Wednesday 24 October 2012

५००० आभार !!



आज लक्षवेध-वेध घडलेल्या घटनांचा या ब्लाँग चळवळीला एक वर्ष पुर्ण होतोय . आतिशय विषन्वय आणि क्रोधीत मनाने हा ब्लाँग सुरु केला होता . त्याला कारणे हि तसेच आहेत . आवती भवती घडनार्या घटनांनी व्यथित झालेला मनातल्या सतांपाला कुठे तरी वाचा फुटली पाहिजेत त्यासाठी वृत्तपत्रातुन बातमी, लेख, पत्रव्यवहार, आशा आनेक मार्गानी प्रयत्न तर सुरुच आसतो . पण कधी प्रत्यक्ष संवाद होत नव्हता आणि याच साठी हा ब्लाँग प्रपंच सुरु केला . रोजच्या धावपळीच्या जगण्यातुन जसा वेळ मिळत गेला तसा तसा विविध विषयांद्वारे आपल्याशी या ब्लाँग च्या माध्यमातुन संवाद कींवा आतल्या मनाची सुरु आसलेली घालमेल आपल्या समोर मांडन्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आणि बघता बघता आज एक वर्ष पुर्ण झाले ! आर्थात या एक वर्षात आनेक वाचकांच्या ओळखी झाल्या, चर्चा झाल्या ! पण या निगरगट्ट राजकारण्यान मध्ये काहीच बदल झाला नाही. उलट आजची परिस्थिती अजुनच वाईट झाली आहे आसो. या एक वर्षात सर्वच मित्र मैत्रिनीने खुपच प्रतिसाद दिला. त्यातही अर्वजुन सांगण्या सारखी गोष्ट म्हणजे कधीही वृतपत्र न वाचनारे आभ्यासा पलिकडे न पाहनारे आशा मित्रांनी ब्लाँग वाचुन दिलेल्या प्रतिक्रीया मनोबल उंचावनार्या होत्या. ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही देने लागते म्हणुन या शिकवनीतुन सतत मनाला एक नवीन उर्जा मिळते त्यातच वाचक मित्र मैत्रिनीच्या खंबीर पांढीब्या मुळे आजुन खुप काही करण्याची नवी उमेद नेहमीच मिळत राहीली ती चिरंतर आशीच मिळत राहो हिच सदिच्छा.


आपला स्नेहंकीत

प्रशांत जयवंत गडगे .


विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा ।।

  �


No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...