आत्ताच नव्याने शिक्षणाच्या आईचा घो नावाचा चित्रपट येवुन गेला . आपल्या शिक्षण वाभाडे काढनारे अत्यंत भडक आणि वास्तववादी चित्रन यात केले होते .आर्थात खंगलेल्या आणि पुर्ण मोडकळीस आलेल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेची आज दुरावस्ता कोणी केली हे सांगने न लागे. ग चा म माहित नसलेल्या कोडग्याच्या हाती शिक्षण व्यावस्था गेली आणि जे व्हायचं तेच झालं . सरकारी शिक्षण म्हणजे एक मोठा विनोद झाला आहे. आज आपण मोठ्या आभिमानाने म्हाणतो उद्याचा भारत आजच्या वर्गामध्ये शिकतो. किंबहूना सरकारने शिक्षणाचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरीकाला बहाल केला आहे. पण शिक्षण व्यावस्थेच काय ? या भारतात जन्माला येनार्या प्रत्येकाला मोफत शिक्षण दिल जाईल आशा बोंबा सरकार नेहमीच मारत आसते, पण आज निम्म्या हुन जास्त सरकारी शाळा बंद व्हायच्या मार्गावर आहेत. मध्ये मध्ये मी निशानी डावा अंगठा नावाची कांदबरी वाचली होती . तिच तंतोतंत चित्रन आज सर्वत्र पाहावयाला मिळते आहे. खाल पासुन वर पर्यत फक्त कागद रंगवले जातात. कागदी घोडे मोठ्या थाटात नाचवले जातात, अहवाल तयार केले जातात, पण कृती मात्र शुन्य. आज सरकारी शाळेत जा आणि तिथली परिस्थिती पाहा . शौचालय नाही मैदान नाही कुठे लाईट आहे तर कुठे छतच नाही. किबहूना तिन चार इयत्तेला एक शिक्षक आशी दुर्देवी आवस्था सरकारी शाळांची झाली आहे . आता कुठला सुज्ञ पालक आपल्या मुलाला सरकारी शाळेत खुशी खुशी ने पाठवेल का ? या मुळे खाजगी शिक्षण संस्थेचा वाळु मोकाट सुटला आहे. सरकायच्या याच उदासिन धोरणांचा फायदा घेवुन खाजगी शिक्षण संस्था चालकांनी देशातील नागरीकांची प्रचंड लुट सुरु केली आहे . आज एकीकडे सरकारी शाळा बंद पडत आहेत, तर दुसरी कडे खाजगी शिक्षण संस्थेत एडमिशय साठी वेटिंग लिस्ट आहे .सरकारने मोफत शिक्षणाचा अधिकार तर दिला पण ते शिक्षण आहे कूठे आसा प्रश्न सर्व सामान्या पडा आहे. आज जिल्हा परिषद महापलिकांच्या शाळेची अवस्था न विचारलेली बरी. यात शहरी भागातल्या शाळेत गरजे पेक्षा जास्त शिक्षक आणि खेड्यापाड्यात एक शिक्षका कडे 4/5 वर्ग किती ही विसंगती त्यात शिक्षकाना शिकवने कमी आणि सर्वेची काम जास्त, आश्यातच तिथल्या विद्यार्थाच्या गुणवत्तेच तर विचारुच नका . फक्त हजेरी साठी मुल बोलवाची काही तरी थोड शिकवायची आणि सुटली शाळा ! त्यात आता सरकारी शाळेमध्ये 8वी पर्यत नापास करता येनार नाही आसा नविन नियम आलाय . काय म्हणनार आता या शिक्षणाला ? जर सरकारी शिक्षण प्रणाली आशीच सुरु राहीली तर इथले विद्यार्थी पुढे काय दिवे लावतील हे न सांगितलेलेच बरे !! त्यामुळे खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळेत विद्यार्थाची गर्दि वाढत आहे, आणि सरकारी शाळा बंद पडत आहेत. सरकारी शाळांची घसलेली पत पून्हा उजळन्या साठी सरकारी शिक्षण व्यावस्थेत बदल करणे गरजेचे आहे . पुढच्या काही वर्षात सरकारने यात काही अमुलाग्रह बदल घडवले नाही तर सरकारी शाळा बंद पडतील यात शंका नाही . आणि मोफत शिक्षणाचा डिडोंरा पिटनार्या शासनकर्ताच्या फोल पणा पुन्हा जनतेसमोर उघडा पडेल . पण यात सर्वसामन्य नागरिकांची होनारी अर्थिक पिळवनुकीचा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो !! �

No comments:
Post a Comment