Friday, 5 August 2016

सावित्रीचा कहर..

कधी नव्हे तेवढा पाऊस या वर्षी संपुर्ण महाराष्ट्रात होत आहे. खर तर दुष्काळाच्या जखमांनवर अलगद हळुवार फुंकर मारनारा हा पाऊस गटारी आमावस्येच्या दिवशी मात्र काळ बनुन आला आणि ४४ निष्पाप नागरीकांचे बळी घेऊन गेला याच वाईट वाटतं. मंगळवारी संपुर्ण रायगड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी सुरु झालेले पाऊस संपुर्ण दिवसभर थांबला नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्वच नद्या दुधडी भरुन आक्राळ विक्राळ रुप घेवुन वाहत होत्या. त्यातलीच एक सावित्री नदी, या नदिवर महाड पासुन पाच किमी वर एक ब्रिटीशकालीन पुल आहे. तिनशे मिटर म्हणजे जवळपास अर्ध्या किमीचा हा विशालकाय पुल सावित्री नदिला आलेल्या पुरात व  निसर्गाच्या एका तडाख्यात पाण्यात वाहुन गेला. क्षणात होत्याच नव्हतं झाले पण दुर्देवाने या पुलावर त्या वेळी राज्या परीवहन विभागाच्या दोन बस व पाच सहा चार चाकी वाहने प्रवास करीत होती तीही सावित्री नदीच्या पुरात वाहुन गेली. हि घटना रात्रीच्या किर्र अंधारात आणि मुसळधार पावसात घडली आसल्याने प्रशासन आणि नागरीकांना तत्काळ मदत करणे जमले नसले तरी या कारणाने निसर्गा समोर माणुस किती आगतिक आणि हतबल आहे याचा प्रत्यय येतो.
              खर पाहिलं तर सावित्री नदिला पुर येन हि नैसर्गिक अपत्ती नाहीच आहे. पुल कोसळनं म्हणजे मानवनिर्मित हा अपघात आहे..कारण नदि नदिच्या ठिकानाहुन वाहत होती पुल कोसळलाय हा अपघातच आहे. पण त्या दिवशी निसर्गकोपला होता येवढ नक्की आसो दुसर्या दिवशी सकाळी जेव्हा घटना प्रसार माध्यमांना कळाली तो पर्यत शोधकार्य सुरु झाले होते. प्रसारमाध्यमे, प्रशासनातले निगरगट्ट आधिकारी, मंत्री, नेते सगळेच घटनास्थळी हजर होतात. जो तो आपल्या परीने आपण कस निर्दोष हे रेटुन सांगण्याचा केवीलवाना प्रयत्न करतांना पाहीले. यात परीवहनमंत्र्यांना  दोन एसटीत बावीस जन बुडाले याच दुख कमी पण एका बस ड्रायवर ने समयसुचकता राखुन अनेकांना पुलावर जाण्यापासुन रोखल्याच त्वेशाने सांगत होते पण बुडालेल्या बस आणि प्रवाशांचे काय ?  हा प्रश्न  अनुत्तरीतच राहतो. हि सगळी दुर्दैंवी घटना घडुन सोळा तास उलटले तरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता घटनास्थळी हजर नव्हते. ते जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा करायचे ते नाही तर भलतेच उद्योग करुन बसले. एका माध्यम प्रतिनिधीने विचारलेल्या खोचक प्रश्नाला उत्तर न देता माध्यमांच्या कार्य प्रणालीचा उदो उदो करुन   पत्रकारांना धकाकाबुक्की करुन धाककपटशाहीचा प्रयोग केला तर एकी कडे मुख्यमंत्री प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधत आसतांना महाशय निसर्गसहलीला यावे तसे आपले स्वता:चे  पुलावरुन सेल्फी काढण्यांत दंग आसल्याचे समोर आले आहे. किती ही असंवेदनशिलता ! ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहोत, त्याच जिल्ह्यात घडलेल्या एका दुर्दैंवी घटनेमुळे अनेक नागरीकांचा बळी गेलाय तिथेच फोटो काढण्यात कुठली आली मर्दांनगी ? हे या महाशयांना कळायला हवे होते पण दुर्देव तसे घडले नाही.भारतीय जनता पार्टीवर लोकांनी विश्वास टाकुन बहुमताने सरकार निवडुन दिले आहे. विनयशिल मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडनवीस यांची महाराष्ट्रात ओळख आहे. पण त्यांच्याच मंत्रीमंडळात मंत्री जनतेच्या भावनेचा अनादर करुन बेलगाम वक्तव्य व कृती करीत आसतील तर यावर सकारने नक्कीच चिंतन करुन आशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला पाहीजेत ही जनतेची मागणी आहे.
                    सावित्री नदिवरचा हा ब्रिटिशकालीन पुल शंभर वर्ष जुना आसुन तो वाहतुकी साठी सुरक्षीत नव्हता आसे ब्रिटिशांनी व तसेच स्थानिक वृत्तपत्रांनी सांगुन सुध्दा सरकारने आणि प्रशासनाने वेळ काढु भुमिका घेवुन हा पुल वाहतुकीलाठी खुला ठेवला. निसर्गाच्या प्रकोपा पुढे हा पुल टिकला नाही याच दुख नाही पण यात अनेक निप्षाप नागरीकांचा बळी गेला.सरकार आणि प्रशासनाच्या दिगंराई मुळे अनेक संसार उघड्यावर पडले, घरातली कर्ती माणसं गेली याच दु:ख आहे. मागच्या वर्षी उत्तराखांड मधे ही ढग फुटी झाली हजारो माणसे मेली, २६ जुलै ला मुंबईत निसर्गाचा प्रकोप झाला तिथेही माणसं मेली पण सरकार आणि प्रशासन यातुन काही धडा घेत नाही. निसर्गाचा समतोल बिघडलाय तो कुठे ना कुठे कोपनार हे माहीत आसुनही आपण धडा घेवुन आपल्या चुका सुधारत का नाही ? घटना घडुन गेल्या नंतर खडबडुन जागे होऊन टाहो फोडण्या पेक्षा आधिच जर उपाय योजना केल्या असत्या तर आज शोक करण्याची वेळ आलीच नसती. सगळी कडे चमडी बचाव धोरण स्विकारनारे प्रशासनातील आधिकारी सबंधित मंत्री या सर्व दुर्घटनेला दोषी आसुन या सर्वांवर सदोष मनुष्यवधाची कारवाई होवुन कडक शासन होने गरजेचे आहे. दरवेळी नैसर्गिक अपत्ती येते आपण हतबल होवुन पाहत राहतो. अनेक निष्पाप नागरीक यात मारले जातात. चार चार दिवस शोधमोहीमा सुरु राहतात तरी हाती काही विषेश लागत नाही, हे अपयश कोणाच आहे ? सरकारनेच, प्रशासनाने, तुम्ही आम्ही सर्वांनी याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे आसुन पुढे आशा दुर्घटना घडु नये म्हणुन कायम सावध राहीले पाहिजेत. एकमेकांना साह्या करीत आशा  नैसर्गिक अपत्तीत होणारी किमान जिवीतहनी तरी रोखता आली तरी पुष्कळ होईल. बाकी चौकशा दोषारोप पत्र नंतर होतच राहतात. पण ज्या कुटुंबाचा माणुस यात दगावतो त्या कुटुंबाची होनारी हनी ही न भरुन येनारी आसते हे अंतिम सत्य आहे. या दुर्घटनेत ज्ञात आज्ञात मृत्यु पावलेल्या सर्व मृत्यु पावलेल्या सर्व नागरीकांना सा. विचारमंथन परीवारा कडुन भावपुर्ण श्रध्दांजली.

प्रशांत गडगे
संपादक
सा. विचारमंथन

No comments:

तांगा पलटी घोडे फरार....... सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही विरोध करील कोण? कार्यकर्त्याच्या तलवारी मॅन ?

प्रत्येक पक्षात पुर्वी सारखे निष्ठावंत कार्यकर्ते आता शोधून सापडत नाहीत, व त्याला कारण देखील पक्षात वाढती घुसखोरी ठरत आहे,  सध्य...