कालच दैनिक ग्रामीन न्युज च्या प्रकाशन आणि कार्यालय उद्घाटन समांरंभ शहापुर मध्ये मोठ्या थाटात पार पडला, खरं तर गेल्या एक वर्षात दैनिकाच्या रजिट्रेशन पासुन ते प्रकाशना पर्यतचा काळ संपादकाच्या जोडीला जवळुन अनुभव घेन्याचा योग या निमित्ताने आला. आजही या कालावधीत आलेले अनुभव खरंच थक्क करनारे होते, दैनिकाच्या प्रत्येक वळनावर एक नविन समस्या त्या समस्याला तोंड देताना झालेली त्रिठातिपट खरंच आजही मन विषन्वय करते. आर्थात या सगळ्याच आडचनी वर मात करत एकाद्या योध्या प्रमाणे आपल्या ध्येयावर अटळ राहत शेवटी तो अंनंदाचा क्षण आमच्या अयुष्यात आलाच. ठाणे जिल्हात ले पहीले ग्रामीन दैनिक वृत्तपत्र ग्रामिण न्युज प्रकाशित झालेच. आखेर एक वर्ष केलेल्या अथक प्रयत्नाना यश आलेच याचा मनोमन आनंद झाला .
गेल्या तिन वर्षापासुन मासिक नवी चित्रधारा संपादक कम मित्राच्या जोडीने काम कारीत आहे. या तिन वर्षाच्या काळात शहापुर तालुक्यातील आनेक प्रश्न शासन दरबारी मांडन्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत आहोत. अर्थातच हे प्रश्न आजुनही तसेच पडले आहेत तो भाग वेगळा, पण मासिक नवी चित्रधारा मध्ये काम करतांना खरी पत्रकारीता(सेटीँग विरहीत) कशी आसावी याचा पुर्ण अनुभव या कळात आला.पण हा अनुभव पाठीशी आसतांना ही एका ही दैनिकाने प्रतिनिधी म्हणुन काम दिलं नाही याच नवल वाटतं काहीकांनी काम दिल पण ते पत्रकार कम अँड एजंट जास्त होते, आणि ती आँफर स्विकारन आमच्यात कदापी शक्य नव्हते. आसो तो भाग वेगळा पण मासिकात काम करतांना खुप अडचनी येत होत्या हाती आसलेल्या आमच्या बातम्या कोणी लावत नव्हता कोणा कडे दिली तर पस्परर सेंटीग केली जायची त्यामुळे एक मोठी कोंडी झाली होती हि कोंडी फोडायची कशी याच विचारात आसतांना संपादकाने स्वःताच दैनिक काढन्या विषयी विचारले आणि क्षणातच नैराश्य दुर होवुन पुढच्या क्षणी होकार दिला. ग्रामीन भागातुन एखादे दैनिक सुरु करण किबहुना ते चालवने म्हणजे एक मोठे आव्हान आहे पण हे आव्हान आम्ही स्विकारलयं ते एक चळवळ म्हणुन इथे हि काही जन वळवळ करायला येतीलच पण आश्या हजारांना पुरुन उरेल येवढ बळ या लेखनीत आहे त्यामुळे त्याची चिंता नाही.
दैनिक ग्रामीन न्युज एक चळवळ आहे तुमच्या माझ्या अस्वस्थ ग्रामीन भागतल्या तरुणांची, हि चळवळ आहे भ्रष्ट्राचार्या विरोधातली हि मग्रुर लोकप्रतिनिला वढनीवर आनन्या साठी भुमाफियाना चाप देन्या साठी आन्याया विरुध्द लढन्या साठी मुजोर अधिकार्याना माज उरवन्या साठी आणि मायबाप गोर गरीब जनतेची सेवा साठी आणि ग्रामीन विकासा साठी. खुप काही झेलत हा प्रवास सुरु केलाय, एकदा गलबत समुद्रात लोटल्या वर वादळवार्याची तमा कोण बाळगतोय तसच काहीसं झालयं आता माघार नाही. फक्त तुमच्या आशिवादाची आणि सहकार्याची जोड पाहीजेत.
दै. ग्रामीण न्युज सर्वसामान्याचा एक आवाज आहे. जो आवाज अजुन पर्यत शासनाच्या आणि राज्यकर्ताच्या कानावर कधी पोचला नव्हता पण काही दिवसातच या आवाजाने सरकारच्या कानठळ्या बसनार आहेत . देशातील एक नंबर जिल्हा म्हणुन ठाने जिल्हाचा नावलौकीक आहे . पण येथे ग्रामिन भागाचा विकास किती झालाय ? जिल्हा विभजध आजुन होत का नाही ? आसे आनेक प्रश्न आहेत आनेक समस्या आहेत ? ज्यांची उत्तरे सरकार कडुन घ्यायची आहे आनेक पिडितांना न्याय करायचा आहे आता रोजच भेटु नव्या रुपात नव्या अवेशात..
दै. ग्रामिण न्युज चे संपादक कम मित्र "उमेश भेरे" यांनी आपल्या या चळवळी मध्ये जो विश्वास दाखवुन मला सहभागी केले किंबहुना काही जबाबदार्या दिल्या त्या बद्दल करु तेवढे धन्यवाद कमीच आहेत. दै. ग्रामिन न्युज च्या या चळवळी सहभागी आसनार्या आनेक ज्ञात अज्ञात मित्रांचे आणी मायबाप वाचकांचे ही खुप खुप आभार !! आता पर्यत आमच्यावर प्रेम करनारे आमचे हितचिंतक वाचक आणि मायबाप जनता यांचे वेळप्रसंगी सावरनारे मदतीचे हात सोबत आहेत म्हणुन आता पर्यतचा प्रवास सुककर झाला पुढे ही आसाच लोभ आसावा !!
धन्यवाद !!!
प्रशांत गडगे
संयुक्त संपादक
दै. ग्रामिन न्युज.
सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Subscribe to:
Post Comments (Atom)
तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
-
शहापुर ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका गेली कित्तेक वर्ष या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , आणि काँग्रेसची सत्ता पण विकास मा...
-
✍🏻 प्रशांत गडगे संपादक-सा. विचारमंथन नुकताच निवडनुक आयोगाने पत्रकार परीषद घेवुन महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचा कार्यक्रम जाहिर केला...
-
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
1 comment:
lakh lakh shubhechha tuzya pudhchya vatchali sathi
Post a Comment