Monday, 19 March 2012

भ्रष्ट्राचार आणि मी.......

गेल्या चार पाच वर्षात कधी नव्हे तेवढी भ्रष्ट्राचाराची प्रकरने एका मागोमाग एखाद्या फटाक्याच्या माळे सारखी फुटत गेली आणि या भ्रष्ट्राचाराचा आवाजाने सगळ्याच सर्वसामान्य जनतेच्या कानठळ्या बसल्या , त्यात मग टु जी स्पेट्रम आसो राष्ट्रकुल, खाण घोटाळा आसो किंवा कालपरवाच अटक झालेले कोणी आपीएस आधिकारी आसो, आकडे ऐकले तर भुवळ येईल एखाद्याला, 200 कोटी च्या पुढेच सगळे ,ऐवढा पैसा कसा येतो यांच्या हातात, आज दोनशे रु. कमताना दमछाक होते इथे आणि हे मंत्री आधिकारी करोडो रु. बेहिशोबी मालमत्त कशी कमवतात याच आश्चर्य वाटतयं मला आसो तो भाग वेगळा पण या भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणांनी झोप उडालेय सर्वसामान्यांची हे मात्र खर , गल्लीतल्या चिरीमिरी पासुन या भ्रष्ट्राचाराला सुरवात होते ती थेट दिल्लीत मंत्रालयात जावुन पोचते , ट्राँफीक सिग्नल वरची दाहा विस रुपयाची ची चिरी मिरी आसो किवां संसदेतलं लाच प्रकरन आसो भ्रष्ट्राचार ने कुठली पातळी गाठलेय याचा अंदाज आता तुम्हाला आला आसेल.

पण भ्रष्ट्राचार वाढवायला खरा जबाबदार कोण आहे , तुम्ही अम्हीच ना ? लायसन काढायला, पोरांची अँडमिशन्स करायला, ट्राफिक हवदारला, दाखले बनवायला, किंवा आपले कुठले ही सरकारी काम लवकर उरकुन घेन्यासाठी आपण चिरीमिरी देतोच ना ? इथुनच तर सुरुवात झाली भष्ट्राचाराला आणि त्याचा शेवट मंत्रालयात होते. कारण इथे लाच घेने गुन्हा आहे पण लाच देने नाही आणि हिच गोम आहे लाच घेनारे पकडले गेले पण प्रत्येक ठीकानी लाच देनारे आहेत त्याच काय ? मग कसा संपनार या देशातला भ्रष्ट्राचार !! फक्त बोँबा मारुन काही होनार नाही किंवा आण्णाच्या अंदोलनाला पांढीबा देवुन सुध्दा यात काडीचा हि फरक पडनार नाही. कारण पायाच कमकुवत आसेल तर इमारत उभीच कशी राहील तुम्ही आम्ही चिरीमिरी द्यायची बंद करु तेव्हाच तर एक नवी सुरवात होईल. आता प्रत्येक जन विचार करत आसेल मीच सुरवात का करू ? आणि इथेच माशी शिंकली ! म्हणुनच अजुन पर्यत हि सुरवात झाली नाही आणि या पुढे होनार पण नाही, हाच भ्रष्ट्राचार बकासुरा सारखा रोज रोज वाढत जाईन आणि एकदिवस तो आपल्याच पुढच्या पिठ्या खावुन टाकील यात शंका नाही.

या चिरीमिरीनेच आज देश विकला जातोय. जन्माला येनार्या मुलाचा जन्मदाखला लाच दिल्या शिवाय मिळत नाही आणि मुत्यृ झालेल्या व्याक्तीचा मृत्यु दाखला ही लाच दिल्या शिवाय मिळत नाही या पेक्षा मोठी ती शोकांतीका ती कुठली, दुर्देवानेच भ्रष्ट्राचार इथे शिष्टाचार झालाय काँलेज ला जानारा एक युवक पण आज बिना परवाना बाईक चालवायला घाबरत नाही का ? तर विस रु दिल्यावर कुठलाही ट्रँफीक हवलदार तुम्हाला लगेच सोडतोय. लाच देन्या आणि घेन्याची हिच प्रवृत्ती देशाला विघातक आहे . आज तुम्ही आम्हालाच कायद्याचा धाक नाही तर मंत्री आधिकारी कशाला घाबरतील कायद्याला, पैश्याच्या जोरावर आज या देशात काहीही होतय ! तुम्ही काय त्यांच वाकड करनार आहेत आणि अगदी आसचं घडतय ना ? कुठे गेला तो तेलगु , राजा , कलमाडी अजय कुमार कृपाशंकर आहे काही लक्षात काय वाकड केल आपण यांच या देशात , आण्णा ओरडुन ओरडुन थकले काय झालं जनलोकपालच ? सगळ्या संवेदना मेल्यात आपल्या स्वर्थी पणा पुढे पंगु झालोय आपण . पुढे काय करायच माहित नाही निवडनुका आल्या मत द्या नाहितर विका, सरकार काय करतय ? देनघेन नाही , पेट्रोल डिझेल वाढलयं ठीक आहे , सगळं काही बिनभरवशी चालु द्या ? पण शिस्त नावाची एक वस्तु आसते, तुम्ही आम्ही ती पाळलीच पाहिजे तरच हे मस्तवाल मग्रुर आधिकारी मंत्री वठनीवर येतील. आज आपणच ठरवलं लाच द्यायची नाही कायद्याला बगल देवुन कोणतेही काम करायच नाही हो मला माहितेय हे अवघड आहे पण शक्य आहे प्रयत्न तर करुन बघा, आज आपल्याला शिस्त लागली तर घरातले इतर ही सदस्य तिच अनुकरन करतील ना ? आपण बदललो की समाजही बदले ट्राय करायला काय हरकत आहे ! आज आपण सुरुवात नाही केली तर कदाचीत पुढच्या पिठ्या पण आश्याच वागतील लाच द्या लाच घ्या निर्लज्य पणे या पाट्या जागो जागी दिसतील आणि त्या वेळची परिस्थिती किती भयान आसेल याची कल्पनाच न केलेली बरी, या गेंड्याच्या कातडीच्या आणि सुस्तावले ल्या सरकार कडुन भ्रष्ट्राचार निर्मूलनाची काहिच अपेक्षा नाही. म्हणुन थेट तुम्हाला साद घातली, पटल तर घ्या नाही तर चालु द्या !!

2 comments:

Anonymous said...

Prashant Gadge saheb, खरच खूप छान, वक्ती हा विचारांनी मोठा होत असतो,तुमचे विचार खरच खूप मोठे आहे. समाजात परिवर्तन आन न्या करिता तुमच्या सारख्या वक्तींची समाजाला आवशकता आहे. असेच ब्लोग लिहित राहा..........नक्कीच परिवर्तन घडेल.

p.nayak said...

खरच खूप छान. We are Proud of You. Vande Mataram.

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...