🔴 BREAKING NEWS
विचारमंथन न्यूज |संपादक -प्रशांत गडगे |जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क -9623860007

Post Page Advertisement [Top]

Advertisement

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोळखांब विद्यालयात बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा काल मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, रायगड विभागाचे चेअरमन तथा माजी शिक्षक आमदार मा. श्री. बाळाराम पाटील साहेब रायगड विभागाचे विभागीय अधिकारी श्री. मोहन कोंगेरे साहेब व सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. जगताप साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेवक श्री. जगे काका या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा अतिशय दिमाखदारपणे संपन्न झाला. याचवेळी श्री. जगे काका यांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा डायनिंग हॉल चे उद्घाटनही करण्यात आले. सुरुवातीला ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थिनींनी गायलेल्या रयतगीत व स्वागत गीतामुळे सभेचे वातावरण संगीतमय करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 
      काही दिवसापूर्वीच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार श्री.रामशेठ ठाकूर साहेब यांनी सभागृहाच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते व त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी फोनवरून शुभेच्छा दिल्या.
           डोळखांब सारख्या दुर्गम भागात असूनही या विद्यालयाचा सुंदर परिसर व विद्यालयाचा झालेला विकास पाहून मन भारावून गेल्याची प्रतिक्रिया सहसचिव श्री बी एन पवार साहेब यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. तसेच या विद्यालयाची शैक्षिणक गुणवत्ता, कला, क्रीडा आणि संगीत क्षेत्रातील यश हे आदर्श विद्यालयाच्या वाटचालीचे लक्षण असून विद्यालयात सुरू असलेला AI चा उपक्रम हे आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने टाकलेले एक उत्तम पाऊल असल्याचे प्रतिपादन श्री. विभागीय चेअरमन श्री.बाळाराम पाटील साहेब यांनी आपल्या भाषणातून केले. या विद्यालयाचे माजी विद्यार्थी व रायगड विभागाचे विभागीय अधिकारी श्री मोहन कोंगेरे साहेब यांनी डोळखांब विद्यालयाचा विकास टप्प्याटप्याने कसा होत गेला, याचा स्वतः साक्षीदार असल्याने या विद्यालयाचा मला सार्थ अभिमान वाटतो असे आपल्या मनोगतातून सांगितले.
    या कार्यक्रमासाठी उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांचा सत्कार विभागीय समन्वय समितीचे सदस्य व स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन श्री. विकासभाई चौधरी तसेच स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य व कृ. उ. बा. स. चे सभापती श्री. नंदकुमार डोहळे, ज्येष्ठ सदस्य श्री. रामचंद्र फर्डे व मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रकाश चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत अधिकारी, विविध समित्यांचे सदस्य, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्या. श्री.जगदीश विशे सर यांनी केले.

No comments:

Bottom Ad [Post Page]

Advertisement