आज चैत्र शुध्द प्रतिपदा आर्थात गुढी पाडवा आम्हा तमाम हिंदु चा नववर्षाचा पहिला दिवस. भल्या पहाटे उठुन सकाळी अंनंदाची भरभराटीचा चढता आलेख दाखवनारी यशाची भव्य गुढी आपण दारात बांधतो. गोडधोड निवैद्य दाखवुन नंतर आपल्या दिनचार्यला सुरुवात करतो, पण गेल्या काही वर्षापासुन आपला कोणताही सन साजरा करतांना पहिंल्यांदा आठवते ते बालपन !! लहान होतो तेव्हा काय धम्माल आसायची या सनांमध्ये आणि आता फक्त उरलेय ती फक्त औपचारीकता ? त्या वेळी सगळ्याच सनांना एक वलय होत , मग ती दिवाळी दसरा आसो की होळी रंगपंचमी आसो नवरात्र आसो की गणपती नुसती धम्माल आसायची. आता ती मौज मजा कुठे पाहायलाच मिळत नाही. आसो तो भाग वेगळा , पण गेल्या काही दशकात देशाच्या संस्कृतीत बदल घडत आहेत , टिव्ही इंटरनेट माध्यमान मध्ये बालपण कुठे तरी हरवत चालल्याचा भास होतोय..
.
आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा होळीच्या पाच दिवस आधी होळी पेटवायचो अर्थात तेव्हा आईचा ही मोठा पांढीबा आसायचा गावात बोंबा मारन्या पासुन लाकडे चोरन्या पर्यत सगळी धम्माल. गुढी पाडव्याचा दिवस म्हणजे पाटीपुजन किंवा सरस्वती पुजन मग त्याला फुले आनण्या पासुन तर पाटीवर सरस्वतीची चित्र काढन्या पर्यतची धडपड न सांगीतलेलीचा बरी त्या नंतर धुळवड रंगपंचमी गुढीपाडवा गोकुळआष्टमी हंडी दिवाळी दसरा गणपती नवरात्र या संनाना कैफ काही निराळाच, सगळ काही भारावुन टाकनार वातावरन संपुर्ण ठिकानी पाहायला मिळायचे पण त्याच बरोबर मोठे पण लाहानग्यात मिळुन मिसळुन सगळेच सन मोठ्या अंनंदाने साजरे व्हावचे खरचं कीती जादुयी दिवस होते ते आज आचानक आठवले म्हणुनच हा लेख प्रपंच .
.
आज सन फक्त औपचारीकता म्हणुन साजरे केले जातात याचाच प्रत्यय येतोव याच्या मागची नक्की कारने काय आसतील याचा विचार केला तर तर एकच उत्तर सुचतयं हे दळभद्री सरकार आणि चंगळवादी आणि स्वर्थी नितीमत्ता. दिवसेंनदिवस महागाईच्या भ्रष्ट्राचाराच्या नव नविन मोठ्या गुढ्या उभारन्यात सरकार मशगुल आहे आणि आम्ही त्या गुढ्या ना हातभार लावन्यात कधी कधी तर राग अनावर होतो त्याच गुढ्या च्या बांबुनी सरकारला आणि भ्रष्ट्राचार्याना फोडुन काढून त्यांच गुढीला उलट टांगव पण हातबल आहोत . आसो तुम्ही पण सन साजरेच केले आसतील ते दिवस आठवा आणि आत्ताचे काय फरक आहे तो लगेच कळायचा ? त्या वेळी घरात पैसा नसायचा पण सुख खुप आसायच आता नेमक उलट झालंय पैसा आहे पण सुख नाही त्या मुळेच संस्कार देन्यात आपण कमी पडतोय , महागाई वाढलेय महिनाभर राबुन पण शेवटी हातात काहीच उरत नाही तणाव वाढतोय स्पर्धा वाढतेय मग त्यात कसले आले सनवार. आसो आजचा दिवस नव चैतन्याचा, आनंदाचा भरभराटीचा, आश्या मंगलदिनी काय कोणाला शिव्या शाप द्यायचे ? पण दळभद्री सरकारने हे समजुन घ्यायला पाहीजेत कित्तेक कुंटुबांची वाढत्या माहागाई मुळे होनारी कुंचबना पाहावत नाही. दरवर्षी आनेक सन येतात आणी जातात आपल्यात नवी उमेद काय येत नाही. आली तरी ती क्षणभंगुर !!
.
चैतन्याच्या आणी अंनंदाच्या या सनाला कोणाची दृष्ट न लागो तुमचा अंनंद आसाच द्विगुणी होवो गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या सर्व वाचकांना अंनंदमयी शुभेच्छा ।।
सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Subscribe to:
Post Comments (Atom)
तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
-
शहापुर ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका गेली कित्तेक वर्ष या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , आणि काँग्रेसची सत्ता पण विकास मा...
-
✍🏻 प्रशांत गडगे संपादक-सा. विचारमंथन नुकताच निवडनुक आयोगाने पत्रकार परीषद घेवुन महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचा कार्यक्रम जाहिर केला...
-
प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे, सध्य...
No comments:
Post a Comment