाला च्युत्या बनुन सत्ता उपभोगायच्या ! हे गेल्या काही वर्षात समाज बांधव पाहतोच आहे. आणि शहापुर तालुक्यातील सगळ्यांच ग्रां .पं . पं.स, आणि जि, प , निवडनुकीत दिसुन आले. आज शहापुरात तालुक्यात कुणबी समाजाची दशा झाले त्याला मुख्य कारण म्हणजे हे अकार्यक्षम  आणि स्वःताची शेखी मिरवनारे कुणबी हे नेते !! आज खरंच दुर्देवाने का होईना पण हे जळजळीत वास्तव मांडताना मनाला खुप यातना होतात .

                  आज समाजात कमालीच आज्ञान वाढत आहे ,व्यसनाधिन आणि चैनबाज युवापिठी फोफावते आहे . एकिकडे करोडो रु, जमिनी विकल्या जातात आणि दुसरी कडी बेरोजगारीने तरुण वर्ग खंगत चाललाय? या वेळी समाज बांधवाना दिशा द्यायच काम कोणाचे आहे ? याच नेंत्यांचे ना ? मग काय केल यांनी येवढे वर्ष आसा संतप्त सवाल आज आम्हाला पडला आहे ? नुसतेच नेतेगिरीच्या शेख्या मिरवत सरकारी आधिकार्यांचे तळवे चाटत काँन्ट्रक्टर चा लेबल घेनार्या या नेंत्यांची लाज वाटते आंम्हाला ?  आज किसन कथोरे यांनी आपला समाज उल्हासनगर , बदलापुर सारख्या ठिकाणी अल्पप्रमाणात असुन देखिल एकसंध ठेवला आहे , विश्वनाथ पाटिल यांनी वाडा, विक्रमगड मधुन कुणबी सेनेची स्थापना करुन संपुर्ण राज्यात हा पक्ष नेला आहे पण , शहापुरचे काय ? या स्वयं घोषीत कुणबी नेंत्याच काय ? शहापुर तालुक्या मध्ये आज कुणबी समाज 70% आहे .  त्यातला 10% समाज सुध्दा हे नेते एक करु शकले नाही ,या पेक्षा मोठे दुर्देव ते कोणते !! आसो तरीही मी कुणबीच्या व्यासपिठावर सत्कार घेनारी हि मंडळी पाहीली आणि मग उद्वेगाने आज हे लिहने भाग पडले

 

               शहापुर तालुक्यात कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर, पण बेगडी आभिमानाच्या जळमटां मुळे आजचा समाजबांधव आपली जात विसरत चालला आहे,इतर समाज त्यामानाने एकसंध आहेत उदा. आदिवासी, मराठा,बुधिस्ट ,माळी, लोहार यांच्या प्रत्येँकांच्या संघटना गुप्तपणे समाज बांधनी चे काम जोरात करीत आहेत पण बहुसंख्य आसलेला कुणबी समाज एक होत नाही आणि म्हणुणच इथला अदिवासी  समाज  आरक्षणाच्या बळावर का होईना इथला सत्ताधारी होत आहे आज विकासक मोठ्या प्रमाणात शहापुर तालुक्यात घुसले आहेत. मोठ्या प्रमाणावर जमिनीची खरेदि विक्री सुरु आहे ,भुमिपुत्र आसलेला कूणबी समाज आज भुमिहीन होत आहे . एकिकडे बेरोजगारी वाढते, बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणावर व्यसनाधिन होत आहे , हे सगळे रोखनार कसे ? या विषयावर तालुक्यातील सगळ्याच कुणबी नेंत्यानी एकत्र येवुन चिंतन करन्याची वेळ येवुन ठेपली आहे ? "मी कुणबी" सारखी एक चांगली संघटना तयार झाली आहे तिला मार्गदर्शन करुन तिच्या मध्यमातुन जर काही उपक्रम हाती घेतले, तर नक्किच समाजात काही सकारात्मक बदल होतील आणि समाजाची दशा संपुन समाजाला एक दिशा मिळेल आसा आशावाद बाळगायला हरकत नाही.

जयस्तु कुणबी ! जय महाराष्ट्र !!

  �

. �post by lakshvedh

No comments:

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...