9 आँगस्ट म्हणजे क्रांती दिन, मागच्या वर्षी याच दिवशी आण्णांनी जंतरमंतर आशी काय जादु मारली आणि काँग्रेस पळता भुयी थोडी झाली, अर्थात आण्णानी त्या वेळी आखलेली रणनिती आणि त्या वेळचं वातावरन हे दोघे आण्णानी सुरु केलेल्या अंदोलनाला पोषक होते आणि तेच अंदोलन बेसावध काँग्रेसच्या वर्मी लागले. आण्णांच्या या अंदोलनाचा प्रभाव येवढा मोठा होता की देशात सर्वत्र काँग्रेस विरोधी एक मोठी लाट निर्मान झाली आणि त्यावेळी गलित्रान झालेल्या काँग्रेसची अवस्था खरचं पाहण्याजोगी होती आसो तो भाग निराळा पण आज पुन्हा एकदा आण्णानी 1 आँगस्ट जनलोकपाल च्या मंजुरी साठी मोठ्या अंदोलनाची रणनिती आखली आहे. आता यावेळी या अंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि मागच्या वेळी झाला तोच तमाशा पुन्हा यावेळी होतो की काय आशी शंका मनात येते. पण मागच्या वेळी बेसावध आसलेली काँग्रेस आणि सरकार या वेळी चांगलेच सावध झाले आहे.
आपल्या कुट निती प्रमानेच रणनीती अखुन लवकरात लवकर हे अंदोलन कसं अपयशी करता येईल याची तयारी करत आहे आणि त्याची प्रचिती आपण रोज बघतो आहोत. आण्णांच्या आता जंतरमंतर सुरु आसलेल्या अंदोलनात कोण एक प्रसारमाध्यमांनवर टिका करणारे बँनर लावतो आणि आख्खी मिडीया निमित्ताला कारण म्हणुण त्याच खापर आण्णांवर फोडते आहे आहे .आता अंदोलनात कोणताही सुज्ञ कार्यकर्ता आसं काही करनार नाही हे समजन्या इतपत भारतीय प्रेषक काय मुर्ख नाहीत ? आसो या निमित्ताचा कारण साधुन काँग्रेस सहीत सगळ्या मिडीयाने आण्णा विरुध्द डंका पिटायला सुरुवात केली. कालपर्यत काळ तोंड लपवुन फिरनार्या काँग्रेस च्या काही चाहटाळांनी याच विषयावर मनसोक्त टवाळी तर करुन घेतली पण प्रसारमध्यमांचा बदलता रंग पाहुन मला जरा अश्चर्यच वाटले ? काल पर्यत अण्णांना डोक्यावर घेनारे आज अचानक अण्णांना पाण्यात कसे पाहु लागले ? एक वर्षात मत परिवर्तन होऊ कसं शकत ? मिडीया इतरांन टिका केलेली चालतेय ना ? मग मिडीयावर कोणी टीका तर तर का नाही सहन होत मिडीयाला ? नक्कीच इथे काही गोम आहे ? आसो एकवर्षात काय अर्थकारण झाल आणी मिडीया बदली पण लोक ? प्रणम मुखर्जी राष्टपती काय झाले आणी सगळ्या काँग्रेसची पापे धुवुन गेली की काय ? एकंदरी चित्र तर तसंच दिसतयं !
महागाई , भष्ट्राचार वाढतच चाललेत फक्त तुमच्या आमच्या अंगातली रग कमी होत चाललेय ,सरकार आम्हाला लुळ पांगळ बनवतयं आम्हीही तो पांगळेपणा हसत हसत स्विकारतोय आशी शंका येते. " नेते अंनंदी आणि जनात केवीलवाणी" आशी देशाची अवस्था झाली आहे . आज बंड नाही केल तर क्रांती होईलच कशी. तूमच्यात हिम्मत नसेल बंड करायची तर जे बंड करतात त्यांना थोड सहकार्य तरी करा ,कदाचित आजच्या या बंडातुन उद्याच्या पिढीकडे क्रांतीच बिजे तरी पोचतील, बंड लहान आसो किंवा मोठे पण सुरुवात तर झाली पाहिजेत? आण्णांनी केली आहे सुरुवात समरोप आणी आणि भ्रष्ट काँग्रेसला नारळ कोणी द्यायचा हे तुम्हीच ठरवा. टाँईम्स मासिकाना ने तर आपल्या पंतप्रधाना नपुसंकतेचा किताब बाहालच केला आहे , "उज्वल आणि विकसित हिंदुस्थान निर्मान करायला सरकार नालायक आहे" यावर शिक्कामोर्हतब ही झालंच आहे , काँग्रेसची ही भ्रष्ट राजवट उथवन्या साठी आंण्णा आणि देशातल्या कोणत्याही काँग्रेस आणि सरकार विरोधी बंडाचे मी समर्थनच करेल, कारण कोणी काही म्हनो काँग्रेस पोटावर लाथ मरते पाठीत खंजीर खुपसते. पण काँग्रेस विरुध्द बंड करनारे तुमच्या आमच्यातलेच आहेत, कोणी चोर दरोडेखोर जनतेचा पैसे खानारे नाहीत. केजरीवाल आणि इतर मंडळी गेली खड्यात निदान आपल्या आण्णांन साठी तर पुन्हा एकदा या रंगगनात उतरावेच लागेल एक नवी क्रांती घडवन्या साठी..........
.
.
प्रशांत गडगे.
सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Subscribe to:
Post Comments (Atom)
तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
-
शहापुर ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका गेली कित्तेक वर्ष या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , आणि काँग्रेसची सत्ता पण विकास मा...
-
✍🏻 प्रशांत गडगे संपादक-सा. विचारमंथन नुकताच निवडनुक आयोगाने पत्रकार परीषद घेवुन महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचा कार्यक्रम जाहिर केला...
-
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
No comments:
Post a Comment