Sunday 1 April 2012

रामराज्य ते लोकराज्य.....

आज रामनवमी तमाम हिंदु बांधवांच्या आराध्य दैवत प्रभु श्री रामचंद्र यांचा जन्म दिवस. राम म्हटलं की सर्वात प्रथम आठवते ते गांधिव धणुष्य आणि ते लियया पेलुन या भारत भु वर रामराज्य स्थापण करनारा महापराक्रमी, पुरुषोत्तम, नाना उपाधी अंलंकृत राजा श्री राम ! आपल्या संपुर्ण आवतार काळात एक गुणी पुत्र, गुणी पती आणि एक गुणी बाप कसा आसावा याची मुल्य तुम्हा आम्हाला आपल्या वागनुकीतुन शिकवनारा पुरुषोत्तम राम !

ज्या वेळेस पिता दशरथाची आज्ञा शिरवंद्या मानुन सकल राजयोगाला धुडकवुन वनवासाला निघालेला राम आणि वनवासात ही रावनाचा वध करुन दिग्विजय करुन पुन्हा परत येनारा राम !

वनवासात हंनुमंत सुग्रीव जामुंवत आश्या शुर विरांन सह युध्द कौशल्य पणाला लावुन आही रावन, मही रावन, बाली, इंद्रजित, कुंभकर्ण, रावन, आश्या आनेक योध्दांना धर्मनिती ने परास्त करनारा राम !

आजुन काय काय सांगु रामा बद्दल ज्या पुढे हंनुमंता सारखा महावीर परक्रमी नतमस्तक किंबहूना श्री रामाचे दास्यत्व घेतो तेथे तुम्ही आम्ही तर कस्पटा समान.

रामराज्य म्हणजे धर्मावर अधारित राज्य, ज्या तत्वांना धर्ममान्यता आहे आश्या तत्वांच्या आधारावर चाललेले कुठलेही राज्य हे रामराज्या आसतं शालिवहना पासुन ते शिवछत्रपतीच्या हिंदवी स्वराज्य पर्यत सगळीच राज्या धर्माच्या आधारावर चालत होती म्हणुनच ती राम राज्य होती आणि 1947 पासुन आम्ही गांधी आणि नेहरूच्या नेऋत्वा खाली लोकराज्य स्विकार केला आणि तेथेच आमचा घात झाला आणि अम्ही कायमचा मुकलो रामराज्याला..

राम राज्यात आर्थिक सुबत्ता होती योग्य प्रशासन होते धर्म होता आणि योग्य न्याय संस्था ही..म्हणुनच रामराज्यात लोक अंनदाने भरभराटीने जगत होती आणि आज आमच्या लोक आता यातल काय उरयल ते सांगा ना ? सगळी कडे भ्रष्ट्राचार बोकाळलाय, बलात्कार खुन दरोडे तर राजेरोस पणे चालु आहेत आनेक खटले न्यायालयात तसेच पडुन आहेत, माहागाईच तर सांगुच नका ?
"लहरी राजा आणि प्रजा अंधळी आंधातरी दरबार "
आशीच काही आवस्था आमच्या भारताची झाली आहे .आणि धर्माच तर काय आमच्या रामजन्मभुमी साठी आम्हाला न्यायालयात न्याय मागावा लागतो ? या पेक्षा मोठी शोकांतीका काय ? आमचे देव देवळातुन चोरीला जातात त्यांच्या साठी अंदोलन करावे लागतात, यावरुनच कळते या देशात धर्मावर किती आस्था उरली आहे आसो तो भाग निराळा विषय आहे तो रामराज्य ते लोकराज्य ? काय चाललय या देशात कुठुन कुठे आलोय आपण , एके काळी सगळं जग कुतुहुलाने भारता च्या अदर्श संस्कृती कडे पाहायचा ती संस्कूती गेली कूठे देशचालवनारे पण भ्रष्ट्र झाले आणी आणि देशात राहणारे पण ?कंटाळाच आलाय म्हण ना ?. मग कसे आवतरेल इथे रामराज्य सगळीच नितीमुल्ये पायदळी तुडवत तुम्ही आम्ही रामराज्याची अपेक्षा करनार तर ते कस शक्य आहे . फक्त रामनवमी च्या दिवशी रामाचा पराक्रम आठवायचा आणि उरलेल्या दिवशी रावन पुजायचा याला काय अर्थ आहे का ? जर पुन्हा एकदा रामराज्य स्थापण करायचे आसेल तर प्रभु श्री रामाचा अदर्श पुढे जरुर ठेवा पण त्यांची प्रत्यक्ष वाट पाहु नका, स्वाःताच राम व्हा !! आणि आपल्या अजुबाजुला आसनार्या भ्रष्ट्राचार महागाई आणि आशाच सगळ्या कुप्रवृत्तीचा नाश करन्याचा प्रयत्न करा नक्कीच एक दिवस तरी पुन्हा एक नव्या रामराज्याची स्थापणा या भारतात होईल यात शंका नाही.

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...