Friday 24 February 2012

अर्थकारणात फसलेले राजकारन ...

राज्यातला दाहा मोठ्या महानगरपालिकाच्या निवडनुका आत्ताच पार पडल्या कोणाला घवघवीत यश आल तर कोणाची झोळी पराभवाने भरुन गेली, एक दिवसाचा मतदार राजा पुन्हा एकदा पाच वर्षासाठी भिकारी झाला, कोण किती आश्वासने पाळतोय हे येत्या पाच वर्षात कळेलच तुर्तास विकासाची गंगा अंगणात येई पर्यत तरी मतदार राजाला वाट पाहन्या शिवाय गंत्यतर नाही. आसो निवडनूका झाल्या आहेत निदान 50% मतदारांनी आपला कौल देवुन लोकशाही पुर्ण नाही पण आर्धी तरी बळकट करन्यास थोडा हातभार तरी लावला आहे. आता निवडुन आलेल्याच सगळ्याच उमेदवांरनी ठरवायच आहे की ही लोकशाही अजुन बळकट करायची की खिळखीळी.

या निवडनुकीत प्रचाराच उडालेला प्रंचंड धुराळा गल्ली पासुन शहराच्या मुख्य रस्त्यावर पोचला आरोपांच्या प्रत्यारोपाच्या फैरी नी महाराष्ट्राच दणानुन गेला. बाळा साहेब, राज ठाकरे, आजित पवार पृथ्वीराज चव्हान सगळ्याच नेत्यांनी सर्वस्व पणाला लावून विजयश्री खेचुन आनन्याचा प्रयत्न केला पण प्रत्येकाला कुठे पराजय मिळाला तर कुठे जय. मुंबई ठाण्यात युतीला पुन्हा एकदा यश आलं तर नाशिक मध्ये मनसे वचक कायम राहीला. राष्ट्रवादीने ही पुणे पिपरी चिंचवड आपल्या कडे शाबुत ठेवुन कमाल केली इतर ठिकाणी काँग्रेसनी आपली लायकी थोडी फार संभाळुन ठेवली. आसो.. तुम्ही आम्ही सामान्य माणसं मत देण्या पलिकडे आपण काय करु शकतो? पण या निवडनुकीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली तीची सल मनात सलत होती आणि म्हणुनच तुमच्याशी हा संवाद साधतोय, निवडनुक संपल्या का मग शिमगा सुरु होतो. जय पराभवाचे विश्लेषन सगळ्याच नाक्या नाक्यावर होतांना दिसतयं पण मला कोणाच्या जय पराजयची चर्चा करायची नाही. मला थेट बोलायचं आहे ते निवडनुकीत वापरल्या जानार्या पैशाबद्दल, होय मतदाराना पैशाचे अमिष दाखवुन मते खरेदी केली जातात. त्या बद्दल वर वर साधा वाटनारा हा प्रश्न प्रत्येक निवडनुकीत गंभिर होत चालला आहे.

एक काळ आसा होता लोक समाजकारण करण्या साठी राजकारणात येत होती आणि आजच्या काळात लोक स्वःताचे अर्थकारन सुधारन्या साठी राजकारनात येतात. आशी किती उदाःने आपल्या समोर आहेत एकेकाळी रस्त्यावर भाजी विकनारा आमदार करोडपती होतो इतकचं काय हो माझ्याच मतदार संघातल्या आमदारच घ्या ना ? जेमतेम कुंटुबात वाढलेला हा आमदार तिन वेळा निवडुन आला आहे आणी मागच्या निवडनुकित त्याची प्रोपर्टी होती 5 करोड, आता काय म्हणाल याला ? आख्ख अयुष्य खर्ची घालुन पण आपण एक करोड रु . बचत नाही करु शकत नाही ती फक्त 15 वर्षाच्या अमदारकीत शक्य आहे . खासदार मंत्री याची दुप्पट तिप्पट आसेल यात वादच नाही. हाच पैसा पुन्हा निवडनुकीत पेरला जातो आणि पुन्हा पाच वर्षात त्याच पिक घ्यायला नेते मंडळी तयारच आसते. या निवडनुकीच्या काळात पैश्याचे नीच राजकारण फार जवळुन बघायचा योग आला, आणि समाजकारण राजकारणा पासुन पुर्ण विभक्त झाल्याच दुर्देवी चित्र पाहायला मिळाल.. काही आपवाद वगळता सर्व सामान्य माणूस आता नगरसेवक आमदार खारसदार कधीच बनु शकनार नाही याची प्रर्कर्षाने जाणिव झाली. आणि तुम्ही सामजिक क्षेत्रात तळमळीने काम करुनही ही मतदार तुम्हाला मत देतीलच याची शाश्वती नाही. नुसते होर्डिग्स् स्टिकर आव्हँड्टाइज, प्रवास कार्यकर्त्याचा खर्च एका साध्या निवडनुकीचे बजेट काही लाखाच्या घरात आसतो आणि नोटा देवुन मत विकत घ्यायचे आकडे काही निराळेच. आता तुम्हीच सांगा तुम्हाला अम्हाला किवां कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला हा ऐवढा खर्च झेपनार आहे का ?? दुसरी गोष्ट जानवली ती म्हणजे आशिक्षितांन बरोबरच सुशिक्षित मतदार ही पैश्याच्या अमिशाला बळी पडायला लागले आणी देशातल्या लोकशाही वेगळ्याच मार्गावर भरकटत चालल्याची चिंता आधिकच वाढली. आज पर्यत वाटत होत गरीब आशिक्षित पैशाची लाचारी साठी मत देत होती पण सुक्षितांच काय ? शिक्षनाचा प्रसार झाला तर देश सुधारेल आस वाटतं होत पण दुर्देवाने देशाला खड्ड्यात टाकनारे कोण आहेत सगळे सुशिक्षितच ना ? गरीब बिच्चार दोन वेळच्या आन्नाच्या आशेने जगतोय आणि सुशिक्षित आपल्या श्रिंमती साठी धडपतोय आणि त्यातच या राजकारन्यांच फावतयं, हे जे सगळे प्रकार चालले आहेत ते देशाला विनाशा कडे नेत आहे. ज्यांना समाजाविषयी प्रेम आहे सामाजिक कामाची आवड आहे ज्यांना उद्याच नेऋत्व करायचे आहे आस नेऋत्व उदयाला येन्या पुर्वीत पैश्याच्या जोरावर उखडुन फेकुन दिल जातयं आणि चुकीची माणसं एकदा काय राजकारनात गेली की तिथल्या दहा चांगल्या माणसांना ते चुकीची मार्गावर आनतात आणि खाल पासुन वर पर्यत ज्या चुका होतात त्याला सर्वस्वी जबादार आसतो तो सर्वसामान्य ! आणि त्याची फळ भोगतो तो आपला देश.
या सगळ्याच परिस्थितीत समोर आसतांना आसेच अनुभव तुम्हाला ही आले आसतीलच ? कसा मार्ग काढता येईल यातुन ? पुढे काय होईल या देशाच ? आश्या अनेक प्रश्नांनी पुरता गोंधळुन गेलोय मी ! तुम्हाला सुचतात का या प्रश्नांची उत्तरे ? सुचली तर नक्की कळवा !!

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...