खंरच कधी पैसा बोलु लागला तर ? माणसांची मोठी गोची होईल ना ? आसो हा विनोदाचा भाग झाला पण एका हिंदी चित्रपटातलं हे गाण त्या वेळी खुप लोकप्रिय झाल होत आज ही हे ऐकायला मिळाल की बरं वाटतय. आपण कल्पना ही करु शकत नाही इतक मोठ वास्तव दडलय या गाण्यात . त्या काळी खरचं वास्तवावर आधारलेली गाणी गायली जायची आणि तेवढ्याच आत्मितेने ती ऐकली पण जायची नाहीतर आता ची गाणी आसो पण या गाण्याच्या तिन शब्दात कीती मोठ वास्तव आहे याची प्रचिती आपल्याला आलीच आसेल, किंबहुना पैसा बोलता ही नही सबकी बोलती बंद कर देता है ! आसा नवा वाक् प्र चार रुळु लागला आहे. जो तो पैश्याच्या कमवन्याच्या मागे लागलाय. मग हा पैसा कुठुन ही येवो चांगल्या मार्गाने आसो किंवा वाईट मार्गाने पण प्रत्येकाला पैसा हवा आहे . ती तुमची आमची सगळ्याची गरज बनली आहे. साध्या शिपाया पासुन ते मोठ्या मंत्र्या पर्यत आधिकार्या पासुन ते सर्वसामान्या पर्यत जो तो पैश्याच्या मागे पळत सुटला आहे .नितिमत्ता माणुसकी प्रामाणिकपणा सगळ्याचे बारा वाजवत एकविसाव्या शतकात या गैण ठरत चालल्या आहेत आणि फक्त पैश्या वरुनच माणसाची पत ठरवली जाते किंबहुना जुन्या काळी पैसा फक्त विनिमयाचे साधन होते आज पैसाच सर्वस्व बनला आसल्याची शंका येते.
संस्कृत मध्ये एक छान सुभाषीत आहे.
"अर्थस्य पुरुषो दासः"
याच आर्थ पैसा हा कोणाचा गुलाम नसतो पण तो थोरा मोठ्याना आपला गुलाम करुन घेतो. आणी हे 100% खरं आहे आज पैशाने सगळ्या जगाला गुलाम केल आहे. जो तो सकाळ पासुन रात्री पर्यत घड्याळाच्या काट्या सारखा पैश्याच्या मागे पळत सुटला आहे आणी याच धावपळीत तो आपले आरोग्य, नितिमत्ता, शांती समाधान या सगळ्याच गोष्टी विसरत चालंलाय की काय ? याची शंका येते.माणसाकडे किती पैसा आसावा याचा अंदाज कोणी बांधला नाही म्हणुन की काय जो तो पैश्याचा गुलाम झालाय.
पैसा कमवन्याच्या या हाव्यासाने तर आज देशाची काय वाट लागले आहे ते तुम्ही आम्ही बघतोच आहोत लाख कमवतांना दमछाक होते तिथे करोडो रुपयांचे घोटाळे होतात. चोर्या दरोडे वाढलेत पाच पाच हजारा साठी खुन होतात . आर्थातच याच पैश्यामुळे व्यासनाधिनता वाढत चालली आहेत त्यातुन आत्याचार बलात्कारा सारखे गुन्हे वाढत आहे कुठे गेली नित्तिमत्ता सगळच काही अलबेल ! ज्या पैशा साठी येवढा आटा पिटा चाललाय तोच पैसा कधी बोलायला लागला तर ? फक्त विचार करा काय होईल ? किती तरी 2G स्पेट्रम अदर्श सारख आज्ञात सत्य बाहेर येतील.आसो सांगायच येवढच आहे पैसा विनिमयाचे साधन तो गरजे पुरताच ठिक आहे पण गरजा कधीच संपत नाहीत म्हणुन पैसा कमवावा पण चांगल्या मार्गाने पण हे कोणीच लक्षात घेत नाही आणि जे व्हायच ते झालच आज माणुस पैशाचा गुलाम झाला आणि सगळच संपलं. पैशाच्या बाजारात न्याय नितीमत्ता, प्रामाणिकपणा खुलेआम विकु जावु लागला. एकदा पैसा सर्वस्व झाल्या वर आसच होणार आणि ते किती खरे खोटे आणि खरे हे तुम्हीच ठरवा ? हाच पैसा एक दिवस सर्व मानव जातिच्या विनाशाला कारणीभुत होईल की काय आशी आता येवु लागली आहे .पण आसो जो तो पैश्याच्या मगे धावतोय हि शर्यत कधी संपेल महीत नाही पण शर्यतीत धावनारा प्रत्येक जन म्हणतोय "पैसा बोलता है "? पण काय बोलतोय हे कोणीच ऐकत नाही..
सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Subscribe to:
Post Comments (Atom)
तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
-
शहापुर ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका गेली कित्तेक वर्ष या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , आणि काँग्रेसची सत्ता पण विकास मा...
-
✍🏻 प्रशांत गडगे संपादक-सा. विचारमंथन नुकताच निवडनुक आयोगाने पत्रकार परीषद घेवुन महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचा कार्यक्रम जाहिर केला...
-
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
No comments:
Post a Comment