Friday 2 November 2012

जागर स्रीशक्तीचा !


आज एकविसाव्या शतकात आपण प्रवेश करुन

एक तप उलटले, आबला म्हणुन उपेक्षीत

राहिलेली स्री शक्ती आज सबला म्हणुन

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन सर्वच क्षेत्रात

आघाडी वर आहे , चुल आणि मुल

ही संकल्पना तर पुर्ण लयाला गेली आहे.

मागच्या काही वर्षात महीलांनी पुरुषांन

पेक्षा सरस कामगिरी करत यशाची नव नविन

शिकरे पार केली पण हे सगळं आसचं शक्य

नव्हते. त्यासाठी आनेक लढे उभारले गेले, लढले

गेले, त्यात सावित्री बाई फुले यांच स्थान

अग्रभागी आसेल, 1 जाने. 1948

रोजी त्यांनी मुलींन

साठी पहीली शाळा काढली आणि स्री शिक्षणासाठी पहिला मोठा लढा त्यांनी उभारला आणि पुढे

हा लढा यशस्वी झाला. सामाजिक आणि धार्मिक

रुढीनी बरबटलेल्या समाजात स्री फक्त उपभोग्य

आहे. चुल आणि मुल व्यतीरिक्त ती काहीच करु

शकत नाही हा समज

चुकीचा ठरला आणि आता काही दशकामध्येच

स्रीयांनी केलीली प्रगती किती दैदित्यमान आहे

यात शंका नाही.पण याची डावी बाजु पण आपण

निट पाहिली तर आजुन ही आंधारच दिसतो.

एकविसाव्या शतकात खुप

प्रगती झाली आसली तरी आजही वृत्तपत्रात

येनार्या बहूतेक बातम्या ह्या स्री वर

होणार्या अत्याचाराच्याच असतात , बलात्कार ,

विनयभंग , अत्याचार, मारहान,

या बातम्या स्वःताला महासत्ता म्हणवनार्या देशाला भुषनावह

आहेत का ? स्रीया आज सर्वच क्षेत्रात

अघाडीवर आहेत, पण

पुरुषी अहंकाराला त्यांना पावलो पावली सामोरे

जावेच लागते ! स्रीयांना आता 50% टक्के

आरक्षण मिळाले आहे त्यामुळे

राजकारणातही मोठा सहभाग आसेल पण

शहरी भाग वगळता ग्रामिन

भागातली स्री आजुनही थोडी मागासलेली राहीली आहे ,

हे भिषन वास्तव आपल्याला नाकारुन चालनार

नाही. आज शतके लोटली खुप बदल झाले, पण

स्रीचा स्रीशी चाललेला संघर्ष काय

संपला नाही. स्री भ्रुण हत्या ,हुंडाबळी,

ही त्याची ताजी उदा. लज्जास्पद आहेत.

आर्थात स्री भ्रुण हत्या सारख्या प्रकरणात

सबला झालेली स्री पुन्हा आबला केव्हा झाली हे

कळलच नाही.

प्रसंगी रणचंडीका होणारी स्री आज

पोटच्या गोळ्याला देखील डोळ्यात पाहत

नाही इतकी निष्ठुरता आली कुठून ?आसो इकडे

सरकार उपाय योजना करण्या मशगुल आहे आणि

एकीकडे स्री भ्रुण हत्येचे प्रमाण वाढचत चालले

आहे यावरुन सरकारचे गांभिर्य समजुन येते.

आजची स्री खरंच खुप प्रगत सुशिक्षीत

झाली पण समाजाची मानसिकता आजुन बदलत

नाही. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन

काम करताना देखील स्रीयांना आनेक शारिरीक

आणि मानसिक

गोष्टीचा सामना करावा लागतो पण

या सगळ्यावरच मात करीत

ती आजुनही परीस्थितीची झुंजतेच आहे.

आणि तिचा हा संघर्ष कधी संपेल

याची शाश्वती नाही.

आद्या स्री शक्तीची प्रणेती जिजावु माँसाहेब,

झाशीची राणी लक्ष्मी बाई, सावित्री बाई फुले ,

अनंदीबाई जोशी , इदिरा गांधी ,

सरोजीनी नायडु ,ते साधना आमटे,

निलीमा मिश्रा,लता मंगेशकर ते प्रतिभा ताई

पाटील आशा कित्येक

रणरागिनी नी स्री शक्तीचा इतिहास

स्फुर्तीदायी केला आहे .

या रणरागीनीच्या कामाची दखल तर

आवघ्या जगाने घेतली. पण

स्री शक्तीच्या आस्तित्वाची लढाई

आजुनही सुरुच आहे . एके काळची आबला आज

सबला बनुन सगळ्याच क्षेत्रात मोठ्या हिम्मतीने

वाटचाल करीत आहेत .

कधी तरी स्री शक्ती हिच देशशक्ती होईल

आणि जग पालथे घालील आणि इतिहास

तिची नोंद घेईल यात शंका नाही . पण स्रीयांन

समोरील आजची आव्हाने मोठी आहेत.

ती पेलवताना होणारी दमछाक आम्हाला कळते.

पण एक दिवस नक्कीच पुरुषी मानसिकता बदलेल

आणि त्याच

दिवशी स्री शक्तीचा खर्या आर्थाने जय होईल

याची खात्री वाटते .

आसो स्री चा चाललेला संघर्ष आजचा नाही.

युगा युगांपासुन तो सुरु आहे . पण

ही रणरागीनी कधी थकली नाही. का कधी तिने

परिस्थिती समोर गुढगे ही टेकले नाही . ती लढत

राहीली अविरत लढत राहीली, तिने

शिवाजी घडवला, तिने संभाजी घडवला, तिनेच

भगसिंग, आणि अंबेडकर घडवले, पण

तिचा स्वःताचा संघर्ष संपला नाही.

तिचा हा संघर्ष अविरत चालला आहे. आशा आहे

या शतकात तरी आता पर्यत फक्त कागदावरच

राहिलेली स्री पुरुष समानता खर्या आर्थाने

जनमानसात रुजवली जाईल. याच

स्री शक्ती ची ताकद खुप मोठी आहे .

समाजातील अनिष्ट रुढी पंरंपरा आज्ञान यामुळे

आज अनेक ठिकाणी महिलांना अनादर

केला जातो, पण सध्या जागतिक करणाचे वारे

वेगाने वाहत आहेत, शिक्षण

आणि तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्याने होत आहे,

ज्या प्रमाणे बदल सृष्टीचा नियम आहे. त्याच

प्रमाणे स्री कडे बघन्याचा सामाजाचा दृष्टीकोन

आता बदलु लागलाय. भविष्यात नक्कीच

आर्थिक. सामाजिक, राजकिय, वा इतर

कुठल्याही क्षेत्रा मध्ये स्री शक्ती अग्रेसर

आसेल यात शंका नाही , पण

स्री शक्तीचा हा जागर आसाच सुरु राहु द्या !

कदाचित याच जागरातुन

एखादी रणचंडी आवतरीत होईन आणि या पिचलेले

खिळखिळ्या झालेल्या लोकशाही नव

संजिवनी देईल आसा आशावाद

बाळगायला तुर्तास हरकत नाही.

हि दिवाळी आमच्या तमाम

वाचकांना हितचिंतकांना भरभराटीची आणि जावो हिच

सदिच्छा !!

No comments:

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...