Monday, 30 April 2012

दिल्ली पुढे झुकला महाराष्ट्र !!

शिवप्रभुच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि महाराष्ट्र भुमी एके काळी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडुन सह्याद्रीच पाणी पाजनारी ही पावन महाराष्ट्र भुमी, या महाराष्ट्राचे जेवढ गुण गाऊ तेवढ कमीच आश्या या नवविविधतेने नटलेल्या महाराष्ट्र भुमित त्रिवार मानाचा मुजरा !! आज 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिन अथवा कामगार दिन 52 वर्षापुर्वी संयुक्त महाराष्ट्राचा लढा पुर्ण होवुन मुबंई सहीत संयुक्त महाराष्ट्रचा मंगल कलश महाराष्ट्रात येवुन नव्या राज्याची स्थापना झाली तोच हा स्ववर्ण दिन. मुंबई सहीत संयुक्त महाराष्ट्र निर्मिती साठी शहीद झालेल्या 105 हुताम्याचा बलीदान दिवस, अर्थातच आजच्या या सुवर्ण दिनी दळभद्री सरकारला शिव्या देवु तेवढ्या कमीच कारण महाराष्ट्रच्या अधोगतीचा वेग पाहील्य कोणताही सर्वसामान्या या सरकारला शिव्या शापच देत आसेल यात शंका नाही. एके काळी दिल्लीचे तख्त हदरवनारा महाराष्ट्र आज दिल्लीला मुजरा करतोय आणी नेहमी प्रमाणे महाराष्ट्राच्या पदरी फक्त उपेक्षा येते. दुष्काळ आसो विजेचे भारनियमन आसो, किंवा शेतकर्याच्या अत्महत्या, सगळ्याच प्रश्नावर सत्ताधारी मुग गिळुन बसलेत आणि विरोधक ही अक्रमक नाहीत आसो सगळी कडे फक्त शिमगा सुरु आहे . राजकर्ते बेफाम झाले आहेत आणी जनता षंढ, कोणाला कोणाच काही नाही ? ज्या शिवप्रभुनी रयतेचे राज्या ज्या पावन भुमित बनवले तोच महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम झाला आहे . देशाचा कारभारा बरोबरच राज्याच्या कारभाराचे देखील बारा वाजले आहेत. संताचा, कवीचा, लेखकाचा, विरांचा लढवय्या महाराष्ट्र कुठे राहीलाय आज ? छत्रपती शिवाजी महारांजांचे वंशज आम्ही आज शर्म वाटली पाहीजेत अम्हाला ? हे सगळ बघतांना, शाहु, फुले, अंबेडकर, टिळक, सावरकर यांचा अदर्श जगाला सांगतोय आम्ही पण आमची पाटी मात्र कोरीच, आसो आजच्या या सुर्वणी आनखी काय लिहनार आणी बोलनार जे घडतयं ते आपल्या संगळ्यांच्या डोळ्या समोर आहे . ह्या महाराष्ट्राचा भुतकाळ (इतिहास) उज्वल आहे पण भविष्य मात्र अंधकारमय आहे किंबहुना एकंदरीत आपरिपक्व राज्याकर्त्यानी त्याची पुर्ण वाट लावली आहे . पुन्हा एकदा हा महाराष्ट्र बलशाली करण्या करती चांगल्या नेऋत्वाची गरज आहे . आर्थातच हे नेऋत्व आपण निर्मान केल पाहीजेत तेव्हाच या प्रगत विकसित आणी तेजेमय महाराष्ट्राच्या पुढे दिल्लीही लोँटांगन घालेल... सर्व मराठी बांधव आणी मायबाप वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या खुप शुभेच्छा ।।

No comments:

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...