Monday, 5 March 2012

लोकशाहीचा शिमगा...

शिमगा जसा जसा जवळ येते तस तशी नवनवीन सोंग आपल्या आवती भवती पाहायला मिळतात आत्ताच महापलिकेचा शिमगा झाला,पण महापौर निवड न झाल्या मुळे ज्या काही ज्या काही राजकीय बोंबा मारल्या जातात त्यामुळे सर्वसामान्य तर पुरती हैरान झाली आहे, नगरसेवकांच्या पळवापळवी आसो किंवा घोडेबाजार आसो आरोप आसो वा प्रत्यारोप एकुनच भारतातील राजकारणाचे चित्र विचित्र झाल्याच पाहायला मिळते. कलमाडी राष्ट्रकुल घोटाळ्यातुन बाहेर येताच न येताच तोच काँग्रेस फुकाशंकर तुरंगाची हवा खायला तयारच आहेत. करोडो रुपयांचे घोटाळे करनारे सगळेच नेते चार पाच महिन्यांचा तुरंग मुक्काम करुन छाती काढुन पुन्हा रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत, आणि जनता हतबलतेने हे सगळ पाहत बसली आहे . कुठे चालीये आपल्या देशाची लोकशाही ? लोकशाहीच्या नावावर सगळ्या देशात झुंडशाही माजली आहे तरी आम्ही या लोकशाहीचा टेंभा जगात आभिमाने मिरवत आहोत . संसद न्यायपालिका प्रशासन आणि वृत्तपत्रे ह्या लोकशाहीच्या चारही स्तंभाना भ्रष्टाचाराने पोखरले आहे .एक दिवस लोकमताचा प्रकोप लोकशाहीचा हा डोलारा कधी कोसळेल याचा नेम नाही. जिकडे बघावा तिकडे भ्रष्टाचार बोकाळलेला दिसतो. फुकाशंकर सारख्या एका भाजी विक्री करनारा आज करोडो रु . कमवतोय याचा अर्थ काय समजायचा ? सरकार मधील नेते अघोषित सावकार बनले आहे उठ सुट कोणी ही येतय सरकारी तिजोरीवर डल्ला मारुन प्रचंड पैसा कमवतोय आणी जनता आपली कर भरुन आधीच बेजार आहे आणि त्यात माहागाई रोजच वाढतेच आहे. तिकडे आण्णा हजारेनी भ्रष्ट्राचारच्या मुद्द्यावर चांगलेच वातावरण पेटवले होते आणि त्यालाही ग्रहण लागले केजरीवाल बेदी भुषन सारखी सगळेच सहकारी भ्रष्टाचारच्या आरोपांन मध्ये अडकले. आण्णासारख्या स्वच्छ चरित्राची शंभर माणसे या आब्जावधी लोकसंखेत नेऋत्व करायला मिळने कठीन होवुन बसलयं म्हणजे या देशात भ्रष्टाचारने कोणती पातळी गाठलेय याचा अंदाज आलाच आसेल, कोण काय बोलतो कोण काय ऐकतो याच कोणाच कोणाला काय ठाव ठिकाना नाही त्यातच पुढे बजेट आलच आहे ? किती करवाढ होते या चिंता सर्वसामान्याना पडलीच आसो पेट्रोल डिझेलचे भाव तर आता महीन्याला वाढायला लागले आहेत. आसो देशात सर्वत्र शिमगा सुरु आहे कुठे निवडनुकांचा तर कुठे महापौर निवडीचा कुठे क्रिक्रेट चा यात आमचे पंतप्रधान आणि आमची सोनिया कुठे मुग गिळुन बसली आहे हे त्यांच त्यांना ठावुक? आसो या देशात काँग्रेस जेव्हा पासुन सत्तेत आली आहे तेव्हा पासुन जनता फक्त शिमग्याचा बोबांच मारीत आहे. कधी भ्रष्ट्राचारच्या नावाने कधी माहगाईच्या नावाने तर कधी विकासाच्या नावाने कधी एकदाची या काँग्रेसची होळी होते आणी या देशातली जनता सुटकेचा श्वास घेते हे आता दैवालाच ठावुक.......!!

No comments:

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...